Maharashtra 2024 Sarkari Yojana:आज आपण आणखी एका नवीन योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आपण आज पाहणार आहोत. Sarkari Yojana Maharashtra 2024, सरकारी योजना महाराष्ट्र 2024,
Sarkari Yojana Maharashtra 2024
महाराष्ट्र शासनातर्फे वेगवेगळ्या योजना सतत राबविल्या जातात. आज आपण अशाच अपंग व्यक्तींसाठी असणाऱ्या दोन योजनांची माहिती पाहणार आहोत. काशा प्रकारे अपंग व्यक्ति सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकतात. कोणत्या प्रकारचा लाभ त्यांना योजनेच्या अंतर्गत मिळू शकतो याची सविस्तर माहिती आज आपण दिलेली आहे. अपंग योजना 2024 महाराष्ट्र,
खालील योजना समाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग मार्फत राबविली जाते. दिलेली माहिती सविस्तर वाचा आणि इतर मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.
Vivah Protsahan Yojana Maharashtra तपशील
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग विवाह / वैवाहिक प्रोत्साहन योजना राबविली जाते. या योजनेच्या अंतर्गत अपंग असलेल्या व्यक्ति ने ( पीडब्ल्यूडी ) अपंग नसलेल्या व्यक्ति सोबत लग्न केल्यास त्या जोडप्यास पन्नास हजार पर्यंत विवाह प्रोत्साहन देण्यात येते
महाराष्ट्र सरकारी योजना या योजनेमधून ज्या लोकांकडे विवाह करण्याची आर्थिक परिस्थिती नसते अशांना योजनेमार्फत त्यांचे लग्नाचे संपूर्ण खर्च हा सरकार मार्फत केला जातो अशांसाठी विवाह प्रोत्साहन ही योजना राबवली जात आहे.
वैवाहिक प्रोत्साहन योजना या योजनेमध्ये गरजू लोकांसाठी संपूर्ण विवाहाचा खर्च हा सरकारतर्फे केला जाणार आहे अशी ही योजना आहे या संबंधित सर्व माहिती खाली देण्यात आलेली आहे. योग्यरीत्या वाचायचे आहे व आपल्या अधिकृत संकेतस्थळावर देखील नेहमी तरी त्या पाहायचे आहेत
फक्त माहराष्ट्राचे रहिवासी असणाऱ्या नागरिकांना या योजनेसाठी अर्ज करू शकतील. ही योजना पूर्णपणे 100% टक्के शासनामार्फत अनुदानित असणार आहे.
Vivah Protsahan Yojana Maharashtra
वैवाहिक प्रोत्साहन योजना या योजनेचे फायदे खालीप्रमाणे :
पात्र असणाऱ्या जोडप्यासाठी 50 हजार /- आर्थिक मदत केली जाणार आहे. खालील माहिती वाचा.
- 25 हजार रु रुपयाचे बचत प्रमाणपत्र
- 20 हजार रु रोख
- 4500 रु घरगुती उपयोगाच्या स्वरूपात
- वैवाहिक प्रोत्साहन कार्यक्रमासाठी उपस्थितीसाठी 500 /-
विवाह प्रोत्साहन योजेनची पात्रता :
- अर्ज करणारे जोडपे भारताचे नागरिक असावे
- महाराष्ट्राचे कायमचे रहिवासी असावे
- अर्ज करणारी व्यक्ति – अपंग व्यक्ति ( दृष्टी अपंगत्व / कमी दृष्टी / कानाचे दोष / अस्थिव्यंग इत्यादि..) असणे गरजेचे आहे.
- अपंग असण्याची टक्केवारी 40% अथवा त्यापेक्षा जास्त असावी
- अर्ज दर व्यक्ति चे लग्न अपंग नसणाऱ्या व्यक्ति सोबत झालेले असणे गरजेचे आहे.
विवाह प्रोत्साहन योजना महाराष्ट्र अर्ज प्रक्रिया
- जिल्हा समाज कल्याण विभाग कार्यालयास भेट द्या. आणि अर्ज करण्यासाठी नमुन्याची हार्ड कॉपी मिळवा
- अर्ज भरताना सर्व माहिती अचूक भरा / पासपोर्ट आकाराचा फोटो लावा / आवश्यक कागदपत्र जोडा
- संपूर्ण भरलेला अर्ज समाज कल्याण कार्यालयात जमा करा.
योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र :
- आधार कार्ड
- पासपोर्ट फोटो – 2 – सही केलेले
- निवासी / अधिवास दाखला
- अपंग दाखला
- बँक खात्याची माहिती
- वय पुरावा – जन्म दाखला / 1 0 वी / 12 चे प्रमाणपत्र
- विवाह झाल्याचा पुरावा
- जिल्हा समाज कल्याण कार्यालय येथे गरजेची असलेली इतर कागदपत्र
अधिक माहिती साठी : येथे क्लिक करा
नाही, दोघांपैकी एकच कोणीतरी अपंग असावे
Sarkari Yojana Maharashtra 2024
नवीन योजना माहिती ⬇️⬇️⬇️⬇️⬇️
अपंगांसाठी शिष्यवृत्ती योजना
अपंग व्यक्तींसाठी राज्य पोस्ट – मेट्रिक शिष्यवृत्ती ही योजना समाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग मार्फत राबविली जाते. या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याकरिता प्रोत्साहित करणे हा उद्देश आहे. एच एस सी / पदवी / व्यवसायिक / तांत्रिक / वैद्यकीय / अभियांत्रिकी इत्यादि फक्त महाराष्ट्राचे रहिवासी असणारे नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात. 100% ही योजना शासनामार्फत अनुदानित असणार आहे.
सरकारी योजना मार्फत अपंग व गरजवंत विद्यार्थ्यांसाठी किंवा उमेदवारासाठी शिष्य योजनेचे आयोजन सरकारमार्फत करण्यात आलेले आहे यामध्ये उमेदवाराला व्यवसाय करण्यासाठी अथवा उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना सरकारतर्फे अपंग शिष्यवृत्ती ही योजना राबविण्यात येणार आहे यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात या योजनेचा फायदा मिळणार आहे तसेच त्यांना मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती देखील या योजनेतून मिळणार आहे याचा विद्यार्थ्यांनी नक्कीच फायदा घ्यायचा आहे व संपूर्ण माहिती योग्य तीरीत्या वाचायची आहे.
अपंग शिष्यवृत्ती योजना फायदे
गट अ :
वैद्यकीय / अभियांत्रिकी / कृषि / पशुवैद्यकीय व पदव्युत्तर अभ्यासक्रम
वसतिगृह साठी प्रति महिना : 1200 /- रु
डे स्कॉलर साठी प्रति महिना : 550 / – रु
गट ब :
वैद्यकीय / अभियांत्रिकी / कृषि / पशुवैद्यकीय पदविका अभ्यासक्रम
वसतिगृह साठी प्रति महिना : 820 /- रु
डे स्कॉलर साठी प्रति महिना : 530 / – रु
गट क :
कला / विज्ञान / वाणिज्य व व्यसईक शिक्षण पदविका पदव्युत्तर शिक्षण
वसतिगृह साठी प्रति महिना : 820 /- रु
डे स्कॉलर साठी प्रति महिना : 530 / – रु
गट ड : द्वितीय वर्ष पदवी शिक्षण
वसतिगृह साठी प्रति महिना : 570 /- रु
डे स्कॉलर साठी प्रति महिना : 300 / – रु
गट ई :
पदवी अभ्यासक्रम 11 वे / 10 वे आणि पहिले वर्ष
वसतिगृह साठी प्रति महिना : 380 /- रु
डे स्कॉलर साठी प्रति महिना : 230 / – रु
अंध आणि कमी दृष्टी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाचक भत्ता
- गट ए / बी / सी – दर महिना : 100 /-
- गट डी दर महिना : 75 .- रु
- गट ई दर महिना : 50 /- रु
शिक्षण फी : प्रति महिना – सक्षम अधिकारी यांनी मंजूर केल्यानुसार
अभ्यास दौरा खर्च दर वर्षाचा : 500 /-
प्रकल्प टायपिंग चा खर्च दर वर्षाचा : 600 /-
Sarkari Yojana Maharashtra 2024 शिष्यवृत्ती योजना पात्रता :
- उमेदवार भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.
- कायमचा महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- अर्जदार अपंग असावा
- 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असावे.
- अर्जदार शेवटच्या परीक्षे मध्ये नापास झालेला नसावा
- उमेदवाराने मेट्रिक पात्रता किंवा 11 वी / 12 वी किंवा वैद्यकीय / अभियांत्रिकी यातील तांत्रिक किंवा व्यवसायिक पदवी पूर्ण केलेली असावी.
अर्ज प्रकिया :
- शाळा किंवा कॉलेज मधून योजनेकरिता अर्जाची हार्ड कॉपी घ्या.
- अर्जात सर्व माहिती भरा. कागदपत्र जोडा, सही असलेला फोटो लावा
- अर्ज भरून झाल्यावर संबंधित विभागाकडे कॉलेज / शाळेत जमा करा.
- अर्ज जमा केल्याची पावती घ्या.
कागदपत्र :
- आधार कार्ड
- पासपोर्ट फोटो – 2 सही केलेले
- अधिवास दाखला
- अपंग दाखला
- बँक खात्याची माहिती
- नवीन शिक्षण पात्रतेचा पुरावा
- दहावी पास पुरावा
- मॅट्रिकेत्तर पात्रता पुरावा / फी ची पावती
- इतर आवश्यक असलेली कागदपत्र
अधिक माहिती साठी : येथे क्लिक करा
वरील दोन्ही योजनांची माहिती महत्वाची असल्यामुळे ही माहिती तुमच्या आसपासच्या सर्व लोकांना नक्की शेअर करा.
www.latestupdate247.com या वेबसाइट वर आम्ही वेगवेगळ्या सरकारी योजनांची माहिती / शैक्षणिक प्रक्रिया / सरकारी नोकरीच्या प्रक्रिया / नोकरीच्या जाहिराती अशा प्रकारची माहिती नियमित अपडेट देत असतो. या वेबसाइट वर कोणतीही चुकीची माहीत अपलोड केली जात नाही. नियमित सर्व अपडेट तुमच्या मोबाइल वर पाहण्यासाठी आमच्या वेबसाइट ला भेट देत रहा.
www.latestupdate247.com On this website we provide regular updates about various government scheme infomration / educational process / government job process / job advertisement. No False information is uploaded in this website. keep Visting our website regularly to see all the updates on your mobile.