Apang Yojana 2024 Maharashtra:आपण आज पुणे महानगरपालिका तर्फे असणाऱ्या अपंग व्यक्तीच्या योजना काय आहेत हे जाणून घेणार आहोत. या योजना पुणे महानगरपालिका मार्फत अपंग व्यक्तींसाठी राबवल्या जातात. तर खाली दिलेली सविस्तर योजनांची माहिती वाचा. Apang Yojana 2024 Maharashtra, अपंग कल्याणकारी योजना पुणे महानगरपालिका.
pmc yojana 2024, dbt yojana 2024, marathi yojana 2024, अपंगांसाठी महत्वाच्या योजना 2024, latest govt yojana 2024, yojana in marathi maharashtra, marathi yojana pune 2024, pune mahanagarpalika yojana 2024
जे लोक अपंग आहेत यांना मुख्यत्वाने पाठबळ मिळावे त्यासाठी पुणे महानगरपालिकेतर्फे ही योजना राबविण्यात येत आहे यातून अपंगांना शिक्षण किंवा उच्च शिक्षण मिळावे सोबत त्यांना त्यांच्या ज्या आर्थिक गरज आहे त्यातून ते पूर्ण व्हावे व त्यांनी काहीतरी समाजात आपले स्वतःचे स्थान निर्माण करावे यासाठी पुणे महानगरपालिकेतर्फे अपंग योजनेतून अपंग गरजू लोकांसाठी ही महत्त्वाची योजना राबवली जात आहे त्यासाठी अधिकाधिक लोकांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे.
तर या योजनेमध्ये अपंगांसाठी मुख्यतत्त्वाने अपंग मोफत बस पास योजना, अपंगांना स्वयंरोजगारासाठी मिळणारे अर्थसाह्य योजना, शिक्षण अर्थसहाय योजना, विवाहासाठी अर्थसहाय्य योजना या मुख्य योजना या योजनेतून अपंगांसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत यातून त्यांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे त्यासाठी एक पाऊल पुढे म्हणून पुणे महानगरपालिकेने मोठं योगदान त्या ठिकाणी ते या योजनेमार्फत निभावताना दिसत आहेत
नवनवीन योजनांच्या सविस्तर सर्व माहिती साठी आमच्या वेबसाइट नियमित भेट द्या.
Apang Yojana 2024 Maharashtra
अपंग व्यक्तींना शिक्षण आणि उच्च शिक्षण मिळावे, त्यांना काही व्यवसाय करता यावा, शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य, व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य, आणि प्रवास संबंधित योजना शासनातर्फे राबविण्यात येतात त्याचीच आज आपण काही योजनांची सविस्तर माहिती पाहणार आहोत. तसेच खाली दिलेली माहिती तुमच्या इतर मित्र मैत्रिणीनं सुद्धा शेअर करा.
अपंग मोफत बस पास योजना
मोफत बस पास योजनेसाठी खाली दिलेली कागदपत्र इच्छुक उमेदवारांनी सादर करायची आहे.
- या योजनेसाठी कमीत कमी 3 वर्ष पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहत असल्याचा दाखला ( रेशन कार्ड ची साक्षांकित प्रत ) तसेच 3 वर्ष राहत असल्याचा पुरावा म्हणून गेल्या 3 वर्षाचा महानगरपालिका टॅक्स पावती / लाइट चे बिल / टेलिफोन बिल / झोपडी फोटोचा पास / झोपडी चे सेवा फी पावती / भाडे करार इत्यादि जोडणे गरजेचे आहे.
- सर्व वय गटामधील अपंग व्यक्ति वय पुरावा म्हणून जन्माचा दाखला / ससुन हॉस्पिटल मधील वयाचा पुरावा / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / मतदान यादीचे नाव किंवा ओळखपत्र यातील कोणताही एक पुरावा
- 1 एप्रिल 2001 नंतर जन्मलेल्या आणि 2 पेक्षा जास्त मुले असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- 40% किंवा जास्त अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र तसेच शासनाच्या नियम व अटी या मध्ये बदल केला जाईल.
- अर्जदाराची आधार कार्ड ची प्रत सादर करणे गरजेचे आहे.
- पुणे महानगरपालिकेचे अपंग स्मार्ट कार्ड असेल तर त्याची प्रत सुद्धा जोडावी
- स्कॅन केलेले कागदपत्र जोडणे गरजेचे आहे. तसेच अर्ज करताना मूळ कागदपत्र सोबत ठेवावीत.
- अधिक माहिती साठी पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट ल भेट द्या.
अपंगांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य
या योजनेच्या लाभासाठी आवश्यक असलेले महत्वाचे कागदपत्र यांची माहिती खाली दिलेली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी खाली कागदपत्र सादर करावेत.
- या योजनेसाठी कमीत कमी 3 वर्ष पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहत असल्याचा दाखला ( रेशन कार्ड ची साक्षांकित प्रत ) तसेच 3 वर्ष राहत असल्याचा पुरावा म्हणून गेल्या 3 वर्षाचा महानगरपालिका टॅक्स पावती / लाइट चे बिल / टेलिफोन बिल / झोपडी फोटोचा पास / झोपडी चे सेवा फी पावती / भाडे करार इत्यादि जोडणे गरजेचे आहे.
- रेशन कार्ड साक्षांकित प्रत जोडणे गरजेचे आहे.
- जन्म दाखला किंवा शाळेचा किंवा बोनाफाईड वयाच्या पुराव्यासाठी गरजेचे आहे.
- मागासवर्ग असणाऱ्यानी जातीचा दाखला जोडावा आणि 40% पेक्षा जास्त अपंग असलेल्या लोकानी त्याचा दाखला जोडणे गरजेचे आहे.
- व्यवसायाचे परवाने जसे की शॉप अॅक्ट, अन्न- औषध परवाना ही सुद्धा जोडणे गरजेचे आहे.
- व्यवसायाचा अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र जोडावे, व्यवसाय प्रशिक्षण पूर्ण केलेले असल्यास त्या व्यक्तीला प्राधान्य देण्यात येईल.
- अर्जदारांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असायला हवे.
- झोपडपट्टी मधील अर्ज दारांनी शेजार समूहाचा गट उत्पन्न दाखला द्यावा आणि झोपडपट्टी सोडून बाहेर राहणाऱ्या अर्जदारांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय येथील उत्पन्न दाखला द्यावा.
- अनुदान मिळाल्यानंतर एक महिन्यात खरेदी करण्यात आलेल्या माल / साहित्य / साधन इत्यादीची मूळ खरेदी पावती कार्यालयाकडे द्यायची आहे.
- स्कॅन केलेले कागदपत्र जोडणे गरजेचे आहे.
- अधिक माहीत साठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
उच्च तांत्रिक शिक्षण अर्थ सहाय्य
शैक्षणिक आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी उमेदवारांनी खाली नमूद केलेली कागदपत्र सादर करणे गरजेचे आहे.
- या योजनेसाठी कमीत कमी 3 वर्ष पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहत असल्याचा दाखला ( रेशन कार्ड ची साक्षांकित प्रत ) तसेच 3 वर्ष राहत असल्याचा पुरावा म्हणून गेल्या 3 वर्षाचा महानगरपालिका टॅक्स पावती / लाइट चे बिल / टेलिफोन बिल / झोपडी फोटोचा पास / झोपडी चे सेवा फी पावती / भाडे करार इत्यादि जोडणे गरजेचे आहे.
- रेशन कार्ड साक्षांकित प्रत अपत्याच्या पडताळणी साठी जोडणे गरजेचे आहे.
- जन्म दाखला किंवा शाळेचा किंवा बोनाफाईड वयाच्या पुराव्यासाठी सादर करायचे आहे.
- मागासवर्ग असणाऱ्यानी जातीचा दाखला जोडावा आणि 40% पेक्षा जास्त अपंग असलेल्या लोकानी त्याचा दाखला जोडणे गरजेचे आहे.
- मागच्या परीक्षेत पास आणि 60% पेक्षा जास्त मार्क असावेत. तीचा निकाल जोडावा.
- महविद्यालायच्या प्रवेश फी ची पावती जोडावी
- वैद्यकीय / अभियांत्रिकी आणि उच्च व्यावसायिक अभ्यासक्रम साठी या योजनेचा लाभ दिला जाईल.
- 1 एप्रिल 2001 नंतर जन्मलेल्या आणि 2 पेक्षा जास्त मुले असल्यास त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
- अर्जदारांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे.
- अधिक माहिती साठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
Apang Yojana 2024 Maharashtra – विवाहासाठी अर्थसहाय्य
दिव्यांग – दिव्यांग , दिव्यांग – अव्यंग व्यक्तीच्या विवाह सोहळ्यासाठी या योजनेतून अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. खालील माहिती वाचा.
- कुटुंबाचे उत्पन्न वार्षिक 1 लाखाच्या आत असायला हवे. तहसीलदार कंदील उत्पन्न दाखला असावा.
- आधार कार्ड आणि बँक पासबुक ची प्रत जोडावी
- वधू आणि वर यांचा पहिलाच विवाह असावा.
- विवाह नोंदणी कार्यालयाकडे विवाहाची नोंद केलेली असावी. विवाहाच्या तारीख पासून 1 वर्षाच्या अगोदर अर्ज करायचा आहे.
- इतर कुठल्याही समतुल्य योजनेचा लाभ घेतलेला नसणे गरजेचे आहे.
- सविस्तर माहिती साठी खाली लिंक वर क्लिक करून पहा.
या महत्वाच्या योजनांची आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. तरीही सर्वानी दिलेल्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन सविस्तर माहिती पुन्हा एकदा वाचून घ्यावी तसेच अपंग व्यक्तिसाठी आणखी काही योजना अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या आहेत. त्या सुद्धा पहाव्यात.
दिव्यांग व्यक्तिनि सुरू केलेल्या कला पथकसाठी वाद्य खरेदी करण्यासाठी, दिव्यांग व्यक्तींना वार्षिक आर्थिक सहाय्य, व्यवसायाच्या वृद्धी साठी आर्थिक सहाय्य, कृत्रिम अव्यय घेण्यासाठी आर्थिक सहाय्य अशा इतर योजना सुद्धा अपंग व्यक्तींसाठी दिलेल्या आहेत.
अधिकृत वेबसाइट लिंक : येथे क्लिक करा
www.latestupdate.com या वेबसाइट वर तुम्हाला नियमित अशाच सर्व महत्वाच्या योजनांची माहिती मिळत राहील त्यासाठी आमच्या वेबसाइट ला नियमित फॉलो करा. दिलेली माहिती तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.