Cyber Security Information in Marathi, सायबर सेक्युरिटी माहिती 2025

Cyber Security Information in Marathi, सायबर सेक्युरिटी माहिती 2025 : आजच्या लेखात आपण अतिशय छान आणि महत्वाच्या विषयाबद्दल माहीत जाणून घेणार आहोत. या विषयात तुम्ही तुमचे करियर सुद्धा चांगल्या प्रकारे करू शकता. तर आपला विषय सायबर सुरक्षा. याची आज आपण महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. तसेच या मध्ये करियर च्या संधी आहेत की नाही याची सुद्धा माहिती पाहणार आहोत. Cyber Security Information in Marathi, सायबर सेक्युरिटी माहिती 2025,

सायबर सेक्युरिटी म्हणजे एक महत्वाचा भाग मानला जातो. डिजिटल क्षेत्रात सायबर सेक्युरिटी ला खूप महत्व आहे. डिजिटल गोष्टींच्या, डाटा च्या सुरक्षेसाठी याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. सरकारी विभाग / मोठ मोठ्या कंपन्या / संस्था / बँका इत्यादि ठिकाणी सायबर हल्ला होऊ नये म्हणून सायबर सुरक्षा तंत्राचा वापर करण्यात येतो. या विषयात सुद्धा अनेक विद्यार्थी चांगले करियर करू शकतात.

सायबर सेक्युरिटी मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी नोकरीच्या संधी सुद्धा प्राप्त होतात. तुम्ही सायबर सेक्युरिटी ची पदवी पूर्ण करून एक चांगला पगार असलेली नोकरी मिळवू शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला सर्व कौशल्य उत्तम अवगत असते सुद्धा गरजेचे आहे. कारण ही काम जोखमीचे तर असतेच पण त्याचबरोबर एखाद्या चुकीमुळे समोरच्या व्यक्तीचे नुकसान सुद्धा होऊ शकते. आय टी क्षेत्रातील उत्तम नोकरीची संधी मिळवण्यासाठी हा कोर्स नक्की फायदेशीर ठरू शकतो. तसेच यात पुढे जाऊन तुम्ही चांगले करियर सुद्धा करू शकता. सायबर सेक्युरिटी ची मागणी सुद्धा सध्याच्या काळात वाढलेली असल्यामुळे, नोकरी च्या संधी सुद्धा दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत.

Cyber Security Information in Marathi 2025

सायबर सेक्युरिटी हे असे तंत्रज्ञान आहे जे आपल्या सर्व माहिती ला चोरी करू पाहणाऱ्या किंवा नुकसान देऊ पाहणाऱ्या सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवते. डिजिटल तंत्रज्ञानाच्या काळात होणाऱ्या सर्व सायबर गुन्हे / चोरी आणि नुकसान यांपासून संरक्षण मिळविण्यासाठी ही तंत्र विकसित केले गेले आहे.

सायबर सेक्युरिटी साठी कोणते स्किल शिकावे लागतात ?

  1. एथीकल हॅकिंग
  2. पेनिट्रेशन टेस्टिंग
  3. वेब अॅप्लिकेशन सेक्युरिटी
  4. वुलनेरबिलिटी असेसमेंट
  5. सायबर सेक्युरिटी

नोकरी साठी सायबर सेक्युरिटी ची पदे कोणती ?

  1. चीफ इन्फॉर्मेशन सेक्युरिटी ऑफिसर
  2. पेनिट्रेशन टेस्ट्स
  3. सेक्युरिटी ऑडिटर
  4. सेक्युरिटी मॅनेजर
  5. वुलनेरबिलिटी अॅक्सेसर
  6. क्रिप्टोग्राफर
  7. सेक्युरिटी अॅडमिनिस्ट्रेटर
  8. सेक्युरिटी कन्सलटंट
  9. सेक्युरिटी सॉफ्टवेअर डेवलपर
  10. फॉरेन्सिक एक्स्पर्ट
  11. इनसीडंट रिस्पॉन्डर
  12. सेक्युरिटी एनालिस्ट
  13. सेक्युरिटी आर्किटेक्ट
  14. सेक्युरिटी इंजिनिअर
  15. सेक्युरिटी कोड ऑडिटर
  16. सेक्युरिटी स्पेशलिस्ट

सायबर सेक्युरिटी एक्स्पर्ट ला मोठी मागणी सध्या आहे. 12 वी चे शिक्षण झाल्याच्या नंतर उमेदवार सी एस आणि सायबर सेक्युरिटी मध्ये बी टेक किंवा बी एस सी ची पदवी पूर्ण करू शकतात. बी टेक चा कालावधी 4 वर्षाचा असतो तर सी एस आणि बी एस सी चा 3 वर्षाचा कालावधी असतो. यू जी व पी जी डिप्लोमा चा कालावधी 10 महीने ते 1 वर्ष पर्यंत असतो.

सायबर सेक्युरिटी चे महत्व:

तुमच्या सर्व माहितीचे जसे की बँक अकाऊंट, तुमचा मोबईल, तुमचे वैयक्तिक मेसेज, फोटो, इतर महत्वाच्या गोष्टी ज्या डिजिटल आहेत. अशा सर्व गोष्टींचे संरक्षण ही सायबर सेक्युरिटी च्या अंतर्गत केले जाते.

सायबर सेक्युरिटी चा कोणाला फायदा होऊ शकतो ?

सध्याच्या युगात सर्वजण इंटरनेट चा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. म्हणून त्यासाठी सायबर सुरक्षा सुद्धा अत्यंत गरजेची ठरत आहे. सरकारी संस्था / लहान उद्योग / मोठे उद्योग / वित्तीय संस्था / शैक्षणिक संस्था यांना त्यांचा डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी सायबर सुरक्षेची गरज पडते. तसेच वैयक्तिक बँकिंग डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी सुद्धा मदत होते. तुमचा बँकिंग डाटा सुरक्षित नसेल तर तुमच्या खात्यातील रक्कम कोणीही चोरी करू शकते.

सायबर सुरक्षा यंत्रणा काम कशी करते ?

या कामासाठी एक टीम नेमलेली असते. ती टीम तुमची डाटा सुरक्षित ठेवण्याचे काम करते असते. तुमचे उपकरण आणि डाटा दोन्ही सुद्धा सायबर सुरक्षाद्वारे वाचवले जाते.

सायबर सेक्युरिटी करण्याची पद्धत :

  1. तुमच्या उपकरणासाठी अॅंटी वायरस सॉफ्टवेअर वापरा
  2. तुम्ही वापरत असलेले उपकरण / सॉफ्टवेअर नियमित अपडेट करणे गरजेचे आहे.
  3. पासवर्ड टाकताना स्ट्रॉंग पासवर्ड ठेवणे गरजेचे आहे.
  4. सुरक्षित नसलेले इंटरनेट कनेक्शन वापरू नये.
  5. अनोळखी आणि अधिकृत नसलेल्या कोणत्याही लिंक क्लिक करू नये.
  6. सुरक्षित नसलेल्या कोणत्या वेबसाइट वर स्वतबद्दलची माहिती नमूद करू नये.

सायबर सेक्युरिटी प्रकार :

  1. नेटवर्क सेक्युरिटी :
    • हॅकर करणाऱ्या लोकांपासून कॉम्प्युटर चे नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी ही पद्धत वापरले जाते. नेटवर्क च्या माध्यमातून येणारे सायबर हल्ले नेटवर्क सेक्युरिटी च्या अंतर्गत थांबवले जातात.
  2. अॅप्लिकेशन सेक्युरिटी :
    • तुम्ही वापरत असलेल्या अॅप्लिकेशन आणि सॉफ्टवेअर ला मालवेअर हल्ल्यापासून वाचविण्यासाठी अॅप्लिकेशन सेक्युरिटी चा वापर केला जातो.
  3. बिझनेस सेक्युरिटी :
    • एखादी संस्था त्याच्या डाटा चे संरक्षण या सेक्युरिटी च्या मदतीने करू शकते. या मध्ये हरवलेला डाटा परत मिळवता येऊ शकतो.
  4. आणखी इतर सुद्धा प्रकार आहे. याची माहिती तुम्हाला सविस्तर तुमच्या कोर्स मध्ये मिळून जाईल.

Cyber Security Information in Marathi 2025

सायबर सुरक्षेसाठी खाली गोष्टी करणे गरजेचे आहे.

  1. सिस्टम सतत अपडेट करणे गरजेचे आहे.
  2. अनोळख्या ईमेल किंवा मेसेज मध्ये आलेल्या लिंक क्लिक करू नये.
  3. तुमच्या सिस्टम मध्ये अॅंटी वायरस सॉफ्टवेअर वापरणे गरजेचे आहे.
  4. मजबूत पासवर्ड वापरणे सुद्धा गरजेचे आहे.
  5. तुमच्याकडे एखादी अनोळखी लिंक आल्यास त्यामध्ये वायरस असू शकतो. तुमचे उपकरण हॅक सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुठल्याही अनोळखी लिंक वर क्लिक करू नये.
  6. कोणतेही सार्वजनिक किंवा अनोळखी नेटवर्क वैयक्तिक कामासाठी वापरू नये.

सायबर सेक्युरिटी चा अभ्यास करण्यासाठी यूनायटेड स्टेट हा चांगला देश म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी सायबर सेक्युरिटी च्या अभ्यासासाठी उच्च विद्यापीठे आहेत. सायबर सुरक्षेच्या बाबतीत फिनलंड हा देश पहिल्या क्रमांकवर आहे. या देशाने यू के / यू एस ए / कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या प्रमुख देशांना मागे टाकलेले आहे. नॉर्डीक फिनलंड / नॉर्वे व डेन्मार्क या देशांनी 92 पेक्षा जास्त सायबर सेफ्टी स्कोअर मिळवलेला आहे.

अफगाणिस्तान / म्यानमार आणि नामीबिया ही पहिले तीन असे देश आहेत ज्यांचा सायबर स्कोअर सगळ्या कमी आहे. अनुक्रमे त्यांचा सायबर स्कोअर हा 5.63 / 18.60 आणि 19.72 एवढा आहे. सायबर सुरक्षेचा जास्तीत जास्त धोका चीन / इराण / उत्तर कोरिया आणि रशिया या देशांमध्ये आहे.


सायबर सेक्युरिटी म्हणजे काय असते ?

ही एक अशी प्रणाली आहे जी तुमच्या सिस्टम ला डिजिटल सायबर हल्ल्यांपासून वाचविण्यासाठी सक्षम असते.

सायबर सेक्युरिटी चे उपयोग कोणते ?

सर्व सायबर वायरस पासून संरक्षण मिळते. आपला डाटा चोरी होण्यापासून वाचतो. आपले सिस्टम आणि नेटवर्क हॅक होण्यापासून सुरक्षित राहते.


www.latestupdate247.com ही एक मराठी भाषेतून महत्वाच्या अपडेट देणारी वेबसाइट आहे. या वेबसाइट वर तुम्हाला करियर संदर्भात मार्गदर्शन करणारी माहिती आणि सर्व सरकारी योजनांची माहिती नियमित मिळेल. यामध्ये सर्व शैक्षणिक योजना, आरोग्य योजना, अपंग योजना, महिला सक्षमीकरण योजना, निराधार योजना, जेष्ठ नागरिक योजना, इत्यादि सर्व योजनांची माहिती सविस्तर मिळेल. सदर ची दिलेली करियर संदर्भातील माहिती तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा.

Leave a Comment