Divyang kalyan Yojana Maharashtra, Sarkari Yojana 2024 Marathi

नेहमी प्रमाणे आज आपण नवीन योजनबद्दल माहीती जाणून घेणार आहोत. सदर योजना पुणे मनपा मार्फत मनपा हद्दीतील लोकांसाठी राबविण्यात येतात. सदरच्या योजना या फक्त दिव्यांग व्यक्तींसाठी खास करून त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी राबविल्या जातात. या योजनांची माहिती सर्व लोकांना मिळावी म्हणून आपण आज योजनांची सर्व माहिती सविस्तर पाहणार आहोत. मराठी योजना माहिती 2024, पुणे महानगरपालिका योजना माहिती, दिव्यांग आर्थिक सहाय्य योजना 2024, scholarship information in marathi 2024, Divyang kalyan Yojana Maharashtra

Divyang kalyan Yojana Maharashtra

आजच्या या लेखात आपण पुणे महानगरपालिका अंतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. खाली दिलेल्या योजनांची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. दिव्यांग व्यक्तींना वेगवेगळ्या योजनेच्या अंतर्गत आर्थिक लाभ दिला जातो. खाली दिलेली माहीत लक्षपूर्वक वाचा. Divyang kalyan Yojana Maharashtra, Sarkari Yojana 2024 Marathi, disabled person scheme in marathi 2024,

आपल्या वेबसाइट वर नियमित सर्व योजनांची माहिती सविस्तर मराठी मध्ये देण्यात येते. महिलांसाठी च्या योजना, विद्यार्थ्यांसाठी योजना, वृद्ध व्यक्तींसाठी योजना, शेतकरी योजना, शिष्यवृत्ती योजना व इतर सर्व योजनांची अधिकृत माहिती येथे देण्यात येथे. नियमित माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट ला भेट देत राहा. आपण काही महत्वाच्या योजनांची थोडक्यात माहिती पाहिली आहे. ज्या योजना दिव्यांग व्यक्तींसाठी राबविल्या जातात. वरील योजनांची माहिती तुम्ही तुमचे आसपासच्या इतर लोकांना नक्की शेअर करा. जे पुणे म न पा हद्दीमध्ये राहत आहेत. दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक सहाय्य देण्यात येते. या सर्व दिव्यांग साठी योजना पुणे महानगरपालिका मार्फत पुणे म न पा च्या हद्दीतील दिव्यांग साठी ही योजना राबविते. सदर सर्व योजनांचा तपशील सविस्तर खाली दिलेला आहे.

Regular information about al schemes is provided in detailed marathi language on our website. Official information about schemes for women, schemes for students, schemes for senior citizxens, farmers schemes, scholarship schemes are given here. Keep visiting our Website for regular updates.

Divyang kalyan Yojana Maharashtra

दिव्यांग व्यक्तींसाठी पुणे महानगरपालिका मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना खालील प्रमाणे आहेत.

  1. दिव्यांग असलेल्या व्यक्तींसाठी स्वयंरोजगारकरिता आर्थिक सहाय्य :
    • पुणे म न पा हद्दीत असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींसाठी स्वयंरोजगार करण्याकरिता 15,000 /- रु आर्थिक सहाय्य दिले जाते.
  2. दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींना अल्प कालावधी व्यवसायचे प्रशिक्षण घेण्याकरिता आर्थिक सहाय्य :
    • ज्या दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींना समाज विकास विभाग अंतर्गत सुरू असलेल्या व्यवसाय प्रशिक्षण संस्थेमधून प्रशिक्षण घेणे शक्य नसल्यास अधिकृत संस्थेत प्रवेश घेतला असेल तर त्या संस्थेस जास्तीत जास्त रक्कम 10,000 /- रु किंवा संस्थेची प्रशिक्षण करिता असणारी फी या पैकी जी रक्कम कमी असेल ती प्रशिक्षणच्या खर्चासाठी दिली जाते.
  3. दिव्यांग विद्यार्थी यांना दीर्घ मुदत असलेले किंवा शैक्षणिक किंवा तांत्रिक अभ्यासक्रमाकरिता आर्थिक सहाय्य :
    • जे विद्यार्थी दिव्यांग असून 10 वी आणि 12 वी नंतर तांत्रिक / वैद्यकीत / इंजिनिअरिंग / व्यवस्थापकीय / संगणकीय किंवा इतर उच्च अभ्यासक्रम किंवा विद्यापीठ मान्यता असलेल्या तांत्रिक कोर्स साठी प्रवेश घेतील अशा अपंग विद्यार्थ्याना त्यांच्या शैक्षणिक वेळेत 20,000 /- रु आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. परंतु जिथे प्रवेश घेतला आहे ती संस्था शासनमान्य असणे गरजेचे आहे.
  4. अंध / अपंग / विकलांग / मुकबधिर व्यक्तींसाठी कृत्रिम अवयव घेण्याकरिता योजना :
    • अंध / अपंग / विकलांग / मुकबधिर आणि तत्सम अपंग व्यक्तींसाठी दैनंदिन कायमसाठी उपयोगी असणारे कृत्रिम साधानांकरिता 20,000 /- रु आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
  5. महापालिका क्षेत्रातील मतिमंद असणाऱ्या व्यक्तीचा सांभाळ करणाऱ्या महापालिका हद्दीमधील नोंदणी केलेल्या स्वयंसेवी संस्थेला किंवा मतिमंद व्यक्ति च्या पालकांना आर्थिक सहाय्य :
    • पुणे महानगरपालिका हद्दीत वास्तव्य असलेल्या कमीत कमी 15 मतिमंद व्यक्तींचा सांभाळ करण्यासाठी नोंदणी असलेल्या स्वयंसेवी संस्थेला प्रत्येक मतिमंद व्यक्तीसाठी प्रत्येक महिन्याला 2000 /- रु प्रमाणे वार्षिक 24,000 /- रु आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.

Sarkari Yojana 2024 Marathi

  1. मोफत बस पास साठी योजना :
    • पुणे महानरपालिका क्षेत्रात राहत असलेल्या सर्व दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत बस पास देण्यात येणार आहे.
  2. दिव्यांग – दिव्यांग / दिव्यांग – अव्यंग व्यक्ति च्या लग्नासाठी आर्थिक सहाय्य :
    • कमीत कमी 40% किंवा त्याच्या पेक्षा जास्त दिव्यांग असणाऱ्या दिव्यांग मुलगी किंवा मुलाने दिव्यांग नसलेल्या मुलगी किंवा मुलाशी लग्न केल्यास किंवा दिव्यांग असलेल्या दिव्यांग मुलगी किंवा ,मुलाने दिव्यांग असलेल्या मुलीशी किंवा मुलाशी लग्न केल्यास लग्नासाठी 30.000 /- रु एवढे एकदाच आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
  3. दिव्यांग व्यक्तींनी सुरू केलेल्या कला पथकाला वाद्य खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य :
    • दिव्यांग व्यक्तींनी सुरू केलेल्या कला पथकसाठी 50,000 /- रु एवढे एकदाच आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
  4. दिव्यांग व्यवसाय गट यांनी सुरू केलेल्या व्यवसाय वृद्धी साठी आर्थिक सहाय्य :
    • व्यवसाय वृद्धी साठी भांडवली खर्च म्हणून 25,000 /- रु एवढे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
  5. दृष्टीहीन सोबत असलेल्या मदतनीस पी एम पी एम एल तिकीट मध्ये 50% सवलत :
    • पुणे शहराच्या हद्दीमधील आणि पी एम पी एम एल बस जिथपर्यंत जाते तिथपर्यंत दृष्टीहीन सोबत असलेल्या मदतनीस ला पी एम पी एम एल तिकीट मध्ये 50% सवलत देण्यात येणार आहे.
  6. दिव्यांग व्यक्तींसाठी वार्षिक आर्थिक सहाय्य :
    • पुणे म न पा हद्दीमध्ये राहणाऱ्या वेगवेगळ्या अपंगत्व असणाऱ्या असणाऱ्या व्यक्तींना प्रत्येक महिन्याला 2000 /- रु प्रमाणे वरसिक 24,000 /0 आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.

Pune Mahanagarpalika Yojana in Marathi 2024

https://latestupdate247.com या वेबसाइट वर नियमित पणे सर्व सरकारी योजनांची माहिती दिली जाते. सर्व अधिकृत माहिती आम्ही इथे प्रसिद्ध करतो. कोणतीही खोटी योजना आमच्या वेबसाइट वर दिली जात नाही. आमच्या वेबसाइट दिल्या जाणाऱ्या सर्व योजनांची माहिती तुम्ही घ्या आणि इतरांना सुद्धा शेअर करा. जेणकरून गरजू आणि पात्र असणाऱ्या सर्व नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल.

The website https://latestupdate247.com provides regular information about all government schemes. We publish all the official information here. No fake scheme is provided on our website. Get information about all the plans offered on our website and also share with others. So that all the needy and eligible citizens can befit from it.

Leave a Comment