LLB Information in Marathi, एल एल बी मराठी माहिती 2025

LLB Information in Marathi:आजच्या लेखात आपण एल एल बी म्हणजे बॅचलर ऑफ लॉज् ( Bachelor of Laws ) या बद्दलची महत्वाची सविस्तर माहिती पाहणार आहोत. या शिक्षणातून कायद्याची पदवी मिळवता. संपूर्ण कायद्याचा अधिकृत अभ्यास तुम्हाला करता येतो.LLB Information in Marathi, एल एल बी मराठी माहिती 2025, llb admission process, college for llb in maharashtra, latest llb update 2025, information in marathi LLB,

तुम्ही एल एल बी चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नंतर तुम्ही वकील म्हणून सराव करून अधिकृत वकील होण्यासाठी पात्र होता. चला तर मग एल एल बी ची माहिती सविस्तर पाहूया. सध्या बऱ्याच विद्यार्थ्यांचा एल एल बी च्या शिक्षणाकडे कल वाढलेला आहे. त्या अनुषंगाने नवीन उमेदवारांना काही माहिती मिळावी म्हणून आपण आजची माहिती प्रसिद्ध करत आहे. जेणकरून काही गैरमसज असल्यास दूर होतील. सदरची माहीत तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.

सध्याच्या काळात बरेच विद्यार्थी एल एल बी चे शिक्षण घेण्याकडे वळत आहेत. एल एल बी एक प्रोफेशन म्हणून अतिशय उत्तम करियर चा मार्ग आहे. आर्थिक बाजूने विचार केला तर नोकरी आणि व्यवसाय म्हणून सुद्धा तुम्ही वकिली करू शकता. तुम्हाला जर कायदा क्षेत्रात आवड आणि नोकरीची इच्छा असेल तर तुम्ही एल एल बी चे शिक्षण घ्यायला हरकत नाही.

कायद्याचे संपूर्ण माहिती असणे व कुठल्याही प्रकारचा कायद्याचा गैर उपयोग न घेणे हे मुख्यत्वाने कायदे बनवले जातात त्यासाठी एलएलबी म्हणजेच बॅचलर सिमला याचे अधिकृत शिक्षण घेणाऱ्या उमेदवार हा वकील झाल्यानंतर संपूर्ण कायद्यांचे ज्ञान घेऊन कायद्यांची माहिती घेऊन तो होणारा गैर प्रकारांमध्ये कायद्याने काम करत असतो व योग्य तो न्याय देत असतो.

LLB Information in Marathi

एल एल बी थोडक्यात 2 प्रकारात असते.

  1. पदवीधर उमेदवारांसाठी एल एल बी चा 3 वर्षाचा अभ्यासक्रम असतो
  2. तसेच 12 वी पास उमेदवारांसाठी 5 वर्षाचा अभ्यासक्रम असतो.

LLB Eligibility Criteria

  1. एल एल बी प्रवेशासाठी कोणत्याही सरकारमान्य विद्यापीठातील कमीत कमी 45% मार्क सह पदवी मिळवलेली असावी
  2. इतर मागासवर्गीय साठी काही सवलत सुद्धा असू शकतो
  3. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याच्या नंतर अधिक माहिती तुम्हाला संबंधित विद्यापीठाच्या वेबसाइट वर किंवा विद्यापीठात मिळेल.
  4. प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला सी ई टी परीक्षा पास होणे गरजेचे असते.
  5. ती परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला एल एल बी साठी प्रवेश घेता येऊ शकतो

LLB Subject Details in Marathi

मराठी मधून एल एल बी साठी असणारे विषय खालील प्रमाणे असणार आहेत.

  1. भारतीय संविधान
  2. भारतीय दंड संहिता
  3. फौजदारी प्रक्रिया संहिता
  4. दिवाणी प्रक्रिया संहिता
  5. कर कायदा
  6. कंपनी कायदा
  7. आंतरराष्ट्रीय कायदा
  8. मानवाधिकार कायदा
  9. गुन्हेगारी कायदा
  10. मालमत्ता कायदा
  11. करार कायदा
  12. वैवाहिक कायदा
  13. वकिलाचा धर्म
  14. कोर्ट रूम प्रॅक्टिस

एल एल बी फी :

  1. एल एल बी ची प्रवेश फी ही विद्यापीठ / संस्थे नुसार वेगवेगळी असू शकते.
  2. फी च्या सविस्तर माहिती साठी तुम्ही त्यात विद्यापीठ किंवा संस्थेला भेट देऊ शकता किंवा त्यांच्या अधिकृत वेबसाइट वरून माहीत मिळवू शकता.

एल एल बी नंतर नोकरीच्या संधी कोणत्या ?

एलएलबीनंतर उमेदवार हा कुठल्याही प्रकारच्या नोकरीच्या संधी या त्याला मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतात तो सरकारी वकील देखील होऊ शकतो त्यानंतर तो अप्रेंटिसशिप करून तो प्रायव्हेट वकील देखील होऊ शकतो आता भरपूर सम मोठ मोठ्या कंपन्यांमध्ये वकील या पदासाठी जागा रिकाम्या असतात त्यासाठी त्या भरत्याही राबवल्या जात असतात तो तसेच स्वतः देखील स्वतःचे काम या कोर्स नंतर तो करू शकतो.

चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे नोकरीच्या संधी मिळतील.

  1. वकील म्हणून तुम्ही स्वत: काम करू शकता
  2. कायदेशीर सल्लागार म्हणून सुद्धा तुम्ही काम करू शकता
  3. कंपनी सेक्रेटरी या पदावर सुद्धा काम करता येईल.
  4. न्यायिक सेवा अंतर्गत काम करता येईल
  5. कायदेशीर संशोधन करिता सुद्धा काम करू शकता
  6. तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा काम करू शकता

Is LLB in Marathi Language?

एल एल बी मराठी अभ्यासक्रमासाठी विद्यापीठांची नावे

  1. सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ
  2. मुंबई विद्यापीठ
  3. नांदेड विद्यापीठ
  4. अमरावती विद्यापीठ
  5. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ – छत्रपती संभाजी नगर

काही खाजगी असणारी महा विद्यालय

  1. आय एल एस लॉ कॉलेज पुणे
  2. भारतीय विद्या प्रतिष्ठान भवन लॉ कॉलेज मुंबई
  3. सिंबोयसिस लॉ स्कूल पुणे
  4. डि वाय पाटील लॉ कॉलेज मुंबई
  5. मिठि बाई कॉलेज ऑफ लॉ मुंबई

एल एल बी मराठी मधून करण्याचे फायदे

मराठी भाषेत कायद्याचे व्याख्या आणि तत्व समजण्यास मदत होते
केस लॉ आणि कायदेशीर बाबी समजून घेण्यासाठी मदत होते
मराठी भाषेत न्यायालयीन कामाची आणि संस्थांमध्ये काम करण्यासाठी संधी तयार होईल.

एल एल बी मराठी मधून करण्याचे तोटे

काही विद्यापीठांमध्ये मराठी भाषेतील अभ्यासक्रम साठी ठराविक जागा उपलब्ध असतात
मराठी भाषेमध्ये संधी इतर भाषेपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे
इंग्रजी मध्ये असणारे केस लॉ समजण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील

Entrance Exam For LLB

राष्ट्रीय स्तराच्या परीक्षा :

  1. कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट – CLAT
  2. ऑल इंडिया लॉ एंट्रान्स टेस्ट – AILET
  3. LSAT

राज्य स्तराच्या परीक्षा :

  1. एम एच – सी ई टी लॉ – महाराष्ट्र
  2. GUJCET – गुजरात
  3. KLET – कर्नाटक

12 पास नंतर एल एल बी करता येते का ?

वरील प्रश्नाचे उत्तर होय आहे. कारण 12 वी पास नंतर सुद्धा तुम्ही एल एल बी चे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेऊ शकता. कुठल्याही शाखेतून तुम्ही 12 वी पास असाल तरीही तुम्ही LLB साठी प्रवेश घेऊ शकता.

12 वी पास नंतर 5 वर्षासाठी आणि पदवी नंतर 3 वर्षासाठी एल एल बी चा अभ्यासक्रम असतो.

एल एल बी चे शिक्षण अवघड आहे का ?

  1. एल एल बी मध्ये कायदेशीर सर्व मूल्यांचा समावेश आहे. वेगवेगळ्या केस लॉ चा सुद्धा यात समावेश आहे. काही विषय अवघड आणि तांत्रिक असू शकतात.
  2. या मध्ये तुम्हाला अधिक वाचन सराव आणि अभ्यास करण्याची गरज असेल. तुम्हाला अभ्यासक्रमाशी संबंधित पुस्तकांचा अभ्यास करावा लागेल.
  3. तुमची तर्कशक्ती सुद्धा असणे महत्वाचे आहे.
  4. या शिक्षणासाठी तुम्हाला तुमचे अभ्यास कौशल्य विकसित करणे खूप गरजेचे आहे.
  5. जास्तीत जास्त नोट्स काढून त्याचा अभ्यास करणे सुद्धा आवश्यक आहे.

करियर ची संधी म्हणून एल एल बी – कायद्याचे शिक्षण एक उत्तम शैक्षणिक पर्याय आहे. तुम्ही वैयक्तिक अधिकृत वकील म्हणून सुद्धा काम करू शकता. तसेच तुम्ही इतर क्षेत्रात सुद्धा वेगवेगळ्या पदावर काम करू शकता.


आज आपण वरील लेखात एल एल बी च्या शिक्षणबद्दल थोडक्यात महत्वाची माहिती जाणून घेतली आहे. लवकरच आपण इतर शैक्षणिक विभागाच्या माहिती नियमित पाहण्यासाठी आमच्या वेबसाइट ला भेट देत राहा.

www.latestupdate247.com या वेबसाइट वर सविस्तर शैक्षणिक अपडेट, सरकारी योजना आणि नोकरीच्या जाहिराती इत्यादींचे अपडेट नियमित दिले जाते. कोणत्याही फसवणूक होईल अशा योजनांची किंवा नोकरीच्या जाहिरातींची माहिती या वेबसाइट वर प्रसिद्ध केली जात नाही. वरील माहीती आसपासच्या इतर विद्यार्थ्याना आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना या शिक्षणबद्दल सविस्तर माहिती मिळण्यास मदत होईल, LLB in Marathi, LLB Maharashtra Admission Process,

Leave a Comment