आजच्या लेखात आपण आणखी एका सरकारी योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. ही योजना गरोदर महिलांसाठी राबविण्यात येणार आहे. या योजनेचा नक्कीच गर्भवती महिलांना थोडक्यात फायदा मिळेल. खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा. तसेच ही माहिती तुमच्या सर्व नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा. Matru Vandana Yojana in Marathi 2025, मातृ वंदना योजना फॉर्म 2025, सरकारी योजना माहिती मराठी 2025, matru vandana yojana online form, latest yojana update 2025,
भारताच्या दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या आणि रेषेवरील सर्व गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या वेळेत शारीरिक ताकत नसतानाही काम करावे लागत असते. या गोष्टी मुळे महिला आणि बालक यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन आई व बालक मृत्यूच्या दरात वाढ झाल्यामुळे याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी 1 जानेवारी 2017 पासून मातृ वंदना योजना सुरू करण्यात आलेली आहे. आरोग्यविभाग मार्फत याची अंमलबजावणी केली जाते.
या योजनेमध्ये केंद्र सरकारचा 60% आणि राज्य सरकारचा 40% सहभाग झालेला आहे. 2023 मध्ये मिशन शक्ति च्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे सुधारित matru vandana yojana 2.0 सुरू करण्यात आली.
Matru Vandana Yojana in Marathi 2025
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या अंतर्गत पात्र असणाऱ्या महिलेने अटी / शर्ती व कागदपत्र एनची पूर्तता केल्यानंतर महिलेला पहिल्या बाळासाठी 5000 /- रु रक्कम दोन हप्त्यात तर दुसरे बाळ मुलगी झाली तर जन्माच्या पहिल्याच टप्प्यात 6000 /- रु बँकेच्या खात्यात किंवा पोस्ट ऑफिस च्या खात्यात डी बी टी द्वारे जमा करण्यात येईल.
टप्पा | लाभार्थी अट | पहिल्या बाळासाठी | दुसरे बाळ मुलगी असल्यास एकत्रित लाभ मिळेल |
---|---|---|---|
पहिला हप्ता | राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या सरकारी आरोग्य केंद्रामध्ये गर्भधारणा नोंदणी व शेवट ची मासिक पाळी च्या तारखेपासून सह महिन्याच्या अगोदर कमीत कमी एक प्रसूतिपूर्व तपासणी झालेली असणे गरजेचे आहे. | 3000 /- रु | एकत्रित 6000 /- रु |
दूसरा हप्ता | 1. बाळाची जन्माची नोंदणी 2. बाळाला बी सी जी / ओपीव्हीझीरो / ओपीव्ही 3 मात्रा / पेंटाव्हॅलेन्ट लसीच्या 3 मात्रा किंवा समतुल्य / पर्यायी असणारे लसीकरणाचे प्रथम चक्र पूर्ण करणे गरजेचे आहे. | 2000 /- रु | ——— |
मातृ वंदना योजना उद्दिष्टे :
- आई आणि बाळाचे आरोग्य सुधारावे या दृष्टीने गरोदर महिलेला आणि स्तनदा आईला सकस आहार घेण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा व्हावी.
- जन्माला येणाऱ्या नवीन बाळाचे आरोग्य सुधारण्यासाठी व आई व बाळाचा मृत्यू दरामध्ये घाट व्हा आणि तो नियंत्रणात यावा.
- हा आर्थिक लाभ लिंग गुणोत्तर सुधारणे / स्त्री भ्रूण हत्या अवरोध आणि स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी फायदेशीर ठरेल.
- लाभार्थी कडून आरोग्य संस्था यांच्या सुविधांचा लाभाचे प्रमाण वाढवून संस्थात्म प्रसूती प्रमाण वृद्धिंगत करणे.
- नवीन बाळाच्या जन्मासोबत जन्म नोंदणी मध्ये वाढ व्हावी.
मातृ वंदना योजना फॉर्म 2025 लाभार्थी पात्रता :
कमीत कमी एक ओळखपत्र पुराव्याची झेरॉक्स जोडणे गरजेचे आहे. योजनेच्या लाभासाठी खालील पैकी कुठल्याही एका गटातील असणे गरजेचे आहे.
- कौटुंबिक उत्पन्न प्रतीवर्ष 8 लाख रु पेक्षा कमी असलेले.
- अनू सूचित जाती व जमाती मधील महिला
- 40% किंवा जास्त अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग महिला
- BPL शिधा पत्रिका असणाऱ्या महिला
- आयुष्मान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लाभार्थी असणारी महिला
- ई श्रम कार्ड असणाऱ्या महिला
- किसान सन्मान निधी च्या लाभार्थी शेतकरी महिला
- मनरेगा जॉब कार्ड असलेली महिला
- गरोदर आणि स्तनपान करत असणाऱ्या अंगवडी अंगणवाडी सेविका / मदतनीस / आशा वर्कर
वरील ओळखपत्र सोबत खालील कागदपत्र आणि तपशील देणे गरजेचे आहे :
- लाभार्थी चे आधार कार्ड झेरॉक्स किंवा आधार नोंदणी चे कागदपत्र त्याच्या सोबत विहित केले गेलेले कागदपत्र
- संपूर्ण भरलेले आई व बाल संरक्षण कार्ड ज्यात मासिक पाळी ची तारीख / गरोदर राहिल्याची तारीख आणि प्रसूती पूर्व तपासणी च्या नोंदणी असणे गरजेचे आहेत.
- बँकेच्या पासबूक ची झेरॉक्स
- बाळाचे जन्माचे नोंदणी प्रमाणपत्र झेरॉक्स
- आई आणि बाळ संरक्षण कार्ड मध्ये बाळाचे लसीकरण नोंद असलेल्या पानाची झेरॉक्स
- गरोदर असल्याची नोंद केलेला आर सी एच पोर्टल चा नोंदणी नंबर
- लाभार्थी किंवा कुटुंब सदस्य चा मोबाइल नंबर
- इतर विहित केलेली कागदपत्र
Matru Vandana Yojana in Marathi 2025 खालील प्रमाणे राबविली जाईल
- नवीन लाभार्थी ज्यांची मासिक पाळी ची तारीख मिशन शक्ति च्या मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध झाल्याच्या तारखेच्या नंतर आहे त्यांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 च्या नवीन तत्वानुसार लाभ मिळणार आहे.
- एखाद्या महिलेला PMMVY 1.0 अंतर्गत पहिलं हप्ता घेतला असेल आणि PMMVY 2.0 अंतर्गत रोख लाभ मिळवण्यासाठी पात्र असेल आणि PMMVY 1.0 मध्ये पहिला व दूसरा हप्ता मिळाला असल्यास PMMVY 2.0 अंतर्गत राहिलेला लाभ मिळे शकेल.
- लाभ देण्याचा कालावधी : पहिल्या बाळासाठी शेवट च्या मासिक पाळी च्या तारखेपासून अगोदर असणारा 730 दिवसाचा वेळ कमी करून तो 510 दिवसांवर आणलेला आहे टर दुसरे बाल मुलगी असल्यास च तिच्या जन्म तारखेपासून 210 दिवस पर्यंत संबंधित आरोग्य यंत्रणेकडे द्यावा. लाभार्थी ला दिलेल्या वेळेत अर्ज करणे गरजेचे असून वेळेच्या नंतर लाभार्थी ला लाभ दिला जाणार नाही. हाताने लिहिलेला फॉर्म भरला असेल आणि नवीन पद्धतीने ऑनलाइन फॉर्म भरलेला नसेल तर लाभ दिला जाणार नाही.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 55 च्या दरम्यान असावे. या दरम्यान वय असल्यास च पोर्टल वर नोंद होऊ शकते.
- दिलेल्या मुदतीत शासकीय आरोग्य संस्थेमध्ये नोंद करणे गरजेचे आहे.
- या योजनेचा लाभ महिलेच्या आधार जोडलेल्या बँक खात्यात किंवा किंवा पोस्ट ऑफिस च्या खात्यात जमा करण्यात येईल.
- पगारासोबत मातृत्व ची सूटटी मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- लाभार्थी ला फक्त आधार नंबर च्या आधारावर च लाभ देण्यात येणार आहेत.
- अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जी आर वाचा.
Matru Vandana Yojana Official PDF
मातृ वंदना योजना अधिकृत जी आर : पाहण्यासाठी येथे क्लिक करा
वरील Matru Vandana Yojana Information in Marathi 2025 ची माहिती महत्वाची आहे. या मातृ वंदना योजना अंतर्गत गर्भवती महिलांना किंवा स्तनदा महिलांना आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. म्हणून सदरची माहिती तुमच्या जवळच्या सर्व मैत्रिणींना शेअर करा. जेणकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
www.latestupdate247.com या वेबसाइट दररोज नियमित महत्वाचे योजना अपडेट / नोकरी अपडेट आणि नवनवीन करियर मार्गदर्शन करणारी माहिती प्रसिद्ध करण्यात येते. सर्व माहिती सविस्तर मिळविण्यासाठी नियमित आमच्या वेबसाइट ला भेट देत राहा. सर्व सरकारी योजनांचे अपडेट देण्याचा हेतु हाच आहे की सर्व समाज घटकातील लोकांना आणि गरजू कुटुंबांना योजनेचा लाभ घेता यावा. तसेच सर्व नोकरीच्या शोधात असणाऱ्या गरजू उमेदवारांना नोकरीच्या सर्व जाहिराती त्वरित मिळाव्यात म्हणून आम्ही सर्व महत्वाच्या नोकरी जाहिराती देण्याचा प्रयत्न करत आहोत. latest marathi job update 2025,