Maza Ladka Bhau Yojana 2024, ladka bhau yojana Online Apply

माझा लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला सरकारने मान्यता दिलेली आहे. बऱ्याच युवकांना नोकरीच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
यामुळे बेरोजगारीचे सुद्धा प्रमाण वाढलेले आहे. यासाठी बेरोजगार युवकांना कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी साठीची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आलेली आहे.Maza Ladka Bhau Yojana 2024

या नोकरी संदर्भातील योजनेचा बऱ्याच बेरोजगार युवकांना फायदा होणार आहे. या कार्यक्रम अंतर्गत उमेदवारांना पुढे जाऊन नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी याचा लाभ घ्यायचा आहे. इतरांना सुद्धा या अप्रेंटिस च्या उपक्रमाबद्दल माहिती मिळावी म्हणून शेअर सुद्धा करायच आहे.

ladka bhau yojana Online Apply, maza ladka bhau yojana gov in, majha ladka bhau yojana official website, ladka bhau yojana apply महाराष्ट्र link, rojgar.mahaswayam.gov.in registration,
ladka bhau yojana link, online, ladla bhai yojana maharashtra eligibility, ladka bhau yojana document, ladla bhai yojana maharashtra government, maza ladka bhau yojana, ladka bhau yojana criteria, ladka bhau yojana maharashtra in marathi,

12 वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी 6,000 रुपये / आय टी आय व पदविका असणाऱ्या उमेदवारांसाठी 8,000 रुपये आणि पदवीधर व पदव्युत्तर उमेदवारांसाठी 10,000 रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे.

Maza Ladka Bhau Yojana 2024

योजनेचे स्वरूप :

महाराष्ट्राच्या कौशल्य/रोजगार/उद्योजकता आणि नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष याच्यातर्फे संयुक्तरित्या ही योजना राबविण्यात येणार आहे. उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून देऊन त्यांची क्षमता वाढ केली जाणार आहे. उमेदवारांनी हव्या असलेल्या ठिकाणी नोंदणी करतील. त्यानंतर त्यांची निवड प्रक्रिया राबविण्यात येईल.

  1. 12 वी पास / आय टी आय / पदविका / पदवी आणि पदव्युत्तर पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी करायची आहे.
  2. लहान आणि मध्यम उद्योग / मोठे उद्योग / स्टार्टअप / सहकारी पतसंस्था / शासकीय व निम शासकीय महामंडळे / संजीक संस्था इत्यादीची हव्या असलेल्या मनुष्यबळाची मागणी ऑनलाइन नोंदणी करतील. यातून 10 लाख प्रशिक्षणच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

ladla bhai yojana maharashtra eligibility / ladka bhau yojana criteria

  1. उमेदवाराचे वय कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 35 वर्ष असावे.
  2. कमीत कमी शैक्षणिक पात्रता 12 वी पास / आय टी आय / पदवी / पदव्युत्तर / पदविका असायला हवी. शिक्षण चालू असणाऱ्या उमेदवारांना या योजनेत सहभागी होता येणार नाही.
  3. महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
  4. आधार नोंदणी केलेली असावी
  5. बँक खात्याला आधार जोडलेले असावे.
  6. कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्या वेबसाइट वर नोंदणी करून नोंदणी नंबर मिळवलेला असावा.

ladka bhau yojana maharashtra in marathi – प्रशिक्षण स्वरूप

  • अधिकृत वेबसाइट वर उमेदवारांनी नोंदणी करणे गरजेचे आहे.
  • पात्र उमेदवारांना प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण दिले जाईल.
  • 6 महीने कालावधी चे प्रशिक्षण असणार आहे. या प्रशिक्षण साठी उमेदवारांना शासनाकडून विद्यावेतन दिले जाणार आहे.
  • प्रशिक्षण पूर्ण केल्यास त्यांना काम केलेल्या ठिकाणचे प्रशिक्षण प्रमाणपत्र दिले जाईल.
  • या योजनेत उमेदवारांना वेतन कायदा / राज्य कामगार विमा कायदा / कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा / कामगार नुकसान भरपाई कायदा / औद्योगिक विवाद कायदा लागू होणार नाही.
  • उमेदवारांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे विद्यावेतन देण्यात येईल. खालील प्रमाणे
    • 12 वी पास : 6,000 /- रु
    • आय टी आय / पदविका : 8,000 /- रु
    • पदवीधर / पदव्युत्तर : 10,000 /- रु
  • दर महिन्याचे वेतन शासन तर्फे देण्यात येईल. प्रशिक्षणाची रोजची हजेरी ऑनलाइन घेण्यात येईल. या ऑनलाइन हजेरी च्या आधारे थेट बँक खात्यात दर महिन्याला वेतन जमा केले जाईल.
  • 10 दिवस आणि 10 दिवसापेक्षा जास्त गैर हजर राहिल्यास त्या उमेदवारास त्या महिन्याचे विद्या वेतन मिळणार नाही.
  • दर 2 वर्षांनी आढावा घेऊन गरज असल्यास योजनेत सुधारणा करण्यात येईल.
  • या योजनेमध्ये – NAPS / MAPS पूर्ण केलेले किंवा करत असलेले उमेदवार पात्र होणार नाहीत.
  • या योजनेचा उमेदवाराला एकदाच लाभ घेता येईल.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा

महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची प्रसिद्धी व प्रचार करण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी योजना दूत नेमण्यासाठी ची घोषणा 2024-25 याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये केली आहे. त्याप्रमाणे ग्रामीण भागात प्रत्येकी ग्रामपंचायत साठी 1 आणि शहरी भागासाठी 5,000 लोकसंख्येकरीता 1 यानुसार 50 हजार योजना दूत नेमण्यात येणार आहेत. त्या योजना दूत चे विद्यावेतन याच योजनेतून दिले जाणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना – आस्थापना आणि उद्योग यांची यादी खालीलप्रमाणे

आस्थापना / उद्योगा विभागउदाहरण
खाजगी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगनोंदणी केलेले लघु आणि माध्यम आणि मोठे उद्योग
शासकीय किंवा निमशासकीय आस्थापनाकेंद्र किंवा राज्यशासन अंतर्गत असलेले महामंडळ / आस्थापना
स्टार्टअप्सDPIT – नोंदणी कृत असलेले स्टार्टअप्स
सहकारी संस्थाजिल्हा सहकारी बँक / शेड्यूल्ड बँक / सूत गिरणी / सहकारी तत्वावरील इतर उद्योग /साखर कारखाने
समाजिक संस्थाकंपनी कायदा, 2013 तील सेक्शन 8 अंतर्गत स्थापलेल्या सामाजिक संस्था
सेवहा क्षेत्रामधील खाजगी / सार्वजनिक आस्थापना / उपक्रम / संस्था / कंपन्याCA Fir, / law firm / media / NBFC / NSE / BSE / Retail / Insurance ? Hospitality / Health / Taxation / Logistics / Tourism etc.

maza ladka bhau yojana gov in

या योजनेची थेट लाभाची रक्कम देण्यासाठी आयुक्त कौशल्य विकास / रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांस नियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र सरकार मार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजना 3 डिसेंबर 1974 पासून राबविली जात होती.
ही योजना अधिक चांगल्या प्रकारे राबविण्यासाठी आणि योजनेचा लाभ जास्त उमेदवारांना व्हावा यासाठी वेळेनुसार या योजनेत सुधारणा करणे गरजेचे होते. त्यासाठी जास्तीत जास्त रोजगार संधी उपलब्ध करण्यासाठी योजना सुधारित करण्याचा शासनाचा विचार होता.

वरील योजनेची महत्वाची माहिती आपण सविस्तर पाहिलेली आहे. सदर योजनेची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. ज्यांना आवश्यकता आहे त्यांना याचा फायदा होऊ शकेल.

https://latestupdate247.com या वेबसाइट वर तुम्हाला नियमित सर्व योजनांची / नोकरीची व इतर महत्वाची माहिती रोजच्या रोज मिळेल. त्यासाठी आमच्या वेबसाइट ल नियमित भेट द्या.

आम्ही कोणतीही चुकीची अथवा समाजाची फसवणूक होईल अशी माहिती आम्ही प्रसिद्ध करत नाही. सर्व अधिकृत आणि गरजेची माहिती आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.

Leave a Comment