MMRCL Bharti 2025, Mumbai Metro Rail Corporation Bharti 2025

मित्रानो MMRCL म्हणजेच मुंबई मेट्रो रेल कोर्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी भरती चालू झालेली आहे, जर तुम्ही चांगल्या नोकरीची संधी शोधात असाल तर हि भारती तुमच्यासाठी संधी होऊ शकते. ही भरती ३ पदांसाठी घेतली जात आहे, तर ही पदे भरण्यासाठी एकूण 07 जागा रिकाम्या ठेवण्यात आलेल्या आहेत. या जागा “सहाय्यक महाव्यवस्थापक (स्थापित ), उपअभियांता (स्थापित ), आणि कनिष्ठ अभियंता – II (स्थापित )” या ३ पदांसाठी भरण्यात येणार आहेत. MMRCL Bharti 2025, Mumbai Metro Rail Corporation Bharti 2025

सदर जाहिरात नोकरीच्या अनुषंगाने नक्कीच महत्वाची आहे. म्हणून ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. जेणेकरून नोकरीची गरज असलेल्यांना यचा लाभ घेता येईल. इतर सर्व जाहिराती / योजना आणि करियर टिप्स ची माहिती मिळविण्यासाठी आमच्या https://latestupdate247.com/ या वेबसाइट ला नियमित भेट द्या.

MMRCL Bharti 2025 अर्ज करण्याची पद्धत आणि शेवटची तारीख

Mumbai Metro Rail Corporation Bharti 2025 भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन आहे. अर्ज करण्याची तारीख सुरु झालेली आहे, तसेच ऑनलाइन अर्ज हा तुम्ही 28 डिसेंबर 2024 पर्यंत करू शकता.

पदे आणि त्यांसाठी राखीव जागा

पदाचे नाव रिक्त जागा
Assistant General Manager( सहाय्यक महाव्यवस्थापक )1
Deputy Engineer (उपअभियांता )5
Jr. Engineer (कनिष्ठ अभियंता – II )1

MMRCL Bharti 2025 साठी लागणारी पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि वेतन संरचना

Mumbai Metro Rail Corporation Bharti 2025 शिक्षण पात्रता :

सहाय्यक महाव्यवस्थापक (स्थापित ), उपअभियांता (स्थापित ), आणि कनिष्ठ अभियंता – II (स्थापित ) या पदांसाठी तुमचे शिक्षण हे सिव्हिल इंजिनिअरिंग मधून पदवीधर असलेले पाहिजे तसेच तुम्हाला कमीत कमी २ वर्षांचा अनुभव ही असला पाहिजे. पूर्ण अनुभव आणि शिक्षण पात्रता तपासण्यासाठी खाली देण्यात आलेल्या PDF जाहिरात मध्ये किवा अधिकृत वेबसाईट मध्ये पाहावे लागेल.

वयोमर्यादा :

या भरतीसाठी काही वयाची अट ठेवण्तुयात आलेली आहे. तूमचे वय हे जास्तीत जास्त ३५ वर्षे असणे गरजेचे आहे. जर तुमचे वय हे ३६ च्या आसपास असले तरीही तुम्ही या अर्ज प्रक्रियेस पात्र नसणार आहात, परंतु काही केस मध्ये वयाची अट ही बदलण्यात आलेली आहे म्हणजेच सवलत देण्यात आलेली आहे.

वय श्रेणीनुसार वय सवलत :

  1. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST):
    • वय सवलत : 05 वर्षे
  2. इतर मागासवर्ग (OBC) – नॉन- क्रीमिलेयर :
    • वय सवलत : 03 वर्षे
  3. दिव्यांग व्यक्ती (PWD) :
    • SC/ST: 10 वर्षे वयाची सवलत
    • OBC : 08 वर्षे वयाची सवलत
    • सामान्य प्रवर्ग (Unreserved) : 05 वर्षे वयाची सवलत
  4. 1984 दंगल मध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंब मधील सदस्य / मुले :
    • वय सवलत : 05 वर्षे
  5. माजी सैनिक (Ex – Serviceman ) : अधिक माहितीसाठी Annexure – A मध्ये दिलेली आहे
    • वय सवलत : 05 वर्षे

नोकरीचे ठिकाण :

तुमची निवड जर MMRCL Bharti 2024 पदांसाठी झाली तर तुम्हाला मुंबई येथे नोकरी करण्याची संधी प्राप्त होणार आहे.

वेतन संरचना :

प्रत्येक पदासाठी तुम्हाला वेगवेगळे वेतन देण्यात येणार आहे, खाली यादी मध्ये प्रत्येक पदासाठी कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती वेतन मिळू शकते ते देण्यात आलेले आहे.

  • सहाय्यक महाव्यवस्थापक (स्थापित ): तुम्हाला या पदासाठी कमीत कमी 70,000 ते जास्तीत जास्त 2,00000 रुपये प्रती महा मिळणार आहेत.
  • उपअभियांता (स्थापित ): या पदासाठी तुम्कहाला कमीत कमी 50,000 ते जास्तीत जास्त 1,60,000 रुपये प्रती महा मिळणार आहेत.
  • कनिष्ठ अभियंता – II (स्थापित ) : कमीत कमी 35,280 रुपये ते जास्तीत जास्त 67,920 रुपये प्रती महिना पगार मिळू शकतो.

MMRCL Bharti 2025 गारंटी बॉन्ड

MMRCL Bharti 2024

निवड प्रक्रिया कशी असणार ?

  • तुम्ही जर MMRCL Bharti 2024 साठी अर्ज करू इच्छित असाल तर तुमची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • मुलाखतीचे उमेदवार हे शोर्ट लिस्ट केले जाणार आहेत
  • उमेदवारांची पात्रता आणि त्यांचा त्या पदावरचा अनुभव यावर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे.
  • स्क्रुटिनी कमिटी ही तुम्हाला अजून काही कागदपत्रे मागवण्यास सांगेल,ते तुम्ही तुमच्या जबाबदारी वर पोचवणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाची माहिती

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) ने 2024 साठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 27 नोव्हेंबर 2024 पासून सुरू झाली असून 28 डिसेंबर 2024 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत अर्ज करता येईल.

अर्ज कसा करावा?

अर्ज भरताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात आणि कसा अर्ज करायचा याची सविस्तर माहिती येथे दिली आहे.

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: www.mmrcl.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज प्रक्रिया सुरू करा.
  2. भरती विभाग निवडा: Careers –> MMRCL Recruitment Advertisement 2024-04 या विभागावर क्लिक करा.
  3. फक्त ऑनलाईन अर्ज: अर्ज प्रक्रिया फक्त ऑनलाईन पद्धतीने केली जाते. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.

अर्ज करताना लक्षात ठेवा

  1. संपर्क माहिती: अर्ज करताना तुमचा वैध ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक द्यावा. अर्ज प्रक्रियेतील सूचना आणि अपडेट्स ई-मेलद्वारे मिळणार आहेत.
  2. अपलोड करावी लागणारी कागदपत्रे : तुमचा रिझ्युमे, पासपोर्ट आकाराचा फोटो हा .jpg किवा .jpeg मधून आणि सध्या तुम्ही जिथे कामाला असाल तिथली पगार स्लिप (.pdf) योग्य पद्धतीने अपलोड करा.
  3. पुन्हा एकदा अर्ज तपासा : अर्ज सबमिट करण्याआधी प्रिव्ह्यू चा ऑप्शन देण्यात आलेला आहे तो पाहून सर्व माहिती योग्य भरली आहे का, हे तपासा. अर्ज एकदा सबमिट केल्यानंतर परत तुम्हाला त्या मध्ये काही बदलता येणार नाही .
  4. शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करा: शेवटच्या दिवशी सर्व जणे अर्ज करण्यास जाऊ शकतात, त्यामुळे वेबसाईट तांत्रिक अडचणीमुळे चालणार नाही, अशा अडचणी टाळण्यासाठी शेवटच्या दिवशी अर्ज करण्यापेक्षा लवकर अर्ज करा.

सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी हत्वाच्या सूचना

सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या उमेदवारांसाठी, अर्जासोबत काही कागदपत्रे दिलेल्या पत्त्यावर पाठवावी लागतील. यामध्ये खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

  • अद्ययावत रिझ्युमे आणि पासपोर्ट फोटो.
  • शैक्षणिक आणि कामाचा अनुभव दर्शवणारी प्रमाणपत्रे.
  • वरिष्ठांकडून मिळालेला No Objection Certificate (NOC).
  • मागील पाच वर्षांचे वार्षिक कामगिरी अहवाल (ACR/APR).
  • शिस्तभंग अहवाल (जर लागू असेल तर).

महत्त्वाचे मुद्दे

MMRCL ही नामांकित संस्था असून येथे नोकरी करणे तुमच्या करिअरसाठी महत्त्वाचे ठरू शकते. अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. वेळेत अर्ज करा आणि अर्ज भरताना दिलेल्या सूचनांचे पालन करा.

साठीची प्रक्रिया सोपी आहे. इच्छुक उमेदवारांनी ही संधी गमावू नये. तुमचे कागदपत्र तयार ठेवा, योग्य माहिती द्या, आणि वेळेत अर्ज सादर करा. ही तुमच्या करिअरसाठी योग्य दिशा देणारी मोठी संधी ठरू शकते. MMRCL Bharti 2024

भरतीची अधिकृत अधिसूचना (PDF) येथे पहा...येथे क्लिक करा.

Leave a Comment