खुल्या वर्गातील गुणवंत मुलांना आणि मुलींना परदेशामध्ये उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती या योजनेतून दिली जाणार आहे. या योजनेची माहिती आपण आज सविस्तर पाहणार आहोत. खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे.Unreserved Category Scholarship, open cast sarkari yojana 2024, सरकारी योजना 2024, महाराष्ट्र मराठा समाज योजना 2024, शिष्यवृत्ती योजना 2024 महाराष्ट्र, latest government scheme 2024 maharashtra,
आज आपण उच्च शिक्षणासाठी खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या या योजनेचा तपशील सविस्तर खाली नमूद केलेला आहे. दिलेली माहिती लक्ष पूर्वक वाचा.
सदरची योजना तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. मराठा समाजातील उच्च शिक्षण परदेशात करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
योजनेचा तपशील :
महाराष्ट्र राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग मार्फत 4 ऑक्टोबर 2018 ला खुल्या वर्गातील गुणवंत असणाऱ्या मुला व मुलींना परदेशांत पुढील उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती योजना सुरू केली गेली आहे.
खुला – अनारक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी ज्यांना बाहेरील देशात शिक्षण घ्यायचे आहे व पोस्ट ग्रॅजुएशन, पदवी नंतर डिप्लोमा व पीएचडी अभ्यासासाठी प्रत्येक वर्षी शिष्यवृत्ती चा लाभ घेऊ शकतात.
राज्य सरकार ने दरवर्षी 20 विद्यार्थ्यांना परदेशातील शिष्यवृत्ती मंजूर केलेली आहे.
Unreserved Category Scholarship 2024 – फायदे
- विद्यापीठाने जाहीर केलेले पूर्ण शुल्क सरकार तर्फे दिले आहे
- वैयक्तिक आरोग्य विमा ची पूर्ण रक्कम सरकार देणार आहे.
- राज्य सरकार ने ठरवलेल्या दराप्रमाणे पूर्ण शैक्षणिक काळासाठी निर्वाह भत्ता – युके करिता GBI 9900 व यू के सोडून इतर देशांकरिता USD 15400
- Beneficiary Will Enjoy Airfare for the Trip
योजनेकरिता शैक्षणिक पात्रता :
- पदव्युत्तर पदविका किंवा पदव्युत्तर पदवी साठी प्रवेश घेतलेल्या अर्जदारांनी भारताच्या मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून 60% मार्क सहित पदवी परीक्षा पास केलेली असावी.
- पीएचडी साठी प्रवेश घेतलेल्या अर्जदारांनी भारताच्या मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून 60% मार्क सहित पदव्युत्तर परीक्षा परीक्षा पास केलेली असावी.
- शासनाचे शुद्धीपत्रक : 30/10/2018 प्रमाणे परदेश विद्यापीठाची पदव्युत्तर पडीव पात्रता मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी पीएचडी करिता असलेला अभ्यासक्रम बदलत्या वेळेतील विशेष व वैशिष्ट्य पूर्ण असल्यास ते उमेदवारा या शिष्यवृत्ती साठी अर्ज करू शकणार आहेत.
- पदवी किंवा पदव्युत्तर पदवी हा अभ्यास क्रम अर्जदाराने अर्ज करण्याच्या तारखेला पास केलेला असावा.
अभ्यासक्रम कालावधी :
- पीएचडी – 4 वर्ष किंवा प्रत्यक्ष या पेक्षा कमी असेल तो
- पदव्युत्तर पदवी – 2 वर्ष किंवा प्रत्यक्ष या पेक्षा कमी असेल तो
- पदव्युत्तर पदविका – 1 वर्ष किंवा प्रत्यक्ष या पेक्षा कमी असेल तो
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती पात्रता
- उमेदवार व त्याचे आई वडील हे भारताचे नागरिक व महाराष्ट्राचे रहिवासी असावेत.
- ही योजना खुला / अनारक्षित वर्गासाठी लागू आहे.
- आरक्षित प्रवर्ग मधील जे विद्यार्थी खुल्या प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत. ते या शिष्यवृत्ती साठी पात्र असणार आहेत.
- परदेशातील शैक्षणिक संस्थेतील पी जी / पदवी नंतरचा डिप्लोमा व पीएचडी अभ्यासक्रम / THE ( Times Higher Education ) किंवा QS ( Quacquarelli Symond ) रंकिंग 200 च्या आतमध्ये असणे गरजेचे आहे.
- परदेशामधील शैक्षणिक संस्थेमार्फत विना अट ऑफर लेटर
- कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाख पेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
- अर्जदारच्या कुटुंबामधील कोणत्याही व्यक्तीने या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- अर्ज सादर करताना नमूद केलेल्या वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही.
- या योजनेच्या शाखेसाठी अभ्यासक्रमनुसार खालीप्रमाणे जागा उपलब्ध आहेत.
योजनेसाठी वय मर्यादा :
1 जुलै 2024 रोजी अर्जदाराचे वय पदव्युत्तर पदवी साठी 35 वर्ष व पीएचडी साठी 40 वर्ष पेक्षा जास्त नसावे.
Unreserved Category Scholarship योजनेसाठी उत्पन्न मर्यादा :
- वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 8 लाख पर्यंत आहे.
- पालक किंवा अर्जदार नोकरीला असल्यास त्यांचे आयकर विवरण पत्र / फॉर्म नं 16 व तहसीलदार कींवया नायब तहसीलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकारी यांच्या कडील 2023-24 चे उत्पन्न प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.
Maratha scholarship 2024 Apply Online
- या शिष्यवृत्ती योजनेसाठी प्रत्येक प्रत्येक वर्षी ऑनलाइन पद्धतीने ऑनलाइन अर्ज मागवले जातात.
- पुढील वेबसाइट ला अर्जदाराने भेट द्यावी. – https://www.dtemaharashtra.gov.in/
- अधिकृत वेबसाइट वर अर्जदाराने नोंदणी करणे गरजेचे आहे.
- अर्जदार अर्ज करण्यासाठी येऊ शकत नसेल तर, अशा वेळी टो त्याच्या पालकांना किंवा कुटुंबामधील इतर
- व्यक्तीला Authority Letter देऊन प्राधिकृत करू शकतो.
- पात्रता अटी/ शर्ती तपासून ऑनलाइन पोर्टल वरून प्रशिक्षण संचालनालय मार्फत अर्ज प्राप्त झाल्यानंतर यादी तयार करण्यात येईल.
- या वर्षीचा अर्ज करण्यासाठी 9 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत आहे.
- अर्ज करण्यासाठी पुढील लिंक ला भेट द्या : https://fs.maharashtra.gov.in/
- मुदतीच्या नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्धवट माहिती चे अर्ज सुद्धा स्वीकारण्यात येणार नाहीत.
- आवश्यक कागदपत्र न जोडता अर्ज केल्यास तो अर्ज अपात्र केला जाईल.
- पीडीएफ मध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज करायचा आहे.
योजनेची पीडीएफ जाहिरात : पाहण्यासाठी क्लिक करा
आवश्यक कागदपत्र :
- ओळखीचा पुरावा
- अधिवास दाखला
- उत्पन्न दाखला
- परदेशमधील शैक्षणिक संस्थेचे विना अट ऑफर लेटर
- शिक्षण पात्रतेची प्रमाणपत्र
- उमेदवाराचा पासपोर्ट
- उमेदवार नोकरी करत असल्यास ना हरकत दाखला
Unreserved Category Scholarship in Maharashtra महत्वाचे प्रश्न :
महाराष्ट्राच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत परदेशात उच्च शिक्षण साठी शिष्यवृत्ती योजना राबवली जाते.
वरील दिलेल्या अधिकृत वेबसाइट ल भेट देऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
पोस्ट ग्रॅजुएशन / पदवी नंतरील डिप्लोमा आणि पीएचडी करिता शिष्यवृत्ती देण्यात येते.
नाही
एकूण जागांमध्ये 30% जागा मुलींकरिता राखीव आहे.
www.latestupdate.com ही एक योजना व नोकरी जाहिरात यांची मराठी भाषेत माहिती देणारी वेबसाइट आहे. आमच्या वेबसाइट चा उद्देश फक्त हाच आहे की मराठी तरुण आणि तरुणींना सर्व विभागाच्या सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती वेळेवर मिळतील. त्यामुळे त्यांना हवी असलेली नोकरी मिळवण्यासाठी मदत होणार आहे.
www.latestupdate.com या वेबसाइट वर सर्व सरकारी योजना आणि सर्व नोकऱ्यांचे अपडेट नियमित दिले जाते. कोणतीही फसवणूक होईल अशी माहिती आमच्या वेबसाइट वर प्रसिद्ध केली जात नाही. वरील योजनेची सर्व माहिती लक्षपूर्वक वाचा. तसेच ही योजनेची माहीत तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.