Gharkul Yojana 2025 Maharashtra: आजच्या लेखात आपण आवास योजना / घरकुल योजना याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. गरीब कुटुंबातील लोकांना या सर्व योजनेची माहिती मिळावी तसेच या योजनांचा त्यांना लाभ घेता यावा यासाठी आपण सविस्तर योजनांची माहिती आपण आज पाहणार आहोत. Gharkul Yojana 2025 Maharashtra, घरकुल योजना कागदपत्र माहिती 2025, gharkul yojaan document list 2025,
गरीब कुटुंबांना या योजनेची माहिती मिळावी आणि त्यांना या योजनेचा योग्य तो लाभ घेता यावा या साठी आपण घरकुल व आवास योजनांची माहीती तुम्हाला देणार आहोत. ही माहिती वाचल्यानंतर तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा.
Gharkul Yojana 2025 Maharashtra
महाराष्ट्र शासनातर्फे वेगवेगळ्या आवास व घरकुल योजना त्या त्या प्रवर्गासाठी किंवा कुटुंबांसाठी राबविल्या जातात. त्याची आज आपण सविस्तर महत्वाची माहिती पाहणार आहोत. गरीब कुटुंबांना त्यांचे घर बांधण्यासाठी आर्थिक संघर्ष करावा लागतो. म्हणून सरकारच्या या योजनांच्या आधारे त्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य दिले जाते. जेणेकरून त्यांचे घर बांधणीचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. घरकुल योजना माहिती 2024,
रमाई आवास योजना
ही योजना अनुसूचित जाती व नव बौद्ध घटकांसाठी आहे. या मध्ये 269 चौरस फुटाचे घरकुल मिळणार आहे.
- या योजनेसाठी महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 15 वर्षाचे वास्तव्य असणे गरजेचे आहे.
- बेघर किंवा पक्के घर नसले पाहिजे
- लाभ घेणारी व्यक्ति आर्थिक जात सर्वेक्षण – 2011 ( secc 2011 ) प्राधान्य क्रम यादी बाहेरचा असावा.
सदर योजनेसाठी लाभ खालील प्रमाणे मिळणार आहे :
- ग्रामीण भागासाठी : 1.32 लाख रु
- डोंगराळ / नक्षलवादी भागासाठी : 1.42 लाख रु
- शहरी भागासाठी : 2.50 लाख रु
या योजनेचा अर्ज स्थानिक स्वराज्य संस्था येथे करावा.
शबरी / पारधी / आदिम आवास योजना
ही योजना योजना अनुसूचित जमातीकरिता आहे. या योजनेच्या अंतर्गत 269 चौरस फुट घरकुल मिळेल.
लाभ खालीलप्रमाणे मिळेल :
- ग्रामीण भागासाठी : 1.32 लाख रु
- डोंगराळ / नक्षलवादी भागासाठी : 1.42 लाख रु
- शहरी भागासाठी : 2.50 लाख रु
योजनेची पात्रता :
- या योजनेचा लाभार्थी चे महाराष्ट्रातील 15 वर्षाचे वास्तव्य असणे गरजेचे आहे.
- बेघर किंवा पक्के घर नसले पाहिजे
- लाभ घेणारी व्यक्ति आर्थिक जात सर्वेक्षण – 2011 ( secc 2011 ) प्राधान्य क्रम यादी बाहेरचा असावा.
या योजनेचा अर्ज स्थानिक स्वराज्य संस्था येथे करायचा आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत / वैयक्तिक घरकुल योजना
या योजनेच्या लाभासाठी खाली निकष आहेत.
- लाभ घेणारे कुटुंब विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील असणे गरजेचे आहे.
- कुटुंबांचे उत्पन्न 1.20 लाख रु पेक्षा कमी असले पाहिजे
- कुटुंब बेघर किंवा झोपडी / कच्चेवर किंवा पालात राहणारे असावे.
अनुदान खालीलप्रमाणे मिळेल :
- ग्रामीण भागाकरिता : 1.20 लाख रु
- डोंगराळ / नक्षलवादी भागाकरिता : 1.30 लाख रु
प्राधान्य कोणाला मिळेल :
- पालामध्ये राहणारे कुटुंब ( गावागावात फिरून उपजीविका करणारे )
- घरात कोणीही कमवणारी व्यक्ति नाही / विधवा परीतकत्या किंवा अपंग स्त्री
- पूरग्रस्त क्षेत्रातील कुटुंब
या योजनेचा अर्ज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करायचा आहे.
मोदी आवास घरकुल योजना / Gharkul Yojana 2025 Maharashtra
योजनेचे लाभार्थी :
- आवास प्लस च्या प्रतीक्षा यादीमध्ये नाव असणारे लाभार्थी
- आवास प्लस प्रणाली मध्ये नोंद असलेले पण ऑटोमॅटिक सिस्टम ने रीजेक्ट झालेले पात्र लाभार्थी
- जिल्हा निवड समिति द्वारे शिफारस केलेले लाभार्थी
अनुदान :
- ग्रामीण भाग : 1.20 लाख रुपये
- डोंगराळ / नक्षलवादी भाग : 1.30 लाख रुपये
लागणारी कागदपत्र :
- सात बारा उतरा / मालमत्ता नोंदपत्र
- ग्रामपंचायत प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- मतदान ओळखपत्र
- लाइट बिल
- मनरेगा जॉब कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
स्थानिक स्वराज्य संस्था येथे अर्ज करावा.
पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य
लाभार्थी : केंद्र आणि राज्य पुरस्कृत आवास योजनेला पात्र – बेघर भूमिहीन गरजू
ग्रामीण भाग :
ग्रामीण भागातील घरकुल बांधण्यासाठी जागा नसणाऱ्या लाभार्थी ला – 500 चौरस फुट पर्यंत जागा खरेदी करण्यासाठी मान्यता. प्रत्यक्ष जागेची किंमत किंवा 50,000 /- रु याच्यापैकी कमी असेल आर्थिक सहाय्य
शहरी भाग :
500 चौरस फुट पर्यंत जागेमध्ये स्थानिक प्राधिकरण बांधकामाच्या नियमावली प्रमाणे दोन किंवा तीन लाभार्थी च्या संमतीने दोन किंवा तीन मजली इमारत बांधण्याकरिता प्रत्येक लाभार्थी ला 50 हजार पर्यंत आर्थिक सहाय्य मिळेल.
या योजनेचा अर्ज स्थानिक स्वराज्य संस्था येथे करावा लागेल.
Gharkul Yojana 2025 Maharashtra
प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण
प्रत्येक लाभार्थी ला मिळणारे अनुदान :
- ग्रामीण भाग : 1,20,000 /- रु
- डोंगरी भाग : 1,30,000 /- रु
या योजनेचा लाभार्थी निवडण्याचा अधिकार ग्रामसभेला दिला गेला आहे.
लाभार्थी निवडण्याची प्रक्रिया :
- सामाजिक / आर्थिक जातीचे सर्वेक्षण सन 2011 मधील प्राधान्य क्रम यादी ची माहीती आवास सॉफ्ट वर आहे. या याद्या ग्रामसभेट ठेवून त्यातून लाभार्थी ची निवड केली जाते.
- प्राधान्यक्रम यादी बेघर 1 खोली लाभार्थी / 2 खोली लाभार्थी या च्या नुसार ठरवलेली आहे. ग्रामसभेतून निवड करताना खालीलप्रमाणे प्राधान्य दिला जाईल.
- 16 ते 59 वय गटामधील प्रौढ व्यक्ति नसणारे कुटुंब
- महिला कुटुंब प्रमुख आणि 16 ते 59 वय गटामधील प्रौढ व्यक्ति नसलेले कुटुंब
- 25 वर्षाच्या वरील अशिक्षित / निरक्षर व्यक्ति असणारे कुटुंब
- अपंग व्यक्ति चे कुटुंब ज्यामध्ये शरीराने सक्षम असणारी प्रौढ व्यक्ति नाही
- भूमिहीन कुटुंब ज्यांची उत्पन्न स्त्रोत मजुरी आहे.
- याच्या आधारे ग्रामसभा मांडणी करून प्राधान्यक्रम यादी बनवतील.
या योजनेचा अर्ज ग्रामपंचायत आणि पंचायत समिति येथे करायचा आहे.
प्रधानमंत्री आवास योजना – शहरी
- इन सी टू झोपडपट्टी पुनर्विकास : झोपडपट्टी खाली असणाऱ्या जमिनीवर पात्र झोपडपट्टी धारक असणाऱ्यांसाठी खाजगी सहभागमधून घरे बांधून झोपडपट्टी पुनर्वसन करणे.
- क्रेडिट लिंक सबसिडी योजना : घरे बांधण्याकरिता किंवा सद्यस्थित घरच्या नविणीकरणसाठी 6 ते 7 लाख रुपये च्या गृह कर्जावर कमी व्याजदरात केनदिरी अनुदान तरतूद करते. 6 लाख पर्यंत कर्जाची सवलत देते.
- भागीदारीत परवडणारी घरे : राज्य केंद्रीय एजसी तर्फे किंवा ई डब्ल्यू एस श्रेणीकरिता खाजगी क्षेत्राच्या भागीदारीमधून 1,50,000 /- रु केंद्रीय सहाय्याने परवडणारे गृह निर्माण प्रकल्प उभा करतील. कमीत कमी 250 घरांपैकी 35% ई डब्ल्यू एस साठी.
- लाभार्थी च्या नेतृत्वाखाली वैयक्तिक घर बांधणी / सुधारणा : ई डब्ल्यू एस श्रेणीमधील लोक एकतर नवीन घर बांधणी करू शकता किंवा 1,50,000 /- रु केंद्रीय सहाय्याने + राज्याचे रु 1,00,000 /- रु स्वतचे घर वाढवू शकतील असे तरतूद करते.
महाराष्ट्र शासनातर्फे इतर सुद्धा वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. आपन त्या योजनांची सुद्धा सविस्तर माहिती पुढील लेखात पाहणार आहोत. समाजातील दुर्बल घटकांना वेगवेगळ्या गोष्टींसाठी सहाय्य मिळावे आणि त्यांना सक्षम होता यावे यासाठी योजनांची अंमलबजावणी केली जाते. sarkari yojana 2025, सरकारी योजना 2025 माहिती, sarkari yojaan pdf 2025,
वर दिलेली आवास योजना / घरकुल योजना 2025 माहिती आवडली असेल तर ही माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा. अशाच इतर सर्व महत्वाच्या योजनांची माहीत मिळविण्यासाठी आमच्या www.latestupdate247.com या वेबसाइट ला नियमित भेट द्या. आमच्या वेबसाइट वर नियमित सर्व योजनांची / नोकरीची आणि करियर मार्गदर्शन देणारी माहिती प्रसिद्ध केली जाती. जेणेकरून प्रत्येक माहिती चा तुम्हाला सर्वांना उपयोग होईल. gharkul yojana mahiti marathi,
If you like the above Awas Yojana 2024, Gharkul yojana 2025 information then share this information with your close people. Regularly visit our webiste www.latestupdate247.com to know all other such important plans. All scheme/job and career guidance information is published regulalrly on our website. So that every information will be usefull to you all.