आजच्या लेखात आपण नेहमी प्रमाणे करियर साठी आणखीन एका महत्वाच्या अभ्यासक्रमाची माहिती पाहणार आहोत. आज आपण सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र विषयाच्या बद्दलची महत्वाची माहिती पाहणार आहोत. त्यासाठी लागणारी पात्रता, पुढे जाऊन मिळणाऱ्या आणि आणि इतर माहिती आज जाणून घेऊया. Career in Psychology in Marathi, मानसशास्त्र बद्दल महत्वाची माहिती 2025,
12 वी नंतर विद्यार्थी एका चांगल्या करियर च्या शोधात असतात. बऱ्याचदा काही विद्यार्थ्याना करियर कोणत्या विषयात करावे. याचे योग्य मार्गदर्शन आणि माहिती मिळत नसल्याने त्यांची धांदल उडत असते. म्हणून आपण आज एका उत्तम करियर करता येईल अशा अभ्यासक्रमाची माहिती आज पाहणार आहोत.
मानसशास्त्र विषयात मानवाच्या वागणूक आणि मानसिक गोष्टींचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करण्यात येतो. वैज्ञानिक पध्दतीने मानसिक भावनांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी या शास्त्राचा वापर होतो. या विषयाचा अभ्यास करून विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात करियर करू शकतात. जसे की, Clinical psychology / industrial psychology and organization behaviour / school psychology / forensic psychology / sports psychology / rehabilitation / cognitive nueroscience आणि इतर विविध क्षेत्र उपलब्ध होईऊ शकतात. आपण आणखी खाली लेखात माहिती जाणून घेऊया.
Career in Psychology in Marathi 2025
मानसशास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी पात्रता :
या विषयात येण्यासाठी मानसशास्त्र बी ए किंवा बी ए ऑनर्स साठी प्रवेश घेणे गरजेचे असते. त्यासाठी विद्यार्थी 12 मध्ये कमीत कमी 50% मार्क घेऊन पास झालेला असावा. तसेच पी जी किंवा डिप्लोमा कोर्स सुद्धा करता येतो. त्यासाठी विद्यार्थी कमीत कमी 55% मार्क सहित मानसशस्त्र पदवी पूर्ण केलेली असावा. त्याच्या नंतर एम फील किंवा पी एच डी करता येते ज्या मुळे तुम्हाला करियर करण्यासाठी नवा स्तर प्राप्त होतो. त्यासाठी विद्यार्थ्याला मानसशास्त्रात कमीत कमी 55% मार्क घेऊन पदव्युत्तर पदवी मिळवलेले असणे गरजेचे आहे.
मानसशस्त्र विषयातील करियर च्या संधी मोठ्या प्रमाणात आहेत. सरकारी किंवा खाजगी रुग्णालये / विद्यापीठ / सरकारी संस्था / खाजगी उद्योग किंवा इतर ठिकाणी सुद्धा नोकरी मिळू शकते. मानसशस्त्र स्पेशलायझेशन सोडून इतर नवनवीन क्षेत्र तयार झालेली आहेत. त्यात सुद्धा तुम्ही उत्तम करियर करू शकता.
महत्वाची काही क्षेत्र खालीलप्रमाणे :
- समाजिक मानसशास्त्र :
- व्यसनाच्या अधीन झालेल्या व्यक्तींसाठी व्यसन मुक्ती प्रक्रिया यामध्ये केली जाते. यांची सेवा सरकारी समाजकल्याण विभाग / स्वयंसेवी संस्था व वेगवेगळ्या समाजसुधारणा कामामध्ये सहभागी असणाऱ्या संस्था घेत असतात. या बरोबर कौटुंबिक अडचणी सुद्धा दूर होतात.
- ग्राहक मानसशास्त्र :
- एखादे नवीन उत्पादन लोकांसमोर आणायचे असल्यास त्यासाठी ग्राहक सर्वेक्षण करण्यात येते. यानंतर ग्राहक चाचणी / त्यांच्या गरजा व आवडी निवडी तपासून पाहण्याचे काम यांच्यावर असते.
- औद्योगिक मानसशास्त्र :
- कर्मचाऱ्यांची निवड ही प्रत्येक कंपनीमध्ये काळजीपूर्वक करण्यात येते. त्यामध्ये या मानसशास्त्राची महत्वाची भूमिका असते. मुलाखत देण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांची वागणूक / सादरीकरण व व्यक्तिमत्व या मध्ये तपासले जाते.
स्पेशलायझेशन साठी काही महत्वाचे पर्याय खालीप्रमाणे :
सोशल सायकोलॉजिस्ट :
समाजात असणाऱ्या वर्ण / जात / धर्म / आर्थिक पातळी / निवास / लिंग / वय इतरांच्या आधारे घडणाऱ्या वेगवेगळ्या गटाच्या वागणुकीचा अभ्यास करणारी ही सोशल सायकोलॉजिस्ट शाखा आहे. या मध्ये संशोधन करण्यावर भर देण्यात येतो. यात एक व्यक्तीचा विचार न करता समूहासाठी काम करण्यात येते. जसे की – दारिद्र्य रेषेखाली असणारे कुटुंब / महिला सबलीकरण या नुसार यामध्ये कौंसेलिंग करण्यात येते. त्या समूहास आर्थिक बाजूने सक्षम करण्याचे काम केले जाते.
क्लिनिकल सायकोलॉजी :
नवीन जन्माला आलेल्या बाळापासून ते वृद्ध अवस्थेपर्यंत वयानुसार होत असणाऱ्या मानसिक बदलांचा अभ्यास या मध्ये करण्यात येतो. यात रोगाचे निदान करण / त्याच्यावर उपचार करण / मानसिक असंतुलन दूर करण इत्यादि गोष्टी या शाखेत केल्या जातात. रुग्णांना भेटण्याची वेळ देऊन त्यांच्याशी चर्चा करून उपचार करण्यात येतो. प्रामुख्याने ही सायकॉलॉजिस्ट हॉस्पिटल मध्ये काम करत असतात.
Manasshastra Mhanje Kay in Marathi
इंडस्ट्रियल सायकॉलॉजिस्ट :
या शाखेत कामाच्या ठिकाणी असणाऱ्या वागणुकीचा अभ्यास करण्यात येतो. उत्पादनची क्षमात आणि कामाचा असणारा दर्जा वाढविण्यासाठी कामगारांच्या मानसिकतेला लक्षात घेऊन कार्यक्रम घेण्यासाठी या शाखेची मदत होते.एम बी ए च्या समान दर्जा या शाखेतून एम ए पूर्ण केलेल्या उमेदवाराला दिला जातो. कामगार आणि अधिकारी यांच्या सर्वेक्षणाचे नमुने या शाखेतील तज्ञांना तयार करण्याचे काम करावे लागते. यात काम करण्याकरिता सांख्यिकी आणि रिसर्च ची आवड असणे चांगले ठरते.
फॉरेन्सिक सायकोलॉजी :
या मध्ये अभ्यास केलेले उमेदवार पोलिस व गुन्हे इवभग / संरक्षण किंवा लष्कर विभाग / कायदे संबंधित संस्था इनवेस्टिगेशन ब्युरो अशा ठिकाणी सल्लागार म्हणून काम करू शकतात.
शालेय सायकोलॉजी :
खाजगी शाळा / विद्यापीठ / मानसिक आरोग्य केंद्र आणि समुदाय आधारित उपचार केंद्र / निवासी हॉस्पिटल व रुग्णालय / बाल न्याय कार्यक्रम व खाजगी हॉस्पिटल अशा ठिकाणी काम करता येऊ शकेल.
क्रीडा सायकोलॉजी :
या मध्ये विद्यापीठ स्पोर्ट टीम / व्यवसायिक संस्था / महाविद्यालये क्रीडा संशोधन विशेषज्ञ व सल्लागार अशा इतर ठिकाणी क्रीडा मानसशास्त्र सल्लागार म्हणून काम करू शकतात.
मानसशास्त्रातील पदवी सहित तुम्ही तुमच्या स्वतच्या इच्छेप्रमाणे कला व वैज्ञानिक दोन्ही क्षेत्रात करियर करू शकता. खाजगी आणि सार्वजनिक आरोग्य सेवा / शिक्षण / सामाजिक काम / समुपदेशन असे इतर अनेक पर्याय आहेत जिथे तुम्ही करियर करू शकता. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.
टॅलि कोर्स ची संपूर्ण माहिती, माहिती वाचण्यासाठी लगेच क्लिक करा
Career in Psychology in Marathi 2025
सध्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना करियर करण्यासाठीच्या संधी निर्माण होत आहेत. काही ठिकाणी नोकरी सोबत व्यवसायिक संधी सुद्धा उमेदवारांना मिळत आहेत. म्हणून आज आपण एका महत्वाच्या विषयाबद्दल करियर साठी ची माहिती पाहिली आहे. मानसशास्त्र या विषयाची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी मिळवून तुम्ही चांगली नोकरी मिळवू शकता आणि चांगले पैसे सुद्धा कमवू शकता. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कौशल्यानुसार कामाची संधी मिळेल. मानसशास्त्राच्या पदवी नंतर तुम्हाला स्वतचे क्लिनिक चालू करायचे असल्यास तुम्हाला लोकांशी संबंध वाढवावे लागतील. तसेच तुमच्या क्लिनिक चे मार्केटिंग करणे गरजेचे असेल, त्यासाठी तुम्ही सोशल मीडिया चा सुद्धा वापर करू शकता. या क्लिनिक मधून तुम्ही चांगली सेवा देऊन चांगले उत्पन्न सुद्धा मिळवू शकता. परंतु तुम्ही स्वतचे क्लिनिक सुरू करण्याच्या अगोदर एका उत्तम सायकॉलॉजिस्ट च्या क्लिनिक मध्ये तुमची सेवा देण्याचे काम केल्यास तुम्हाला व्यवसायिक अनुभव मिळू शकते.
नर्सिंग मध्ये करियर कसे करायचे ? लगेच क्लिक करून माहिती वाचा
www.latestupdate247.com ही एक महत्वाचे अपडेट मराठी मधून देणारी वेबसाइट आहे. या वेबसाइट वर नियमित सरकारी योजना, नोकरीच्या जाहिराती आणि करियर बद्दल मार्गदर्शन करणारी माहिती देण्यात येते. सरकारी योजनामुळे सर्वाना लाभ मिळावा आणि योग्य ती माहिती लोकांपर्यंत पोचावी हा हेतु आहे. नोकरीच्या जाहिराती सर्व उमेदवारांना योग्य वेळी मिळणे सुद्धा गरजेचे आहे म्हणून आम्ही सर्व सविस्तर जाहिराती येथे प्रसिद्ध करत आहोत. तसेच बऱ्याच विद्यार्थ्याना कोणत्या विषयात करियर करावे या बद्दल पुरेशी माहीत नसते म्हणून आम्ही आमच्या वेबसाइट मार्फत नवनवीन करियर करण्याच्या संधी कोणत्या विषयात आहेत याची माहिती नियमित देत असतो.वर दिलेली मानसशास्त्र विषयाची माहिती तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.
वेगवेगळ्या विषयांची सविस्तर माहिती रोजच्या रोज मिळविण्यासाठी आमच्या www.latestupdate247.com वेबसाइट ला भेट देत राहा.