2025 Maharashtra Police Bharti:आजच्या लेखात आपण पोलीस भरती च्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. सध्याच्या परिस्थिति मध्ये सरकारी नोकरीच्या शोधात बरेच तरुण आणि तरुणी आहेत. त्यापैकी पोलीस भरती मध्ये सुद्धा लाखो च्या संख्येने उमेदवार सहभागी होतात.
Police Bharti Mahiti Marathi, Police Bharti 2025 Maharashtra, पोलीस भरती प्रक्रिया कशी असते ?
police bharti 2025 maharashtra, police constable salary maharashtra, 9000 police bharti jahirat pdf,
महाराष्ट्र पोलीस भरती अंतर्गत पोलीस खात्यात शहर पोलीस, कारागृह पोलीस शिपाई , राखीव पोलीस दल, ग्रामीण पोलीस शिपाई आणि लोहमार्ग पोलीस शिपाई अशा वेगवेगळ्या विभागत भरती केली जाते.
खाली देण्यात आलेली माहिती नवीन पोलीस भरती करणाऱ्या उमेदवारांसाठी उपयुक्त आहे. या महितीमुळे असलेले गैरसमज नक्कीच दूर होतील. ही माहिती सर्व मित्र मैत्रिणींना आजच शेअर करा.
चला तर मग आपण आता सविस्तर पोलीस भरती प्रक्रियेबद्दल महत्वाची आणि उपयोगी माहिती पाहूया. जेणेकरून नवीन मुलामुलींना पोलीस भरती बद्दल कोणतीही शंका राहणार नाही. तसेच त्यांना या महितीमुळे मनात भरतीबद्दल कोणताही गैरसमज राहणार नाही.
पोलीस भरती साठी सध्या बरेच विद्यार्थी तयारी करण्याकडे वळले आहेत. सरकारी नोकरी कहा पर्याय म्हणून सध्या पोलीस भरती कडे पाहिले जात आहे. पोलीस भरती होणे सोपे नसले तरी बरेच विद्यार्थी मनापासून या नोकरी साठी लागणारी शारीरिक तयारी सोबत अभ्यास सुद्धा करताना आपण पाहतो.
Police Bharti Mahiti Marathi
सध्या बऱ्याच तरुण वर्गाचा कल हा पोलीस भरती कडे वाढत आहे. पहिल्यांदा सुरुवात करणाऱ्या उमेदवारांच्या मनात भरती बद्दल अनेक गैरसमज असतात. त्यासाठी आपण आज पोलीस भरतीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी मोठ्या प्रमाणात आपापल्या विभागाअंतर्गत मोठमोठ्या पोलीस भरती या गरजू गरजवंत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असतात यासाठी बहुसंख्य गरजवंत विद्यार्थी हे त्याची वर्षानुवर्ष शारीरिक व लेखी अशा परीक्षांच्या तयारी या करत असतात .
यातून त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये नक्की काय करायचे यासंबंधी सर्व माहिती आपण या लेखात दिलेली आहे लेख संपूर्ण नीट वाचायचा आहे व जेव्हा केव्हा तुम्हाला पोलीस भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात येईल त्यासंबंधीची सर्व माहिती आपण आपल्या अधिकृत संकेतस्थळावर नेहमी टाकत असतो.
पोलीस भरती मध्ये भरली जाणारी पदे खालीलप्रमाणे :
- शहर पोलीस शिपाई
- ग्रामीण पोलीस शिपाई
- राखीव पोलीस शिपाई
- लोहमार्ग पोलीस शिपाई
- कारागृह पोलीस शिपाई
- चालक पोलीस शिपाई
वेळ विभागात पोलीस भरती करण्यात येते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्हाला हवा तेथे अर्ज करू शकता.
पोलीस प्रशासनामध्ये मुख्यत्वाने शहर पोलीस शिपाई, ग्रामीण पोलीस शिपाई, राखीव पोलीस शिपाई, लोहमार्ग पोलीस शिपाई, कारागृह शिपाई, चालक पोलीस शिपाई या विभागाअंतर्गत शिपाई मगाची ही मुख्य पदे परीक्षा मार्फत भरतली जात असतात.
पोलीस भरती प्रक्रिया कशी असते ?
- शासनातर्फे पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते.
- काही दिवसात ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली जाते.
- अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर उमेदवारांना शारीरिक चाचणी साठी प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जातात
- शारीरिक चाचणी यशस्वी पणे पार पडल्यानंतर मेरिट नुसार पात्र असलेल्या उमेदवारांना लेखी चाचणी करिता बोलवले जाते.
- शारीरिक चाचणी मधून लेखी साठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची काही दिवसानंतर लेखी परीक्षा घेण्यात येते.
- लेखी परीक्षा झाल्याच्या नंतर अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येते.
- त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र तपासणी केली जाते.
- निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणकरिता वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात येते.
- प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना आवश्यक असलेल्या ठिकाणी नियुक्ती दिली जाते.
Police Bharti Maharashtra Eligibiltiy
- पोलीस भरती साठी मुले आणि मुली दोघेही अर्ज करू शकतात.
- दोघांसाठी ही प्रवर्ग नुसार जागा उपलब्ध करून दिलेल्या असतात.
शैक्षणिक पात्रता :
- यासाठी उमेदवार हा बारावी पास आयटीआय किंवा डिप्लोमा पास म्हणजेच पदवीधर असणे गरजेचे असणार आहे.
पोलीस भरती शारीरिक पात्रता :
- मुलांना शारीरिक चाचणी साठी पात्र होण्याकरिता ऊंची 165 सेमी असावी आणि मुलींसाठी 150 सेमी असावी.
- राखीव पोलीस बल साठी 168 सेमी ऊंची असणे गरजेचे आहे.
- चालक पदाचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे वाहन चालविण्याचा परवाना असणे गरजेचे आहे.
- बॅंड्समन साठी नमूद असलेल्या वाद्य पैकी एक वाद्य वाजवण्याची पात्रता असणे गरजेचे आहे.
पोलीस भरती मध्ये निवड होण्यासाठी उमेदवारांनी शारीरिक चाचणी साठी गोळा फेक, 100 मीटर धावणे आणि 1600 मीटर धावणे याची तयारी करणे गरजेचे आहे. एकूण 50 मार्क साठी शारीरिक चाचणी परीक्षा घेतली जाते. तसेच लेखी परीक्षा ही 100 मार्क ची घेतली जाते.
- मुलांना 1600 मीटर धावण्यासाठी 5 मिनिटे 10 सेकंड एवढा वेळ असतो
- मुलींना 800 मीटर धावण्यासाठी 2 मिनिटे 50 सेकंड एवढा वेळ असतो
- 100 मीटर साठी मुलींना 13.50 सेकंड एवढा वेळ असतो.
- 100 मीटर साठी मुलांना 11.50 सेकंड एवढा वेळ असतो.
- मुलांना 8.50 मीटर गोळाफेक तर मुलींना 6 मीटर गोळाफेक असतो
पोलीस भरती शारीरिक चाचणी ची तयारी 1 वर्ष ते 6 महीने अगोदर करणे गरजेचे आहे. प्रत्येकजण स्वतच्या सोयीनुसार तयारी करत असतो.
पोलीस भरती लेखी परीक्षा 2025
लेखी परीक्षेसाठी बुद्धिमत्ता चाचणी, अंक गणित, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या विषयांचा समावेश असतो.
प्रत्येक विषयाचे 25 मार्क चे 25 प्रश विचारले जातात. चालू घडामोडी साठी तुम्ही रोजचे वृत्तपत्र, बातम्या आणि इतर नियमित रोजच्या घडणाऱ्या घडामोडी पाहून शकता.
झालेल्या मागील भरती च्या प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवणे गरजेचे असते.
तुम्ही शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेच्या तयारी साठी अकादमी मध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. ज्या ठिकाणी तुम्हाला चांगले मार्गदर्शन मिळेल.
लेखी परीक्षेत तुम्ही बुद्धिमत्ता चाचणी मध्ये सांकेतिक लिपी / अक्षर माला / अंक मालिका / दिन दर्शिका / नाते संबंध / आकृति इतर बाबींचा समावेश असतो त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे.
परीक्षेत तुम्ही अंकगणित चाचणी मध्ये बेरीज / वजाबाकी / गुणाकार / भागाकर / टक्केवारी / सरळव्याज / ल सा वी आणि म सा वी / गुणोत्तर / काल काम वेग / वर्गमूळ आणि इतर बाबींचा अभ्यास करायचा आहे.
लेखी परीक्षेत तुम्ही मराठी व्याकरण चाचणी मध्ये शब्दांच्या जाती / वर्ण माला / समास / संधी / अलंकार / अव्यव / वाक्प्रचार / समानार्थी व विरुद्धार्थी शब्द इत्यादि बाबींचा अभ्यास करावा लागेल.
परीक्षेत तुम्ही सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी चाचणी मध्ये महाराष्ट्राची माहिती / नद्या / पर्वत रांगा / जगाचा भूगोल / चालू घडामोडी / राज्य घटना / ऐतिहासिक बाबी इत्यादीचा अभ्यास करावा लागेल.
सदरची दिलेली माहिती महत्वाची असून तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.
Police Bharti Mahiti Marathi
www.latestupdate247.com या वेबसाइट वर सर्व प्रकारच्या सरकारी योजना, नोकरीच्या जाहिराती आणि इतर महत्वाचे अपडेट नियमित दिले जातात. शैक्षणिक योजना, आर्थिक योजना तसेच इतर गरजेच्या असलेल्या सरकारी जाहिराती सविस्तर दिल्या जातात.
कोणतीही फसवणूक करणारी माहिती आम्ही देत नाही. आमच्या वेबसाइट चा उद्देश हाच आहे की सर्व महाराष्ट्रातील लोकांना नोकरीच्या आणि सरकारी योजनांच्या जाहिराती मराठी भाषेतून सविस्तर मिळव्यात.
All types of government schemes, job advertisement and other important updates are provided regularly on this website www.latestupdate247.com. do not provide any misleading information. The aim of our website is to provide all the people of maharashtra with detailed job and government scheme advertisments in marathi language.