आजच्या लेखात आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल ची काही महत्वाची माहिती पाहणार आहोत. ही सदर माहिती अभ्यासासाठी सुद्धा फायदेशीर ठरू शकतो तसेच सर्वांना त्यांच्याबद्दल सर्व माहीती मिळावी हा हेतु आहे. सदर माहिती तुमच्या पर्यंत पोचल्यास इतरांना सुद्धा शेअर करा. महात्मा ज्योतिबा फुले माहिती मराठी, mahatma jyotiba phule Information, mahatma jyotiba phule mahiti in marathi,mahatma jyotiba phule information in marathi 2024, marathi info,
महात्मा फुले यांचे अतिशय मोलाचे कार्य आपल्या सर्वांना लाभलेले आहे. शैक्षणिक कामासाठी त्यांनी मोलाचे कार्य केलेले आहे. तसेच शेतकरी बांधव, अस्पृश्य लोक, महिला यांसाठी सुद्धा खूप महत्वाचे कार्य त्यांनी केलेले आहे. आपण आज त्यांच्या महत्वाच्या कामाबद्दल आणि त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
महात्मा फुले यांनी मागासलेल्या जाती / अनुसूचित / दलित आणि इतर वंचित असलेल्या समाजातील लोकांच्या कल्याणासाठी काम केलेले आहे. मागास असलेल्या आणि अनुसूचित असणाऱ्या जातींना सारखे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी त्यांच्या अनुयायी असणाऱ्या लोकांसोबत मिळू सत्यशोधक या समाजाची स्थापना केली होती.
mahatma jyotiba phule information in marathi 2024
ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. त्यांचे मूळ गाव कटगुण जिल्हा सातारा मधील आहे.त्यांचे मूळ आडनाव गोऱ्हे हे आहे. ज्योतिबा फुले हे क्षत्रिय माळी समाजातील होते. त्यांचे पूर्वज पुणे येथे फुलांचा व्यवसाय करत होते. म्हणून गोऱ्हे आडनाव ऐवजी फुले आडनाव झाले.महात्मा ज्योतिबा फुले यांचे आजोबा शेटीबा/ त्यांचे वडील गोविंदराव / आई चिमणाबाई ( ज्योतिबा फुले हे 1 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले )
1840 मध्ये ज्योतिबा यांचे 13 व्या वर्षी धनकवडी च्या खंडोजी नेवसे पाटील यांच्या मुलीशी म्हणजे सावित्रीबाईंशी लग्न झाले. 1841 ते 1847 यामध्ये उर्दू शिक्षक गफार बेग मुनशी व धर्मोपदेशक लिजिट साहेबांच्या प्रयत्नाने पुण्यामधील स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये ज्योतिबा यांचे इंग्रजी शिक्षण झाले. 1848 मध्ये पुण्यामध्ये ब्राम्हण मित्राच्या लग्नाच्या वरातीमध्ये अपमान झाल्यामुळे ज्योतिबा ही समाज सुधारणा याकडे वळले.
महात्मा फुलेंचे महिलांसाठी केलेली कामे
- स्त्री शिक्षण :
- 1848 मध्ये पुण्यातील बुधवार पेठ येथील भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.
- 3 जुलै 1851 मध्ये बुधवार पेठ मधील चिपळूणकर यांच्या वाड्यामध्ये मुलींसाठी दुसरी शाळा सुरू केली.
- 17 सप्टेंबर 1851 मध्ये रास्ता पेठेत मुलींसाठी तिसरी शाळा सुरू केली.
- 16 नोव्हेंबर 1852 साली ज्योतिबा यांच्या शैक्षणिक कामाची दखल घेऊन इंग्रज सरकारने पुणे येथील विश्रामबाग मध्ये मेजर कॅन्डि च्या हस्ते ज्योतिबा फुले यांचा सत्कार केला गेला.
- विधवा महिलेचा पुनर्विवाह :
- 1864 मध्ये त्यांनी पुण्यातील गोखले यांच्या बागेत पहिला पुनर्विवाह घडवला.
- बाल हत्या प्रतिबंधक गृह स्थापना :
- 1863 साली चुकून वाकडे पाऊल टाकलेल्या विधवांची अडचणीतून सुटका करण्याकरिता ज्योतिबा यांनी स्वतच्या घरी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची सुरुवात केली.
महात्मा फुले यांचे शेतकऱ्यांसाठी केलेले काम
शेतकऱ्यांची स्थिति सुधारावी म्हणून ज्योतिबा फुले यांनी खाली सूचना दिल्या होत्या.
- तलाव/ बंधारे/ धरणे बांधून शेतीसाठी पाण्याचा पुरवठा उपलब्ध करावा .
- पिकाच्या संरक्षणासाठी शेतकरी बांधवांना बंदुकीचे परवाने मिळायला हवेत.
- कालव्यातील पानी वेळेवर मिळायला हवे.
- 1877 मध्ये दुष्काळमध्ये धनकवडीत पीडित विद्यार्थ्यांसाठी विक्टोरिया बालकाश्रम ची स्थापना केली.
- 1888 साली ड्यूक ऑफ कॅनॉट भारत भेटीवर आले असताना ज्योतिबा यांनी शेतकरी वेशात त्यांची पुणे येथे भेट घेतली आणि शेतकऱ्यांच्या हलाखीचे दर्शन दिले.
- 1877 मधील दुष्काळमध्ये पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये ज्योतिबा यांच्या मदतीने शेतकरी बांधवांनी खत फोडीचे बंड यशस्वी पणे पार पाडले
Mahatma Jyotiba Phule Mahiti in Marathi
- शालेय काळात ज्योतिबा यांच्या मनावर छत्रपती शिवाजी महाराज आणि जॉर्ज वॉशिंग्टन च्या चारित्राचा प्रभाव पडला होता.
- 1876 ते 1882 मध्ये महात्मा फुले हे पुणे नगरपालिका चे सदस्य ( नगरसेवक ) होते.
- नगसेवक असण्याच्या काळात त्यांनी पुणे मार्केट इमारत बांधणे आणि लॉर्ड रिपन ला मानपत्र देणे या गोष्टींना विरोध करून तो खर्च शैक्षणिक कामासाठी वापरण्यात यावा अशी शिफारस केली.
- 1869 मध्ये महात्मा फुले यांनी रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून त्यांच्या जीवनावर सर्वात पहिलं प्रदीर्घ पोवाडा रचला.
- छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी व्यवस्था सरकारने घ्यावी असा ज्योतिबा फुले यांनी अर्ज केला होता.
- पुण्यात 1870 मध्ये फुले यांनी पहिली शिवजयंती साजरी केली होती. त्याच्या नंतर लोकमान्य टिळक यांनी 1895 सालापासून शिवजयंती ला राष्ट्रीय स्वरूप दिले.
- ज्योतिबा फुले यांच्या आशीर्वादाने 1877 मध्ये दीनबंधु ही वृत्तपत्र चालू करण्यात आले. त्याचे संपादक कृष्णराव भालेकर ही होते.
- महात्मा फुले यांनी डोंगरी तुरुंग मधून टिळक आणि आगरकर यांची सुटका झाल्यावर मुंबई येथे त्यांचा सत्कार केला.
- मुंबईच्या जनतेच्या वतीने राव बहादूर विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी 11 मे 1888 मध्ये ज्योतिबा यांना महात्मा ही पदवी दिली.
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचा हू वेअर द शूद्राज ? हा ग्रंथ फुले यांना समर्पित केला.
ज्योतिबा फुले यांचे 28 नोव्हेंबर 1890 साली झाले. ज्योतिबा यांनी त्यांच्या मृत्यू पत्रात त्यांचे दहन न करता परस दरात मिठात घालून पुरण्यात यावे असे लिहिले होते. परंतु त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही.
महात्मा ज्योतिबा फुले माहिती मराठी 2024
- 1851 मध्ये अस्पृश्य व्यक्तीच्या मुलांसाठी नाना पेठ येथे पहिली शाळा सुरू केली, ती बंद पडली
- 1852 मध्ये अस्पृश्यांच्या मुलांकरिता वेताळ पेठ या ठिकाणी शाळा सुरू केली.
- 1853 साली पुणे येथे महार / मांग इतर अस्पृश्य लोकांना विद्या शिकवणारी मंडळी ही संस्था स्थापन केली.
- 1858 अस्पृश्यांच्या मुलांकरिता तिसरी शाळा सुरू केली.
- 1877 मध्ये दीनबंधु या वृत्त पत्रामधून समाजिक रूढी – परंपरा आणि अस्पृश्यांच्या बदलाचे विचार मांडले.
24 सप्टेंबर 1873 मध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना
- सीताराम आल्हाट आणि राधाबाई निंबकर यांचा सत्यशोधक प्रकारे विवाह लावला. – डिसेंबर 1873 मध्ये
- नारायण मेघाजी लोखंडे ही सत्य शोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष होते.
- नारायणराव कडलक ही सत्य शोधक समाजाचे कार्यवाहक होते.
- 17 एप्रिल 1911 रोजी पुणे येथे सत्यशोधक समाजाचे पहिले अधिवेशन झाले.
- स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावरू ही अध्यक्ष होते.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथाला सत्य शोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ असे मानले जाते. चांगले काम करण्यासाठी कधीही चुकीच्या मार्गाचा अवलंभ करू नका तसेच कोणी तुम्हाला कशाही पद्धतीने मदत करत असेल तर त्या पासून लांब जाऊ नका. तुमच्या संघर्षामध्ये सामील असणाऱ्यांना कधी जात विचारू नका. असे ज्योतिबा फुले यांचे विचार होते.
महात्मा ज्योतिबा फुले यांची बद्दल आपण वरील लेखात महत्वाची माहिती सविस्तर पाहिलेली आहे. अभ्यासक्रमच्या अनुषंगाने सुद्धा ही माहिती विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे. ही माहीत इतर लोकांना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना महत्वाची माहिती मिळू शकेल. यशाच्या इतर महत्वाच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://latestupdate247.com/ वेबसाइट ला नक्की भेट द्या.
आमच्या https://latestupdate247.com/ या वेबसाइट वर सर्व महत्वाची माहिती, सरकारी योजनांची सविस्तर माहिती तसेच महत्वाच्या नोकरीच्या जाहिराती ची सविस्तर नियमित माहिती दिली जाते. सर्व अपडेट त्वरित मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट ला भेट देत रहा.
Our https://latestupdate247.com/ provides all important information, detailed information about government schemes and detailed regular information about important job advertisements. keep visiting our website to get all updates instantly. Share this information to all of your friends.