आजच्या लेखात आपण काही महत्वाच्या योजना पाहणार आहोत. ज्या फक्त खास महिलांसाठी सुरू केलेल्या आहेत. ज्या योजनांचा महिलाना लाभ होऊ शकेल अशा योजनांची माहिती आपण पाहणार आहोत. सर्वांनी सदरची दिलेली योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोचवण्याचे काम करायचे आहे. Mahilansathi Yojana 2024-25, Mahila Yojana 2024 In Marathi, mahilaa yojana scheme in marathi, mahila samridhi yojana in marathi, maharashtra yojana 2024, maharashtra yojana for girls, maharashtra yojana for women, maharashtra yojana whatsapp group link, marathi yojana list 2024,
आज आपण सविस्तर माहिती न पाहता काही महिलांसाठी असलेल्या योजणाची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. उद्देश फक्त हाच आहे की या योजनांचा फायदा काय आहे आणि कोणासाठी आहे ही तुम्हा सर्व लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे.
खाली दिलेली माहिती तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करा. जेणेकरून त्यांना या योजनेबद्दल माहिती मिळेल. सरकारी योजना 2024, महिलांसाठी सरकारी योजना 2024, महिला योजना 2024 महाराष्ट्र, महाराष्ट्रातील महिलांसाठी योजना,
लेक लाडकी योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, मनोधैर्य योजना या उपयोगी योजनांची माहिती आम्ही आमच्या वेबसाइट वर देणार आहोत. संपूर्ण सविस्तर माहिती सुद्धा लवकर देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या काही प्रमाणात आवश्यक असलेली माहिती खाली नमूद केलेली आहे.
Mahilansathi Yojana 2024-25
योजना यादी :
- लेक लाडकी योजना
- माझी कन्या भाग्यश्री योजना
- मनोधैर्य योजना
वरील तिन्ही योजनांच्या माहिती चा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. या तिन्ही योजना मुली आणि महिलांसाठी महत्वाच्या आणि उपयोगी सुद्धा आहेत. या योजनेचा लाभ सर्व मुली व महिला यांना मिळावा या हेतु ने आम्ही माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करत आहोत.
लेक लाडकी योजना – Lek Ladki Yojana in marathi
या योजनेअंतर्गत मुलींना 1 लाख 1 हजार रु आर्थिक मदत केली जाते. गरीब कुटुंबातील मुलींना याचा नक्की फायदा होईल. या योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करावा लागतो.
या योजनेचे उद्दिष्ट : असे आहे की महाराष्ट्रातील मुलींचा जन्मदर वाढवणे आणि मुलींना शिक्षणाकरिता वाव मिळवणून देणे या साठी ही योजना सुरू केली गेली आहे.
मुलीचा जन्म जल्यांनात झाल्यानंतर तिच्या पालन आणि शिक्षण या साठी आर्थिक मदत या योजनेतून होणार आहे.
लेक लाडकी या योजनेसाठी पात्रता :
- केशरी आणि पिवळे रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबातील मुलींसाठी या योजनेतून मदत मिळणार आहे.
- महाराष्ट्राचे कायमचे रहिवासी असणे गरजेचे आहे.
- 1 लाख पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असेल हवे
- आर्थिक दृष्ट्या कुटुंब मागास असावे.
- कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेली असणे गरजेचे आहे.
- कोणीही कुटुंबातील व्यक्ति सरकारी नोकरीस नसावी
लेक लाडकी योजना कागदपत्र :
- केशरी / पिवळे रेशन कार्ड
- आधार कार्ड / आईचे सुद्धा
- मुलीचा जन्माचा दाखला
- आई नसल्यास मुलीच्या वडिलांचा दाखला
- उत्पन्न दाखला – वार्षिक
- पत्ता बरोबर आहे याचा पुरावा
- बोना फाईड
- 5 वा हफ्ता घेतेवेळी विवाहित नसल्याचा दाखला
- स्वयंघोषणा पत्र
- बँक पासबुकची प्रत
- 18 वर्ष झाल्यानंतर मुलीचे मतदान कार्ड किंवा मतदान यादीला नाव आहे याचा दाखला
माझी कन्या भाग्यश्री योजना – Majhi Kanya Bhagyashri Yojana in Marathi
ही योजना 1 एप्रिल 2016 ला सुरू केली गेली. या योजनेचा हेतू मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक दृष्ट्या व्यवस्थापन करणे हा आहे. महिला व बालविकास विभागातर्फे ही राबविली जाते.
दारिद्र्य रेषेखालील असलेल्या कुटुंबांमध्ये जन्मणाऱ्या दोन मुलींसाठी या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. तसेच दारिद्र्य रेषेवरील कुटुंबांमध्ये जन्म घेणाऱ्या मुलींनासुद्धा या योजनेतून सहाय्य दिले जाणार आहे.
1 ऑगस्ट 2017 पासून वार्षिक उत्पन्न 7.50 लाख रुपये असणाऱ्या सर्वांसाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे. ज्या पालकांनी पहिली मुलगी झाल्यानंतर कुटुंब नियोजन केले आहे त्या मुलीच्या नावे 50 हजार सरकार बँक खात्यात जमा करणार आहे. तसेच दोन मुली झाल्यानंतर कुटुंब नियोजन केल्यास दोन्ही मुलींसाठी प्रत्येकी 50 हजार सरकार तर्फे बँक खात्यात जमा केले जाणार आहे.
अधिक माहिती साठी महिला व बालविकास विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या
माझी कन्या भाग्यश्री योजना लागणारी कागदपत्र :
- मुलीचे वडील कायमचे महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे आहे. रहिवासी प्रमाणपत्र असावे.
- एक मुलगी झाल्यावर शस्त्र क्रिया केल्याचा दाखला
- दोन मुली झाल्यावर शस्त्र क्रिया केल्याचा दाखला
- अर्जदाराचे आधार कार्ड
- बी पी एल रेशन कार्ड
- मिळकत दाखला
- मोबईल नंबर
- मुलगी आणि आई चे बँक पासबुक
- पासपोर्ट फोटो
मनोधैर्य योजना – Manodhairya Yojana Marathi
- या योजनेत अॅसिड व बलात्कार हल्ल्यात पीडित असलेल्या महिला आणि बालकांना आर्थिक सहाय्य दिले जाते.
- त्यांना मानसिक त्रासातून सावरण्याच काम ही योजना करते.
- पीडित व्यक्तीला 1 लाख रु ची मदत केली जाते आणि विशेष गोष्टीसाठी 10 लाख रु पर्यंतची आर्थिक मदत योजनेतून केली जाते.
- त्या पीडित असणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असलेल्या लोकांसाठी व त्या व्यक्ति साठी निवारा, समुपदेशन, वैद्यकीय उपचार आणि कायदेशीर मदत व शिक्षण आणि व्यवसायिक प्रशिक्षण दिले जाते.
- या योजनेचा अर्ज करण्यापासून ते अर्थी मदत पोचवण्यापर्यंत ची प्रक्रिया राज्य, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांना देण्यात आलेली आहे.
मनोधैर्य योजना आर्थिक मदतीची थोडक्यात माहिती :
- घडलेल्या घटनेमुळे मानसिक धक्का बसून महिलेला अपंगत्व किंवा मतिमंदत्व आल्यास 10,00,000 रु पर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येईल.
- सामूहिक बलात्कार / तीव्र इजा झालेली असल्यास 10,00,000 रु पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाईल.
- घटनेमुळे महिलेचा मृत्यू झाल्यास :
- ती महिला कुटुंबातील कमवणारी महिला असेल तर : 10,00,000 रु पर्यंत आर्थिक सहाय्य
- कमवणारी महिला नसेल तर : 10,00,000 रु पर्यंत आर्थिक सहाय्य
- बलात्कार मधील अन्य घटनेची पीडित असल्यास : 3,00,000 रु पर्यंत आर्थिक सहाय्य
- बालक लैंगिक अत्याचार मध्ये बालकाला लिंगभेद न करता अपंगत्व किंवा मतिमंदत्व आल्यास : 10,00,000 रु पर्यंत मदत
- बालक लैंगिक अत्याचार इतर घटनेचा पीडित महिला असल्यास : 3,00,000 रु मदत करण्यात येईल.
- अॅसिड हल्ल्यास बालक किंवा महिला यांना शारीरिक हानी किंवा अपंगत्व आल्यास : 10,00,000 रु मदत करण्यात येणार आहे.
- अॅसिड हल्ल्याच्या इतर घटनेची पीडित महिला असेल तर : 3,00,000 रु पर्यंत मदत करण्यात येणार आहे.
यात मंजूर झालेल्या रकमेपैकी 75% रक्कम 10 वर्ष साठी पीडित व्यक्तीच्या नावावर बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवली जाईल आणि आणि 25% रक्कम पीडित व्यक्तीला दिले जातील यात 30 हजार एवढी रक्कम वैद्यकीय खर्चासाठी असेल
Mahilansathi Yojana 2024-25
आपण वरील लेखात काही योजनांची थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. याच योजनांची सविस्तर माहिती आपण लवकरच देणार आहोत. महाराष्ट्रातील सर्व योजनांची माहिती तुम्हाला आमच्या latestupdate247.com या वेबसाइट वर मिळतील. mahila yojana in marathi.
ही योजनांची माहिती शेअर करायला विसरू नका. सर्वांना या योजनेचा लाभ मिळावा या साठी तुम्ही सुद्धा दिलले माहिती एकमेकांना पुढे शेअर करत राहा.