आज आपण महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. सदर योजना शेतकऱ्यांसाठी सध्याच्या काळात खूप महत्वाची आणि फायदेशीर ठरणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणीतून बाहेर येण्यासाठी या योजनेमुळे फायदा होईल. Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024,
महाराष्ट्रामध्ये मार्च 2024 च्या शेवट पर्यंत एकूण 47.41 लाख एवढे कृषि पंप या ग्राहकांना महावितरण मार्फत वीज पुरवली जाते. एकूण ग्राहकांपैकी 16% ही कृषि पंप चे ग्राहक आहेत. ऊर्जेच्या एकूण वापरातील 30% वापर हा शेती विभागासाठी केला जातो.
सध्याचा कृषि विभागातील एकूण वर्षाचा विजेचा वापर 39 हजार 246 द.ल.यू आहे. या विजेचा उपयोगा कृषि पंप साठी केला जातो. जागतिक हवामानातील बदल व नियमित नसणाऱ्या पावसामुळे महाराष्ट्रातील शेती व्यवसायावर परिणाम झालेला आहे. शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट आलेले आहे. शेतकरी अशाने अडचणीत आलेला आहे. या अडचणीला अनुसरून राज्य सरकार ने महाराष्ट्रातील 7.5 एच पी च्या कृषि पंप साठी मोफत वीज देण्याचे ठरविलेले आहे.
शेती ही मुख्यत: पावसावर आधारित असते. गेल्या काही काळात वातावरण बदलामुळे शेतकऱ्यांचे बऱ्याच प्रमाणात नुकसान होत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या आधारासाठी आणि उपयोगासाठी त्यांना मोफत वीज पुरवठा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या रहिवासी असणाऱ्या / 7.5 एच पी शेती पंप असणाऱ्या आणि महावितरण कडून वीज घेतलेली असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.
सदर असणारी योजना ही 5 वर्षांसाठी राबविली जाईल. म्हणजे मार्च 2029 पर्यंत ही योजना अमलात असेल. इतर निर्णय योजनेचा 3 वर्षांनी आढावा घेतले जाणार आहे. आणि त्यानंतर पुढील निर्णय घेतले जाणार आहेत.
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024
शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना 2024 ची घोषणा करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील 44 लाख 3 हजार शेतकऱ्यांच्या 7.5 एच पी च्या पंप साठी मोफत वीज पुरविण्यात येणार आहे. यासाठी 14 कोटी 760 रुपये अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे.
महावितरण च्या ग्राहकांना मदत करण्यासाठी आणि शेतकऱ्यांची थकबाकी वाढून न देण्याच्या हेतूने ही Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 राबविली जाणार आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये हवामान बदलामुळे शेतकऱ्यांना नुकसान भोगण्याची वेळ आलेली आहे. म्हणून एप्रिल 2024 पासून या योजनेच्या अंतर्गत 7.5 एच पी शेती पंप असलेल्या शेतकऱ्यांना त्या पंप साठी मोफत वीज दिली जाणार आहे.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 कालावधी :
ही योजना 5 वर्षांकरिता एप्रिल 2024 पासून मार्च 2029 पर्यंत राबविली जाणार आहे. परंतु 3 वर्षानंतर योजनेचा आढावा घेऊन पुढील काळासाठी राबविण्याच्या बाबतीत निर्णय घेतला जाईल.
पात्रता :
महाराष्ट्र राज्यामधील 7.5 एच पी चे शेती पंप असणारे सर्व शेतकरी ग्राहक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
योजनेची अंमलबजावणी :
एप्रिल 2024 पासून मोफत वीज पुरवठा देण्यात येणार आहे. वीज बिल माफ केल्याच्या नंतर सदर विजेच्या दराच्या सवलती पोटी रक्कम सरकारकडून महावितरण कंपनीस अग्रीम स्वरूपात देण्यात येईल. सध्या रु 6985 कोटी रुपये एवढी सवलत वीज बिल माफी नुसार 7775 कोटी रुपये अशी सवलत म्हणून वार्षिक 14,760 कोटी रुपये शासनामार्फत महावितरण देण्यात येईल. मागेल त्याला सौर कृषि पंप ड देण्यात येण्याचे धोरण सरकारकडून ठरविण्यात आले आहे.
मोफत वीज बिल योजनेकरिता वर्षाला अंदाजे रुपये 14 ,760 कोटी रुपये महावितरण कंपनी यांना अनुदान म्हणून तरतूद मधून भागविण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे.
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 माहिती मराठी
सदर योजना शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून राबविली जाणार आहे. यामध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना शेती पंप साठी मोफत वीज दिली जाणार आहे.
सदर योजना शासकीय निर्णयाप्रमाणे राबवण्याची जबाबदारी पूर्णपणे महावितरण कंपनीकडे देण्यात आलेली आहे. कंपनीने या योजनेचा अहवाल सादर करायचा आहे.
योजनेचा अधिकृत जी आर : येथे क्लिक करा
या योजनेसाठी शेतकऱ्यांना कोणत्याही ठिकाणी जाऊन अर्ज करायचा नाही. महावितरण अधिकारी तुमच्या शेती पंप ची पडताळणी करून तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल की नाही हे सांगतील.
आम्ही दिलेली योजनेची माहिती तुम्हाला आवडली असेल किंवा उपयोगी वाटली असेल तर. तुमच्या व्हॉट्सअप्प / इंस्टाग्राम / फेसबुक येथे सुद्धा शेअर करा.
7.5 एच पी चा वीज पंप असणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्यात येणार आहे. म्हणजे त्यांना मोफत वीज पुरवठा दिला जाणार आहे.
मार्च 2029 पर्यंत म्हणजे 5 वर्ष ही योजना चालू राहणार आहे.
शेतकऱ्यांसाठी इतर कोणत्या योजना राबविल्या जातात ?
महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या काही योजनांची नावे खालीप्रमाणे
- मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना
- एक शेतकरी एक डि पी योजना
- ट्रॅक्टर अनुदान – योजना
- प्रधानमंत्री – कृषि सिंचन योजना – अनुदान
- ठिबक सिंचन – अनुदान योजना
- तुषार सिंचन योजना
- पोखरा योजना
- 10 शेळ्या व दोन बोकड गट वाटप – योजना
- शरद पवार – ग्राम समृद्धी शेळी पालन अनुदान – योजना
- शेळी पालन योजना – पंचायत समिति
- पशू – किसान क्रेडिट कार्ड
वरील काही योजना आहेत त्या शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येतात. सदर योजनेची दिलेली माहिती कोणताही शेतकरी या योजनेपासून वंचित राहू या हेतू ने सविस्तर दिलेली आहे. म्हणून तुम्ही सुद्धा या योजनेची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करा. जेणकरून गरजू शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ घेता येईल. शेतकरी योजना 2025 महाराष्ट्र, free vij yojana 2025 maharashtra,
सरकारी योजना महाराष्ट्र 2024, sarkari yojana maharashtra 2024, latest government yojana 2024, maharashtra yojana update 2024, latest yojana update,
वरील लेखात आपण शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा देण्यात येणाऱ्या योजनेची सविस्तर माहिती वाचली. सदर योजनेची माहिती तुमच्या पर्यंत पोचल्यास इतर आसपासच्या शेतकरी लोकांना सुद्धा नक्की शेअर करा. www.latestupdate.com या वेबसाइट वर सर्व सरकारी योजनांची आणि नोकरीच्या जाहिराती सर्व माहिती सविस्तर रोजच्या रोज अपडेट दिली जाते. आम्ही आमच्या वेबसाइट वर आम्ही कोणत्याही योजनेच्या किंवा नोकरीच्या खोट्या जाहिराती प्रकाशित करत नाही.
In the above article we have read detailed information about the scheme of providing free electricity supply to farmers. if the information zbout this scheme reaches you, share it with other farmers around. The website www.latestupdate.com is updated daily with detailed information about all government schemes and job advertisements. We do not publish false advertisements of any scheme or job on our website.
वरील माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या जवळच्या शेतकरी मित्राला नक्की करा.