Mukhyamantri Annapurna Yojana 2024, Annapurna Yojana Marathi

आज आपण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 बद्दल सविस्तर नवीन माहिती पाहणार आहोत. भारतातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकाकरिता चांगले इंधन उपलब्ध करणे, या आधारावर शासनातर्फे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2016 मध्ये सुरू केली होती. Mukhyamantri Annapurna Yojana 2024, Annapurna Yojana in Marathi 2024,

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना च्या अंतर्गत गॅस जोडण्याचे काम तेल कंपन्यांच्या मदतीने सुरू आहे. या योजनेतून गॅस असलेल्या कुटुंबांना बाजार किमतीने पुनः गॅस भ्रूण घेणे आर्थिक परिस्थितीने शक्य होत नसल्याने. पर्यायी मार्गासाठी इंधन म्हणून वृक्षतोड होऊन निसर्गाला हानी होत असल्याचे निदर्शनास आले.

या गोष्टी विचारात घेऊन 2024-25 वर्षाच्या अतिरिक्त अर्थ संकल्प सादर करतेवेळी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने ची घोषणा केलेली आहे. या अंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 यातील लाभार्थ्याना वार्षिक 3 गॅस चे पुन्हा भरणीकरण मोफत दिले जाणार आहे.

Mukhyamantri Annapurna Yojana 2024

मुख्यमंत्री उज्ज्वला योजना 2024 52.16 लाख लाभार्थी आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत भरून दिले जाणार आहे. ही योजना Mukhyamantri Annapurna Yojana 2024 In Marathi म्हणून राबविली जाणार आहे.

सरकारी योजना 2024, sarkari yojana maharashtra whatsapp group link, latest government yojana 2024, yojana 2024 maharashtra, 2024 yojana, राज्य सरकार योजना 2024-25, केंद्र सरकार योजना 2024, mahilansathi yojana 2024, mahila sakshamikaran yojana 2024, mahilansathi yojana 2024 in marathi,

पात्रता :

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी ची पात्रता खालीलप्रमाणे असेल. लक्षपूर्वक वाचा.

  • या योजने चा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावावर असणे गरजेचे आहे.
  • प्रधान मंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत असणाऱ्या 56.16 लाख लाभार्थी या योजनेकरिता पात्र असणार आहेत.
  • माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत असणारे लाभार्थी कुटुंब सुद्धा या योजनेसाठी पात्र असेल.
  • एक कुटुंबामधील रेशन कार्ड प्रमाणे फक्त एकच लाभार्थी पात्र असेल.
  • या योजनेचा लाभ फक्त 14.2 किलोग्रॅम वजनाचा गॅस सिलेंडर असणाऱ्याना मिळणार आहे.

प्रधान मंत्री उज्ज्वला योजनेची कार्यपद्धती :

  1. उज्ज्वला योजने मार्फत लाभार्थी कुटुंबांना गॅस चे वितरण हे तेल कंपनी मार्फत केले जाते. तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 चे 3 मोफत गॅस चे वितरण सुद्धा तेल कंपनी मार्फत च केले जाणार आहे.
  2. प्रधान मंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत गॅस ची रक्कम ही सरासरी 830 /- रु घेतली जाते. तर योजनेतून दिली जाणारी सबसिडी 300 /- रु लाभार्थी च्या खात्यात जमा करण्यात येते.
  3. एका ग्राहकाला एका महिन्यात एक पेक्षा जास्त वेळा सबसिडी देण्यात येत नाही.
  4. अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 कार्य पद्धती :

  1. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ला सुद्धा 3 मोफत सिलेंडर चे वितरण केले जाणार आहे.
  2. एक पेक्षा जास्त सिलेंडर साठी एकाच महिन्यात सबसिडी दिली जाणार नाही.
  3. मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे शहर भागात मुंबई – ठाणे शिधा वाटप तसेच इतर जिल्ह्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय च्या अंतर्गत पुरवठा यंत्रणा काम करते.

योजनेच्या समित्यांची कामे :

योजनांसाठी नेमलेल्या ज्या समित्या आहेत त्यांची कामे थोडक्यात खाली दिलेली आहेत. लक्ष पूर्वक वाचा.

  1. माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी च्या रेशन कार्ड प्रमाणे कुटुंब निश्चित करण्याचे काम समितीद्वारे केले जाईल.
  2. योजनेमधील लाभार्थी ची द्विरुक्ती होणार नाही याबद्दलची दक्षता घेण्याचे काम
  3. पात्रता पूर्ण करणाऱ्या लाभार्थी ची शेवटची यादी आधार कार्ड नंबर जोडलेल्या बँक खात्यासाहित निश्चित करणे.
  4. समिति द्वारे ठरवून दिलेल्या लाडकी बहीण योजना लाभार्थी ची कुटुंब निहाय माहिती शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई / जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्न धान्य वाटप अधिकारी यांनी त्यांच्या काम क्षेत्रातील तेल कंपन्यांना देतील.
  5. सविस्तर माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ वाचा.

या योजनेची अंमलबजावणी, ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी योजनेच्या संचालन aani समन्वय करिता नियंत्रक / शिधा वाटप आणि संचालक नागरी पुरवठा, मुंबई च्या अध्यक्षतेच्या खाली राज्यस्तर समिति करण्यात आली आहे. खालीलप्रमाणे

पद नामसमितीचे पद नाम
नियंत्रक, शिधा वाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबईअध्यक्ष
आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणेसदस्य
वित्तीय सल्लागार तथा उप सचिव, अनापुवग्रासंवि, मुंबईसदस्य
राज्य स्तरीय समन्वयक तेल उद्योग, महाराष्ट्र राज्य मुंबईसदस्य
सर्व तेल कंपनी चे राज्यस्तरीय प्रतिनिधीसदस्य
उप नियंत्रक ( अंमल ), नियंत्रक शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा मुंबई कार्यालयसदस्य सचिव

Mukhyamantri Annapurna Yojana 2024 Benefits :

  • या योजनेच्या पात्र उमेदवारांना वार्षिक 3 सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत.
  • इतर गॅस सिलेंडर स्व: खर्चाने खरेदी करायचे आहेत.
  • केशरी आणि पिवळे रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पांढरे रेशन कार्ड असणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • शासन निर्णय प्रमाणे 1 जुलै 2024 च्या दिवशी पात्र होणाऱ्या लाभार्थी ला या योजनेचा लाभ मिळेल. या तारखेनंतर विभक्त केलेल्या शिधा पत्रिका या योजनेकरिता पात्र नसतील.

अन्नपूर्णा योजनेच्या सविस्तर माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जी आर वाचा येथे क्लिक करा


latestupdate247.com ही एक माहीती पुरवणारी वेबसाइट आहे. या वेबसाइट वर सर्व सरकारी योजना, सर्व नोकरीच्या जाहिराती आणि इतर शैक्षणिक, अभ्यासक्रम, नोकरी जाहिराती, सरकारी पदांची निवड पद्धत या प्रकारची इतर सर्व माहिती आम्ही या वेबसाइट वर नियमित देत असतो. कोणत्याही फसवणूक किंवा दिशाभूल करणाऱ्या अथवा आर्थिक अडचणी निर्माण करण्याऱ्या जाहिराती किंवा माहिती आम्ही देत नाही. महत्वाच्या सर्व अपडेट इतरांना सुद्धा मिळाव्यात या करिता आमची वेबसाइट तुमच्या आसपासच्या लोकांना नक्की शेअर करा. latest government scheme update 2024.

latestupdate247.com is an information website. On this website we regularly provide all government schemes, all job advertisements and other educational, syllabus, job advertisements, selection method for government post etc. on this website. We do not provide any advertising or information that is deceptive or misleading or creates financial difficulties. Be sure to share our website with people around you so that others also get all the important updates.

तुम्हाला जर सर्व सरकारी योजनांची माहिती नियमित रोजच्या रोज मिळवायची असेल तर आमच्या वेबसाइट ला नियमित भेट द्या.

Leave a Comment