Yojana Doot Bharti 2024, 50,000 Yojanadoot Bharti 2024

महाराष्ट्र राज्य शासन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग मार्फत आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या तर्फे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्याकरिता मान्यता दिली गेली आहे. तसेच शासन निर्णयांमधील महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळ्या योजनांची माहीती चा प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी योजना दूत नेमले जाणार आहेत. Yojana Doot Bharti 2024, 50000 Yojanadoot Bharti 2024

सदर जाहिरात ही योजना दूत नेमण्याकरिता देण्यात आलेली आहे. लवरकच ही भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. योजनादूत महाराष्ट्र 2024, योजनादूत भरती 2024. सदरची ही जाहिरात तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करायला विसरू नका.

महाराष्ट्र राज्य शासन अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती सर्व लोकांपर्यंत पोचविण्यासाठी हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. पदवीधर उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपात रोजगाराची संधी सुद्धा उपलब्ध होईल. या योजनादूत कार्यक्रम बद्दलची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

लवकरच या बद्दलची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या बद्दलची माहिती तुमच्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना शेअर करा. तात्पुरत्या स्वरूपात का होईना. गरजू असलेल्या उमेदवारांना या संधीचा फायदा होणार आहे.

Yojana Doot Bharti 2024

महाराष्ट्रामधील जास्तीत जास्त लोकांपर्यंत सर्व योजनांचा लाभ पोचावा व त्याची माहिती त्यांना मिळावी यासाठी योजनादूत हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. हे योजनादूत या कामासाठी गावस्तरावर नेमले जाणार आहे.

योजनादूत कार्यक्रम प्रक्रिया :

  • मुख्यमंत्री जन कल्याण कक्ष मार्फत संयुक्त पद्धतीने राबविण्यात येणार आहे. राज्यातील प्रशासकीय यंत्रणेस मदत म्हणून योजनादूत नेमले जाणार आहे.
  • गावातील प्रत्येक ग्रामपंचायत साठी 1 आणि शहरातील 5000 लोकसंख्येकरीता 1 या प्रमाणे 50 हजार योजनादूत निवडले जाणार आहे.
  • प्रत्येक योजनादूत करिता प्रति महिना 10,000 रु मानधन दिले जाणार आहे.
  • निवड करण्यात आलेल्या योजनादूत सोबत 6 महिन्यांसाठी करार केला जाणार आहे. कुठल्याही परिस्थिति मध्ये हा करार वाढविला जाणार नाही.

Yojanadoot Eligibility – योजना दूत पात्रता

  1. वय 18 ते 35 असावे
  2. कुठल्याही शाखेचा पडीवधर उमेदवार असावा
  3. कॉम्प्युटर चे ज्ञान असावी.
  4. अर्जदाराकडे मोबाइल असावा
  5. महाराष्ट्राचा रहिवासी असावा
  6. आधार कार्ड आणि आधार कार्ड जोडलेले बँक खाते असणे गरजेचे आहे.

योजनादूत कार्यक्रमासाठी उमेदवारांकडे वरील कागदपत्र असणे गरजेचे आहे.

योजनादूत कागदपत्र – Yojanadoot Document List 2024

  • ऑनलाइन केलेल्या अर्ज दिलेल्या नमुन्यातील – Online Application
  • आधार कार्ड – Adhar Card
  • पदवी पास केल्याचे प्रमाणपत्र – Gradution Result / Certificate
  • अधिवास प्रमाणपत्र – Domicile
  • बँक खात्याची माहिती – Bank Account Details
  • पासपोर्ट आकाराचा फोटो – Passport Photo
  • हमी पत्र – अर्जाच्या नमुन्यातील – letter of guarantee

योजनदूताची कामे :

  1. जिल्हा माहिती अधिकारी च्या अंतर्गत योजनादूत जिल्ह्यात असणाऱ्या योजनांची माहिती घेतील
  2. ठरवून दिलेले काम सांगितलेल्या ठिकाणी जाऊन करणे.
  3. वेगवेगळ्या योजनांची माहिती गाव पातळी वर घरोघरी जाऊन देण्याचा प्रयत्न करतील.
  4. पूर्ण दिवस पार पडलेल्या कामाचा अहवाल तयार करून योजनादूत ऑनलाइन अपलोड करतील.
  5. अनअधिकृत पद्धतीने कामावर हजर न राहिल्यास योजनदूतास मानधन देण्यात येणार नाही.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024, लगेच क्लिक करून योजनेची माहिती वाचा


Yojana Doot Bharti 2024 निवड प्रक्रिया :

  1. उमेदवारांची नोंदणी आणि प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया बाह्य संस्थेमार्फत ऑनलाइन पूर्ण करण्यात येणार आहे.
  2. पात्रता निकष प्रमाणे छाननी केली जाणार आहे.
  3. छाननी पूर्ण झाल्यानंतर पात्र असणाऱ्या उमेदवारांची यादी जिल्ह्याच्या जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे देण्यात येणार आहे.
  4. यादीतली उमेदवारांची सर्व कागदपत्र तपसणी केली जाणार आहे.
  5. त्या नंतर प्रत्येक उमेदवाराचा 6 महिन्यांचा करार करण्यात येईल.
  6. योजना दुताचे हे काम शासकीय सेवा समजण्यात येणार नाही. या निवडीच्या आधारे कोणीही शासकीय सेवेमध्ये नेमणुकीची मागणी करू शकत नाही किंवा हक्क सांगू शकत नाही.

योजनादूत कार्यक्रम साठी बाह्य संस्थेमार्फत करावयाची कामे :

  1. ऑनलाइन अर्जाची नोंदणी करणे.
  2. आलेल्या अर्जाची आणि कागदपत्रांची तपसणी करणे आणि पात्र उमेदवारांची यादी जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवणे.
  3. काम दिल्यानंतर योजना दूत चा दैनिक अहवाल घेणे. तो अहवाल जिल्हा माहिती अधिकार आणि नोडल ऑफिसर व जन संपर्क महासंचालनालय याना पाठविणे
  4. मानधन देयक तयार करून जिल्हा माहिती अधिकारी यांना देणे. तसेच इतर बाबी सादर करणे
  5. अधिक माहिती साठी खाली दिलेला शासन निर्णय वाचा.

योजनादूत मानधन अर्थसंकल्प तरतूद :

या योजना दूत कार्यक्रम साठी 50 हजार योजना दूतांसाठी प्रतीके महिन्याला 10 हजार असे 6 महिन्यांसाठी अंदाजे 300 कोटी रुपये एवढा खर्च येईल. हा खर्च कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत केला जाणार आहे.

प्रत्येक महिन्याच्या 2 तारखेपर्यंत मानधन प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

या कार्यक्रमाचा शासन निर्णय https://www.maharashtra.gov.in/ या वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.


www.latestupdate247.com या वेबसाइट वर सर्व सरकारी योजनांची आणि सर्व नोकरीच्या जाहिरातींची माहीती नियमित दिली जाते. कोणतीही आर्थिक फसवणूक करणारी माहीती आम्ही प्रसिद्ध करत नाही. सर्व माहितीची शहानिशा करूनच माहिती आमच्या वेबसाइट वर प्रसिद्ध केली जाते. नियमित सर्व अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट शी जोडून राहा. आमच्या वेबसाइट वर तुम्हाला मिळालेली माहीती तुमच्या आसपास असणाऱ्या इतर लोकांना सुद्धा शेअर करा.

The website www.latestupdate247.com provides regular information about all government schemes and all job advertisements. we do not publish any fraudulent financial information. information is published on our website only after verifiction of all information. stay connected with our website to get all updates regularly. also share the information you get on our website with other prople around you.

Leave a Comment