आज च्या करियर आणि शिक्षण संदर्भातील माहिती च्या लेखात आपण फार्मसी कोर्स बद्दल काही महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. बरेच विद्यार्थी सायन्स मधून 12 वी पास केल्यानंतर फार्मसी चे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतात. पण त्या अगोदर आपण फार्मसी कोर्स मधील डी फार्मसी आणि बी फार्मसी यामधील फरक काय आहे ते बघूया. Pharmacy Information in Marathi 2024, Pharmacy Mahiti in Marathi,
In todya’s career and education information article, we are going to learn some important information about pharmacy coruses. Most people decide to do pharmacy after passing 12th in science. But before that let us see what is the diffrence between D Pharmacy and B Pharmacy in Pharmacy course.
12 वी विज्ञान शाखेतून पास झाल्याच्या नंतर वेगवेगळ्या शाखेसाठी विद्यार्थ्याना शिक्षण घेण्यासाठी पर्याय उपलब्ध होतात. तरीही फार्मसी करण्याकडे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा कल दिसून येतो. सुरुवातीला विद्यार्थ्याना मेडिकल सुरू करण्यासाठी लागणारा कोर्स म्हणजे फार्मसी होय असे वाटते. तर काही विद्यार्थ्याना फार्मसी मधील बी फार्मसी आणि डी फार्मसी म्हणजे काय याची सविस्तर माहिती नसते. म्हणून आज आपण याची थोडक्यात महत्वाची माहीती विद्यार्थ्यांसाठी देणार आहोत.
फार्मसी मधील वेगवेगळ्या कोर्स चे शिक्षण घेतल्याने वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन नोकरीच्या संधी विद्यार्थ्यांना नक्की मिळतात. सध्या वैद्यकीय क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होताना आपण पाहत आहोत. त्या अनुषंगाने नोकरीच्या आणि व्यवसायाच्या संधी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत.
Pharmacy Information in Marathi 2025
मराठी भाषेत फार्मसी ला औषध निर्माणशास्त्र असे बोलले जाते. 12 वी पास केल्याच्या नंतर या कोर्स साठी प्रवेश घेता येईल. त्या करिता 12 वी मध्ये PCMB – म्हणजे भौतिकशास्त्र / केमिस्ट्री / मॅथ आणि बायोलॉजी या विषय सहित पास होणे गरजेचे आहे. कमीत कमी 12 वी मध्ये 50% मार्क असावेत. 12 वी नंतर तुमहला एम एच टी – सी ई टी ची पूर्वपरीक्षा द्यावी लागेल. टी पास झाल्याच्या नंतर तुम्हाला फार्मसी साठी प्रवेश घेता येईल. तुम्हाला हा कोर्स करायचा असेल तर याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती असणे गरजेचे आहे. pharmachy course details in marathi 2025,
B – Pharmacy Information in Marathi 2025
बी फार्मसी हा 12 वी पास नंतर करता येणारा 4 वर्षाचा कोर्स आहे. बी फार्मसी म्हणजे – बॅचलर इन फार्मसी. या मध्ये 8 सत्र परीक्षा घेतल्या जातात. बी फार्मसी झाल्याच्या नंतर फार्मा कंपन्यांमध्ये तुम्हाला नोकरीच्या वेगवेगळ्या संधी मिळतील. तसेच यानंतर तुम्ही तुमचे स्वत:चे औषध दुकान सुद्धा टाकू शकता. बी फार्मसी ची श्रेणी ही डिग्री श्रेणी आहे. त्याची फी 40 हजार ते 1 लाख रु वर्षाला असू शकते. फी ही तुम्ही प्रवेश घेता त्या संस्था किंवा विद्यापीठावर अवलंबून असते. बी फार्मसी नंतर तुम्ही 2 वर्षा एम फार्मसी किंवा फार्मसी मधील पी एच डी करून डॉक्टरेट पदवी सुद्धा मिळवू शकता.
D – Pharmacy Information in Marathi 2025
डी फार्मसी म्हणजे डिप्लोमा इन फार्मसी. बी आणि डी फार्मसी मध्ये बराच फरक आहे. दोन्ही कोर्स वेगवेवगळे आहेत. हा कोर्स 2 वर्षांचा असतो आणि एक 4 सत्रात याची परीक्षा घेतली जाते. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर सुद्धा तुम्हाला मेडिकल शॉप लायसन्स साठी अर्ज करता येईल. तसेच फार्मा कंपनी मध्ये सुद्धा तुम्हाला नोकरी करता येईल. दोन्ही कोर्स केल्यास तुम्हाला औषध विक्री प्रतिनिधी म्हणून सुद्धा नोकरीच्या संधी मिळतील. औषध शस्त्र या विषयात तुम्हाला काम करायचे असेल तर तुमच्याकडे बी फार्मसी ची पदवी असणे गरजेचे आहे.
डी फार्मसी या कोर्स ची फी 50 हजार ते 1 लाख रुपये वर्ष असू शकते. हा कोर्स पूर्ण केल्याच्या नंतर विद्यार्थी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया अथवा स्टेट फार्मसी कौन्सिल अंतर्गत नोंदणी करू शकता. या मुळे सरकारी किंवा खाजगी विभागात फार्मासिस्ट ची नोकरी करता येऊ शकते. हा कोर्स केल्याच्या नंतर तुम्हाला हॉस्पिटल फार्मसी / कम्युनिटी फार्मसी / क्लिनिकल फार्मसी / ड्रग्स कंट्रोल अॅडमिनिसट्रेशन / ड्रग्स मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री / रिसर्च आणि डेवलपमेंट या क्षेत्रामध्ये करियर करता येते. तुम्ही स्वतचे औषध दुकान टाकून व्यवसाय सुद्धा करू शकता.
फार्मासिस्ट माहीती मराठी 2025
फार्मासिस्ट म्हणजे विशेष प्रशिक्षण असणारे हेल्थ केअर प्रोफेशनल असतात. जए औषधांच्या चांगल्या वापराने रुग्णांना चांगले परिणाम मिळवेत या साठी काम करत असतात. फार्मासिस्ट ला लोकाना वितरित केल्या जाणाऱ्या औषधांची सविस्तर माहिती असते. म्हणून ते एखाद्या उपचाराचे ओप्टिमायझेशन करण्याचे काम करतात.
फार्मसी केल्यानंतर नोकरीच्या संधी :
- फार्मासिस्ट :
बी फार्मसी हा 4 वर्ष कालावधीचा कोर्स पूर्ण केल्याच्या नंतर विद्यार्थी फार्मासिस्ट म्हणून काम करण्याची संधी मिळवू शकतात. फार्मासिस्ट ही औषध वितरण च्या ठिकाणी काम करतात किंवा औषध निर्माण संस्थेत काम करत असतात. तसेच बी फार्म नंतर स्वतचे मेडिकल शॉप सुद्धा सुरू करू शकतात. इतर मेडिकल मध्ये सुद्धा फार्मासिस्ट म्हणून नोकरी मिळू शकते. - फार्मा सायंटिस्ट :
औषध शास्त्राची पदवी घेतल्यानंतर विद्यार्थ्याना फार्मा सायंटिस्ट म्हणून काम करण्याची संधी मिळते. त्यांना वेगवेगळ्या संस्थेत वैज्ञानिक म्हणून काम करावे लागते. वेगवेगळे संशोधन करणे हे त्यांचे काम असते. - रेगूलेटरि अफेयर्स प्रोफेशन :
बी फार्मसी नंतर विविध फार्मा कंपनी मध्ये रेग्युलेटर प्रोफेशन अधिकारी म्हणून नोकरीची संधी मिळू शकते. औषध तपासणी आणि चाचणी करण्याचे काम या ठिकाणी करावे लागते. - मेडिकल रायटर :
बी फार्म नंतर विद्यार्थ्याला मेडिकल रायटर पदासाठी नोकरी मिळू शकते. एखाद्या आजार संबंधित माहिती देण्याचे काम मेडिकल रायटर चे असते. वेगवेगळ्या संस्थेत आणि त्यांच्या वेबसाइट वर माहिती लिहिण्यासाठी मेडिकल रायटर ला मागणी सुद्धा आहे.
Pharmacy Information in Marathi 2024
फार्मसी ही एक प्रभावी आणि महत्वाचे क्षेत्र नक्कीच आहे. तुम्ही या क्षेत्रात योग्य शिक्षण घेतल्यास आणि कौशल्य मिळवल्यास नक्की करियर करू शकता. फार्मसी चे शिक्षण घेऊन तुम्ही नोकरी आणि व्यवसाय दोन्ही करू शकता. आणि करियर आणि पैसा दोन्ही मिळवू शकता. फार्मसी विभागात नोकरीच्या संधी सुद्धा अनेक आहेत त्याच बरोबर पगार सुद्धा चांगल्या प्रमाणात दिला जातो. या मध्ये व्यवसाय करून सुद्धा तुम्ही चांगल्या प्रमाणात पैसे कामवू शकता. ही ही महत्वाची माहिती तुमचे मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा.
मेडिकल लायसन्स कसे काढावे ?
मेडिकल शॉप सुरू करण्यासाठी पार्टनरशिप / मालकी / एलएल पी किंवा कंपनीची नोंदणी घेणे गरजेचे असते. नोंदणी झाल्याच्या नंतर औषध विक्री साठी लागणारे लायसन्स काढणे गरजेचे असते. औषध विक्री लायसन्स / दुकान टाकण्याचे लायसन्स काढावे लागतील. मेडिकल साठी लायसन्स हवे असल्यास त्या साठी वैद्यकीय पदवी पूर्ण आणि इंटर्नशिप केलेली असणे गरजेचे असते. तसेच पदवी नंतर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया अथवा स्टेट मेडिकल कौन्सिल अंतर्गत वैद्यकीय औषधांच्या सरावासाठी नोंदणी करावी लागते.
www.latestupdate247.com ही एक सरकारी योजना आणि महत्वपूर्ण करियर संदर्भातील माहिती देणारी वेबसाइट आहे. या वेबसाइट वर सर्व महत्वाचे योजना आणि करियर टिप्स अपडेट नियमित मराठी भाषेत सविस्तर दिले जातात. एकदा आमच्या वेबसाइट ला अवश्य भेट द्या आणि आवडलेली माहीत तुमच्या जवळच्या लोकांना किंवा विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा. नियमित सर्व माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाइट ला भेट देऊ शकता. सर्व योजनांची माहिती / योजनासाठी लागणारी पात्रता व कागदपत्र आणि इतर महत्वाची माहिती सविस्तर देण्यात आलेली आहे.