राज्यातील महिलांसाठी राज्य सरकारतर्फे नवीन योजनेसाठी मान्यता देण्यात आलेली आहे. स्वबळावर कष्ट करणाऱ्या आणि स्वावलंबी होऊ पाहणाऱ्या महिला आणि मुलींसाठी ही एक चांगली योजना ठरणार. आर्थिक दृष्ट्या महिला योजनेतून सक्षम होऊ शकतील अशी आशा आहे. Pink E Rickshaw Scheme 2024, sarkari yojana maharashtra 2024, महिलांसाठी सरकारी योजना 2024, mahilansathi sarkari yojana 2024, mahila sashaktikaran yojana 2024, mahilao ke liye yojana, mahila vikas yojana 2024, महिला योजना महाराष्ट्र 2024, विधवा महिला योजना महाराष्ट्र, महिला स्वयंरोजगार योजना 2024
राज्यातील महिला आणि मुलींना रोजगाराच्या निर्मितीस चालना देणे, महिलांचे आर्थिक / सामाजिक पुनर्वसन करणे, महिला सशक्तीकरण ( mahila sashaktikaran ) करणे. मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी, अमरावती, चिंचवड, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई – विरार, कोल्हापूर आणि सोलापूर या शहरांमध्ये इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी साठी अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे आणि चालविण्यासाठी आणखी इतर सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई रिक्षा ही योजना सुरू करण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. Pink E Rickshaw Scheme 2024, Mahilansathi Yojana 2024,
खाली या योजेनची सविस्तर माहिती दिलेली आहे. सर्वांनी दिलेली माहिती लक्षपूर्वक सविस्तर वाचून घ्यावी. आणि इतरांना सुद्धा सांगावी जेणेकरून या योजनेपासून गरजू महिला किंवा मुली वंचित राहणार नाहीत. शेअर करण्यासाठी तुम्हाला मिळालेली लिंक कॉपी करा आणि इतरांना पाठवा. sarkari yojana maharashtra whatsapp group link, latest yojana update 2024.
Pink E Rickshaw Scheme 2024
खालील काही शहरांमधील गरजू महिलांना पिंक ई रिक्षा या योजनेसाठी 10 हजार लाभार्थी संख्या निश्चित केलेली आहे.
शहराचे नाव | शहरातील लाभार्थी संख्या |
---|---|
मुंबई उपनगर | 1400 |
ठाणे | 1000 |
पुणे | 1400 |
नाशिक | 700 |
नागपूर | 1400 |
कल्याण | 400 |
अहमदनगर | 400 |
नवी मुंबई | 500 |
पिंपरी | 300 |
अमरावती | 300 |
चिंचवड | 300 |
पनवेल | 300 |
छत्रपती संभाजीनगर | 400 |
डोंबिवली | 400 |
वसई – विरार | 400 |
कोल्हापूर | 200 |
सोलापूर | 200 |
एकूण | 10,000 लाभार्थी |
पिंक ई रिक्षा योजेनचा उद्देश – Sarkari Yojana Maharashtra 2024
- महाराष्ट्रातील महिला आणि मुली यांना पुरेशा सोई-सुविधा देऊन रोजगाराच्या निर्मितीस चालना देण्यात येणार आहे.
- महिलांचे सामाजिक आणि आर्थिक पुनर्वसन करण्यासाठी.
- होतकरू महिलांना आणि मुलींना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी करणे
- महिला आणि मुली यांच्या सशक्तीकरणास चालना देणे.
- महिला आणि मुली यांना सुरक्षित प्रवास करता यावा.
योजनेचे स्वरूप :
- गरजू महिलांसाठी रिक्षा खरेदी साठी अर्थ सहाय्य आणि इतर सुविधा देण्यात येणार आहे.
- ई- रिक्षा च्या किमतीत सर्व कर समाविष्ट असतील. ( जी एस टि / रजिस्ट्रेशन / रोड टॅक्स / इत्यादि )
- नागरी सहकारी बँका / जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका / राष्ट्रीयकृत बँका / अनुज्ञेय असणाऱ्या खाजगी बँक तर्फे रिक्षा च्या किमतीचे 70% कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
- कर्जाचा 20% भार हा राज्य शासन उचलणार आहे.
- लाभ घेणाऱ्या मुली व महिला यांच्यावर कर्जाचा 10% भार असणार आहे.
- कर्ज परतफेड ही 60 महीने म्हणजेच 5 वर्षाची असणार आहे.
पिंक ई रिक्षा योजनेचा लाभ कोणाला मिळणार
पिंक ई रिक्षा या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील गरजू महिलांना आणि मुलींना मिळणार आहे.
ई रिक्षा योजनेसाठी पात्रता :
लाभार्थी महिला/मुलीचे कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे गरजेचे आहे. |
अर्ज करणाऱ्या लाभार्थी चे वय 18-35 वर्ष एवढे असणे गरजेचे आहे. |
बँक खाते असणे गरजेचे आहे. |
वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा अधिक नसावे. |
वाहन चालविण्याचा परवाना असणे गरजेचे आहे. |
विधवा / कायदेशीर घटस्फोटीत / राज्यगृह मधील इच्छुक प्रवेशित / अनाथ प्रमाणपत्र असलेली महिला, अनुरक्षणगृह / बालगृह आजी माजी प्रवेशित यांच्यासाठी प्राधान्य असणार आहे. |
दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या महिलांना देखील प्राधान्य दिले जाणार आहे. |
Pink E Rickshaw Scheme 2024 Document List
- ऑनलाइन अर्ज
- आधार कार्ड / पॅन कार्ड
- महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र – डोमासाईल
- कुटुंब प्रमुख व्यक्तीचा उत्पन्न दाखला – 3 लाख पेक्षा कमी
- बँक पासबुक
- फोटो – पासपोर्ट आकारातील
- मतदान ओळखपत्र – ( 18 वर्ष नंतर मतदार यादीमध्ये नाव आहे असा दाखला )
- वाहन चालविण्याचा परवाना
- ही रिक्षा लाभार्थी महिला चालविणार असल्याचे हमीपत्र
- या योजनेच्या अटी चे पालन करणार असल्याचे हमीपत्र
योजेनच्या अटी आणि शर्ती :
- या योजनेचा लाभ महिलेला एकदाच घेता येईल.
- इतर विभागातून ई रिक्षा योजनेचा लाभ घेतलेला नसावा
- महिला कर्जबाजारी नसावी
- कर्ज फेडण्याची सर्व जबाबदारी महिलेची असणार आहे.
आयुक्त, महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य पुणे हे या योजनेसाठी नियंत्रण अधिकारी असणार आहेत. या विभागाकडून ही जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागीवण्यात येणार आहेत.
Pink E Rickshaw Scheme 2024 Marathi Information
क्रमांक | घटक | तपशील |
---|---|---|
1 | किंमत – सर्व करसहित | कमाल 4 लाख रुपये |
2 | मोटर क्षमता | 10 एच पी |
3 | माइलेज | किमान 110 किलोमीटर |
4 | बैठक क्षमता | 3 + 1 ( चालक ) |
रिक्षा खरेदी प्रणाली :
शासन धोरणास अनुसरून विहित कार्य पद्धत वापरुन कंपनी किंवा एजन्सी ची निवड आयुक्त, महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या तर्फे शासनाच्या मान्यतेने केली जाईल.
निवडलेल्या कंपनी आणि एजन्सी मार्फत योजनेच्या नमूद शहरातील लाभार्थी ला ई रिक्षा देण्यात येतील.
Pink E Rickshaw 2024 Maharashtra Scheme Process
- इच्छुक असणाऱ्या महिलांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयाला अर्ज करायचा आहे.
- अर्जाची छाननी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणारी समिती मार्फत केली जाईल.
- पात्र असणाऱ्या लाभार्थी ला शासनाने निश्चित केलेल्या कर्ज देणाऱ्या बँक आणि रिक्षा देणाऱ्या एजन्सि ची माहिती दिली जाईल.
- लाभार्थी एजन्सी ला मान्य असणाऱ्या बँकेतून खरेदीसाठी 70% कर्जासाठी कागदपत्र ची पूर्तता करून कर्ज मंजूर करून घेतील.
- 70% कर्जाची रक्कम फेडण्याची जबाबदारी लाभार्थी ची असेल.
- पूर्ण रक्कम एजन्सी ला दिल्यानंतर वाहन देण्यात येईल.
- रिक्षा महिला चालवत आहे का ? याची तपासणी वाहतूक नियंत्रक पोलिस विभाग आणि परिवहन विभाग तर्फे केली जाणार आहे.
- रिक्षा जर पुरुष चालवीत आहे असे आढळल्यास संबंधित व्यक्ति वर कारवाई करण्यात येईल.
- महिलांनी रिक्षा मिळाल्यानंतर स्वावलंबी होणे गरजेचे आहे.
- अधिक सविस्तर माहिती साठी खालील लिंक वरून अधिकृत जाहिरात वाचा.
- रिक्षा घेऊन न चालविल्यास, किंवा कर्ज परतफेड न केल्यास तर त्या जिल्ह्याच्या महिला बाल विकास अधिकारी मार्फत सदर लाभार्थी च्या अडचणी लक्षात घेऊन त्यांचे समुपदेशन करण्यात येईल. त्यानंतरही अडचण कायम असल्यास महिला बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत बँक शी चर्चा करून नियमाला अनुसरून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.
सदर योजनेची सविस्तर माहिती आपण वर दिलेली आहे. तरीही अधिकृत जाहिरात वाचायची असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पीडीएफ जाहिरात वाचा. तसेच ही योजना होतकरू महिलांसाठी उपयुक्त योजना आहे, म्हणून ही योजना सर्व मित्र मैत्रिणीं आणि इतरांना नक्की शेअर करा.
योजना पीडीएफ जाहिरात : पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी, अमरावती, चिंचवड, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई – विरार, कोल्हापूर आणि सोलापूर या शहरांमध्ये असणाऱ्या तुमच्या प्रत्येक व्यक्तीला ही योजना लगेच शेअर करा. गरजू महिलांपर्यंत ही योजना पोचविण्यात सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे.
अशाच इतर योजना पाहण्यासाठी आमच्या https://latestupdate247.com/ या वेबसाइट ला नक्की नियमित भेट द्या. आमच्या वेबसाइट वर आम्ही सर्व सरकारी योजना,नोकरी आणि इतर महत्वाच्या सर्व अपडेट देणार आहोत.