Tally Information in Marathi, टॅलि कोर्स बद्दल मराठी माहिती 2024

आज आपण तुमच्यासाठी एका महत्वाच्या आणि चांगल्या कोर्स बद्दल माहीती घेऊन आलो आहे. टॅलि कोर्स बद्दल आपण महत्वाची आणि सविस्तर माहिती आज जाणून घेणार आहोत. टॅलि कोर्स केल्यानंतर तुम्हाला काय फायदा होईल, कोणती नोकरी मिळू शकेल. कोर्स करण्यासाठी पात्र काय असली पाहिजे याची माहिती आम्ही आज तुम्हाला देणार आहोत. Tally Information in Marathi, टॅलि कोर्स बद्दल मराठी माहिती 2024,

टॅलि कोर्स मध्ये कोणकोणत्या गोष्टींचे शिक्षण दिले जाते, त्याचे महत्व त्या गोष्टींचा आणि कौशल्याचा तुम्हाला वापर कुठे करायचा आणि त्याचा फयदा काय ? ही तुम्हाला आजच्या लेखात जाणून घ्यायला मिळेल. टॅलि ही एक अकाऊंटिंग चे सॉफ्टवेअर आहे. याचे पहिले व्हर्जन हे 1988 साली आले होते. म्हणजेच 80 च्या दशकात या सॉफ्टवेअर चा शोध लागला. या टॅलि सॉफ्टवेअर मुळे वित्तीय संस्था, ट्रस्ट, सोसायटी, बँक, शाळा-कॉलेज, इत्यादि मध्ये सर्व आर्थिक अहवाल आणि त्याची सर्व माहिती सहज साठवून ठेवण्यास मदत झाली. या टॅलि मुले कामाचा वेळ सुद्धा वाचतो. आणि नुकसान सुद्धा काही होत नाही.

आधीच्या काळात वहीत किंवा रजिस्टर मध्ये हिशोब आणि नोंदी ठेवल्या जात होत्या. सर्व लिखाण करून ठेवण्यात वेळ जात होता. संगणकाचा वापर सुरू झाल्याच्या नंतर त्या लेखी हिशोब आणि नोंदीचा विषय अगदी सोपा झाला. अकाऊंटिंग च्या बाबतीत वेगवेगळे सॉफ्टवेअर तयार झाले. अचूक आर्थिक हिशोब व नोंदी ठेवण्यास मदत झाली. गरजेनुससार सॉफ्टवेअर सुद्धा तयार झाले. त्यातले टॅलि ही खूप नावाजलेले सॉफ्टवेअर जगभरात सध्या वापरले जात आहे. मार्केटच्या जगात जवळवजळ 90% वाटा हा टॅलि कहा आहे असे म्हणायला हरकत नाही.

अकाऊंटिंग मध्ये प्रभुत्व असणाऱ्या आणि अकाऊंट विषय सोपी पद्धतीने हाताळण्यात येणाऱ्या विद्यार्थ्याना टॅलि करणे अतिशय फायदेशीर ठरू शकते. व्यवसाय क्षेत्रात उत्तम करियर म्हणून नोकरी मिळवायची असेल तर टॅलि कोर्स एक उत्तम पर्याय आहे.

Tally Information in Marathi

टॅली कोर्स महत्वाचे मुद्दे

या कोर्सचा कालावधी 6 महिन्याचा असतो
आठवड्यातून 6 दिवस 1 तासाचा क्लास असतो
यामध्ये 13 मॉड्युल असतात
कोर्स पूर्ण झाल्यानंतर नोकरी साठी प्लेसमेंट सुद्धा देण्यात येते
कोर्स पूर्ण केल्याच्या नंतर तुम्हाला अधिकृत सरकारमान्य प्रमाणपत्र सुद्धा दिले जाते
क्लास च्या ठिकाणी जाऊन तुम्ही फी व इतर माहिती मिळवू शकता

टॅलि हे एक अकाऊंटिंग सॉफ्टवेअर आहे. लघु द्योग असणाऱ्या व्यवयसाईकांसाठी ही अतिशय फायदेशीर असे सॉफ्टवेअर आहे. तळी कोर्स द्वारे तुम्ही तुमचे करियर सुद्धा करू शकता.

टॅली कोर्स करण्याचे फायदे

या कोर्स मध्ये आर्थिक बाबींचा बाबतीत कामे करण्यासाठी च्या विषयांचे शिक्षण दिले जाते. टॅली सॉफ्टवेअर मध्ये अनेक क्षेत्रातील आर्थिक कामे करण्यात येतात. या कोर्स च्या अंतर्गत नोकरीच्या चांगल्या संधी सुद्धा तुम्हाला मिळू शकतील.

या कोर्स मधून विद्यार्थी टॅक्स, जी एस टी आणि टी डी एस या गोष्टींचे ज्ञान प्राप्त करू शकतो . ही कौशल्य शिकून त्यांना यामध्ये चांगले करिअर करता येऊ शकते.

व्यवसायिक आणि कॉर्पोरेट क्षेत्रात या संदर्भातील उमेदवारांना नोकरीची चांगली संधी प्राप्त होऊ शकते.खालील माहिती आपण टॅली च्या फी बद्दल माहिती घेऊया

  1. बेसिक टॅली कोर्से साठी 2 ते 4 आठवडे एवढा कालावधी असतो. त्यासाठी 3 ते 7 हजार एवढी फी असू शकते.
  2. ऑनलाइन टॅली कोर्स साठी तुम्ही स्वतः शिकू शकता या साठी तुम्हाला 500 ते 1000 खर्च येऊ शकतो.
  3. टॅली डिप्लोमासाठी तुम्हाला 7 ते 10 हजार पर्यंत खर्च येऊ शकतो.

टॅलि व्यवसायातील आर्थिक गोष्टी व्यवस्थित चालण्यासाठी मदत करते. विविध नोंदी सांभाळून ठेवण्याचे काम टॅलि मुळे सोपे होते. जी एस टी फाइल व्यवस्थित बनवण्यासाठी आणि माहिती एकत्रित करण्यासाठी फायदेशीर असते. ही कौशल्य शिकून नोकरीच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध होतात. कॉमर्स च्या विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत उपयोगी असा कोर्स आहे.

Tally Information in Marathi

टॅली चा कोर्स हा फक्त वाणिज्य शाखेतील विद्यार्थी नाही इतर विद्यार्थी सुद्धा करू शकतात. दहावी किंवा 12 वी नंतर हा कोर्स करता येतो. नोकरीच्या अनुषंगाने तुम्ही हा कोर्स करून एका चांगल्या नोकरी साठी प्रयत्न करू शकता.

व्यसायिक क्षेत्र, मोठ्या कंपन्या इत्यादी ठिकाणी अर्थी गोष्टींचा हिशोब ठेवण्यापासून ते इतर सर्व आर्थिक गोष्टींचे नियोजन करण्यासाठी टॅली चा वापर होतो.ती एक गरजेची गोष्ट सध्याच्या काळात आहे. म्हणून त्या कामासाठी मागणी असते म्हणून हा कोर्से करून तुम्ही एक चांगली नोकरी मिळवू शकता.

टॅली करून मिळणाऱ्या नोकरीची संधी

  1. लेखा लिपिक
  2. अकाउंटिंग असोसिएट
  3. लेखा सहाय्यक
  4. लेखा पर्यवेक्षक
  5. लेखा कार्यकारी
  6. टॅली ऑपरेटर
  7. अकाउंट मॅनेजर
  8. अकाउंट एक्सिक्युटिव्ह
  9. कनिष्ठ लेखापाल
  10. टॅक्स अकाउंटंट
  11. इत्यादी

टॅलि कोर्स कोण करू शकतो ?

  1. अकाऊंटंट लोक हा कोर्स करू शकतात.
  2. एखाद्या व्यवयसायचे मालक व्यवसाय आर्थिकरीत्या सांभाळण्यासाठी हा कोर्स करू शकतात.
  3. विद्यार्थी कौशल्य आणि नोकरीच्या संधी साठी हा कोर्स करू शकतात.
  4. घरबसल्या काम करण्यासाठी किंवा एखादी नोकरी करण्यासाठी सुद्धा गृहिणी हा कोर्स करू शकतात.
  5. एका मोठ्या कंपनी मध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या कौशल्य आणि अनुभवानुसार नोकरी मिळण्याची पुढे जाऊन संधी मिळू शकते.

Tally FAQ 2024 / Tally Information in Marathi

टॅलि शिकण्याचे फायदे आहेत का ?

हो, तुम्ही अकाऊंटिंग क्षेत्रात काम करत असाल किंवा करणार असाल तर टॅलि कोर्स मुळे तुम्हाला नोकरीची चांगली संधी मिळू शकते.

टॅलि कोर्स ला अधिकृत प्रमाणपत्र आहे का ?

होय, तुम्ही हा कोर्स पूर्ण केल्याच्या नंतर तुम्हाला अधिकृत प्रमाणपत्र मिळेल.

2024 मध्ये तुम्ही टॅलि शिकू शकता का ?

हो, तुम्ही अकाऊंटिंग क्षेत्राचा विचार करत असाल तर, तुम्ही हा कोर्स शिकू शकता.

टॅलि शिकणे सोपे आहे का ?

मानसिक कार्यक्षमता चांगली असण्यास हा कोर्स शिकण्यासाठी अगदी सोपा आहे आहे, यात तुम्हाला अकाऊंटिंग च्या गोष्टी समजून घेणे जास्त गरजेचे आहे.


नोकरी साठी इतर कॉम्प्युटर कोर्स कोणते ?

  1. सायबर सेक्युरिटी
  2. डाटा सायन्स
  3. वेब डेवलपिंग
  4. अॅप डेवलपर

छोटे कॉम्प्युटर कोर्स जे चांगले पगार देऊ शकतात :

  1. एम एस ऑफिस :
    • हा 5 ते 6 महिन्याचा कोर्स आहे. यामध्ये एम एस ऑफिस च्या सर्व गोष्टी शिकविल्या जातात. यात तुम्ही एम एस एक्सेल, एम एस वर्ड, एम एस पॉवर पॉइंट, एम एस आउट लुक इत्यादि गोष्टी शिकू शकता. एम एस ऑफिस ची तुम्ही पदवी सुद्धा घेऊ शकता. पदवी असल्यास तुम्ही नोकरी साठी अधिक प्रभावी उमेदवार बनू शकता.
  2. मल्टिमिडिया व अॅनिमेशन :
    • हा कोर्स 6 ते 8 महिन्यांचा असू शकतो. या कोर्स ला सध्या उत्तम मागणी आहे. यामध्ये तुम्ही फिल्म डिझाईन 7 अॅनिमेशन, गेम डिझाईन व अनिमेशन, व्ही एफ एक्स प्रो, विडियो एडिटिंग, इत्यादि बऱ्याच गोष्टी शिकून करियर करू शकता. तुम्ही यामध्ये प्रशिक्षण चा अभ्यासक्रम केल्यास स्वत: कामे घेऊ शकता.
  3. डिजिटल मार्केटिंग :
    • हा खूप कमी वेळेचा कोर्स आहे. या मध्ये तुम्ही अफिलिएट मार्केटिंग, ब्रॅंड मेकिंग, सोशल मीडिया मार्केटिंग इत्यादि गोष्टी शिकू शकता. या कोर्स द्वारे तुम्ही तुमचा व्यवसाय सुद्धा करू शकता.

शेवटपर्यंत माहिती वाचल्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. वर दिलेली माहिती तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. तसेच नवनवीन महत्वाचे अपडेट मिळविण्यासाठी आमच्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

www.latestupdate247.com या वेबसाइट वर आम्ही नियमित करियर ची माहिती, सरकारी योजनांची माहिती सविस्तर प्रसिद्ध करत असतो. तुम्ही आमच्या वेबसाइट वर जाऊन सर्व योजनांची माहिती वाचू शकता तसेच तुमच्या जवळच्या लोकांना सुद्धा शेअर करू शकता.

Leave a Comment