आजच्या लेखात आपण वेब डेवलपर बद्दलची माहिती पाहणार आहोत. या क्षेत्रात शिक्षण आणि करियर बद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. वेब डेवलपिंग मध्ये वेगवेगळे विभाग आहे. वेगवेगळे प्रकार यामध्ये येतात. अनेक विद्यार्थ्याना या मध्ये करियर करण्याची इच्छा असते परंतु त्यांना या बाबतीत पुरेशी माहिती नसल्यामुळे त्यांच्या मनात बरेचसे संभ्रम असतात. Web Developer Information in Marathi, वेब डेवलपर माहिती मराठी, सध्याच्या योगात कॉम्प्युटर सायन्स क्षेत्राला सुद्धा कमालीचे महत्व प्राप्त झालेले आहे. म्हणून त्याची काम करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा मागणी वाढलेली आहे. म्हणून या कडे एक करियर चा मार्ग म्हणून नक्की पाहिले जाऊ शकते. तर आज त्यासाठी आपण वेब डेवलपमेंट बद्दल थोडक्यात आणि महत्वाची माहिती जाणून घेऊया. वेब डेवलपर असणारी व्यक्ति चे काम म्हणजे वेबसाइट बनवणे, टीचे डिझाईन करणे, ती कशी चालवता येईल आणि वापरकर्ता असणाऱ्या व्यक्तीला सहजपणे कशी हाताळता येईल याचे काम ते करत असतात.
Web Developer Information in Marathi
तर वेब डेवलपर म्हणजे ते काम करणारी व्यक्ति वेबसाइट आणि वेब अॅप्लिकेशन बनविण्यात आणि त्याची इतर कामे करण्यात अत्यंत हुशार असतात. त्याच्या या वेब डेवलपर च्या नोकरी मध्ये वेबसाइट चे डिझाईन बनविणे, वेबसाइट चे फीचर मेंटेन करणे, यूजर एक्सपिरियंस व्यवस्थित ठेवणे, डिझाईन करण्यासाठी कोडिंग करणे ही महत्वाची कामे त्यांना करावी लागतात.वेबसाइट बनविण्यासाठी डेवलपर HTML / CSS आणि javascript सारख्या प्रोग्रामिंग भाषांचा आणि वापर करतात. वेब डेवलपर हा वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्या, व्यवसाय, मोठमोठे उद्योगधंदे यांच्यासाठी त्यांच्या डेवलपमेंट च्या विभाग अंतर्गत काम करत असतो.
Web Developer चे काही प्रकार
- फ्रंट एंड डेवलपर :
- हे काम करणारे डेवलपर रोजच्या वापरात असणाऱ्या वेबसाइट आणि वेब अॅप्लिकेशन खरे कलाकार असतात. वेबसाइट चे बटन्स, डिझाईन, अॅनिमेशन आणि वेबसाइट व्यवस्थित चालत आहे की नाही, येणारे एरर, लोकपर्यंत वेबसाइट कशा प्रकारे पोचेल हे सगळ निश्चित करण्याचे काम ते करत असतात.
- बॅक एंड डेवलपर :
- हे डेवलपर म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनिअर असतात. वेबसाइट आणि अॅप्लिकेशन च्या मागील लागणारी कोडिंग हे डेवलपर करतात. बॅक एंड डेवलपर असणारे व्यक्ति संपूर्ण डाटा बेस बनवितात.
- वेबसाइट करिता सर्वर साइड सेटअप करून देतात. हे डेवलपर फ्रंट एंड डेवलपर सोबत मिळून काम करत असतात.
- फूल स्टॅक डेवलपर :
- हे डेवलपर वरील पहिल्या 2 क्षेत्रात निपुण असलेले डेवलपर असतात.यांना प्रोग्रामिंग भाषाचे, डेटाबेस आणि फ्रेम वर्क चे जास्तीचे ज्ञान असते.
- म्हणून त्यांना वेब अॅप्लिकेशन मधील कस्टमर साइड व सर्वर साइड दोन्ही सांभाळता येतात. फ्रंट एंड आणि बॅक एंड डेवलपर या दोन्ही वर काम करून ते एकत्र करण्यात हुशार असतात.
- विडियो गेम डिजायनर :
- हे डिजायनर गेम च्या कथा, विजुयल आणि ग्राफिक्स बनविण्याचे काम करतात. त्यांच्या कौशल्यावर ते विडियो गेम स्टोरी बोर्ड बनवू शकतात. साहित्य लिहू शकतात. नवीन कोड बनवू शकतात.
- यासाठी प्रोग्रामिंग, वेब डेवलपमेंट व टेक्निकल प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्किल असणे खूप महत्वाचे आहे.
वेब डेवलपर चे काम काय असते ?
वेब संदर्भातील महत्वाची डेवलपमेंट करण्याचे काम हे वेब डेवलपर चे असते. वेब डेवलपमेंट मध्ये वेबसाइट ची देखभाल करणे विषयानुसार वेगवेगळी फीचर समाविष्ट करणे, टूल्स चा वापर करणे, वेबसाइट चे सर्वर सांभाळणे, वापरकर्ता असणाऱ्या व्यक्तीला व्यवस्थित वापरता येईल यासाठी महत्वाची डेवलपमेंट करणे त्याचे काम असते.
हे वेब डेवलपर मुख्यत: टेक कंपनी / डिजिटल एजन्सी / नवीन स्टार्ट अप तसेच मोठमोठ्या कार्पोरेशन सह इतर क्षेत्रात कार्यरत असतात. वेब डेवलपर फ्रीलांसर अथवा कॉन्ट्रॅक्टर्स म्हणून सुद्धा काम करू . वेब डेवलपर म्हणून सुद्धा एक करियर ची चांगली संधी सध्या विद्यार्थ्याना मिळू शकतो. जवळ जवळ 90% डिजिटल क्षेत्रात वेब डेवलपर ला नोकरी ची संधी आहे.वेगवेगळ्या कामासाठी वेब डेवलपर म्हणून शिक्षण घेतल्यास करियर करता येऊ शकते. तसेच या शिक्षणाकडे व्यवसाय म्हणून सुद्धा पहिले जाऊ शकते. या क्षेत्रात टीम म्हणून सुद्धा काम केले जाते. फायनान्स / ई कॉमर्स / आरोग्य क्षेत्रात आणि शिक्षण क्षेत्रात सुद्धा वेब डेवलपर ला नोकरीची संधी मिळू शकते.
How to Become a Web Developer Information in Marathi
पदवी :
- वेब डेवलपर होण्यासाठी तुम्ही त्याचे पदवी चे शिक्षण पूर्ण करू शकता. कॉम्प्युटर सायन्स मधील हा एक भाग आहे. यात सिस्टम डिझाईन, डाटा मॅनेजमेंट व इंडस्ट्री प्रोफेशनल यांच्या मार्फत वापरल्या जाणाऱ्या प्रोग्रामिंग मधील महत्वाचा अभ्यासक्रम आहे.
- कॉम्प्युटर सायन्स डिग्री मिळविण्यासाठी चार वर्षाचा कालावधी लागतो, सीनियर लेवल चे शिक्षण घ्यायचे असल्यास तुम्हाला आणखी काही वर्ष शिक्षण करावे लागेल.
- प्रत्येक ठिकाणी नोकरी साठी वेगवेगळी पात्रता असू शकते. असोशिएट पदवी तुम्ही पूर्ण केल्यास तुम्ही वेब डेवलपमेंट मध्ये सहभागी होऊ शकता पण तुम्ही बॅचलर डिग्री पूर्ण केल्यास ते नोकरी साठी जास्त फायदेशीर ठरू शकते.
इंटर्नशिप :
- नवीन शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप खूप महत्वाची असते. इंटर्नशिप मध्ये नवीन उमेदवारांना शिकण्याची आणि कस्टमर सोबत काम करण्याची मोठी संधी मिळते. त्यांतून त्यांना महत्वाची कौशल्य शिकण्याची चांगली संधी मिळते.
- इंटर्नशिप ही एक वेब डेवलपिंग शिकण्याची चांगली संधी उमेदवारांना देते.
Web Developer Certificate – कोर्स प्रमाणपत्र :
- वेब डेवलपमेंट कोर्स चे प्रमाणपत्र नोकरी मिळविण्यासाठी खूप महत्वाचे ठरते. तसेच तुमच्या कौशल्याचा पुरावा म्हणून ते प्रमाणपत्र गरजेचे असते. फ्रेशर असलेल्या उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी हे प्रमाणपत्र कंपनी मध्ये सादर केल्यास कंपनी उमेदवाराला नोकरीची संधी देऊ शकते.
Web Developer Salary in India
वेब डेवलपर चा पगार हा त्याच्या कामाच्या ठिकाणावर आणि त्याच्या कौशल्य आणि अनुभव यावर अवलंबून असतो. वेगवेगळ्या शहरात किंवा राज्यात वेगवेगळ्या पगार मिळू शकतो.
Glassdor च्या सर्व्हेनुसार खाली प्रमाणे काही शहरात वेब डेवलपर ला पगार मिळू शकतो.
- नवी दिल्ली मध्ये वेब डेवलपर ला पगार सरासरी 3.0 एल पी ए आहे. त्याची रेंज 1.0 ते 7.8 एल पी ए आहे.
- पुणे मध्ये वेब डेवलपर ला पगार सरासरी 3.6 एल पी ए आहे. त्याची रेंज 1.6 ते 8.5 एल पी ए पर्यंत आहे.
- बेंगळुरू मध्ये वेब डेवलपर ला पगार सरासरी 1.1 ते 7.7 एल पी ए आहे. त्याची रेंज 2.9 एल पी ए एवढी आहे.
Web Developer Information in Marathi
वेब डेवलपर ला कोडिंग माहिती असणे गरजेचे आहे का ?
हो – वेब डेवलपर ला कोडिंग माहिती असणे आणि ते करायला जमणे गरजेचे असते. वेबसाइट बनविण्यासाठी व टीचे डिझाईन करण्यासाठी कोडिंग ची गरज पडते. फ्रंट एंड डेवलपर ला HTML / CSS व JavaScript यासारख्या कोडिंग भाषा शिकणे गरजेचे आहे. बँक एंड डेवलपर Java अथवा PHP या वेब लक्ष देऊ शकतात. नवीन विद्यार्थी आणि कॉम्प्युटर क्षेत्रातील शिक्षणाची आवड असणारे विद्यार्थी या वेब डेवलपमेंट ला करियर म्हणून निवडू शकतात. यात निपुण होण्यासाठी महत्वाची पदवी आणि कौशल्य मिळविणे आणि अनुभव घेणे अतिशय गरजेचे असणार आहे. कौशल्य चांगल्या प्रकारे अवगत केल्यास नोकरीच्या ठिकाणी चांगला पगार मिळू शकतो तसेच व्यवसायच्या दृष्टीकोणातून सुद्धा ते महत्वाचे ठरू शकते.
आज आपण सध्याच्या काळात मागणी असणाऱ्या क्षेत्रातील करियर च्या एका संधी बद्दलची थोडक्यात माहिती जाणून घेतली आहे. ही माहिती आवडली असेल आणि तुमच्या वेब डेवलपमेंट ची शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या मित्र किंवा मैत्रिणींना ही माहिती नक्की शेअर करा. www.latestupdate247.com या वेबसाइट वर नियमित करियर संदर्भातील सविस्तर माहिती चे अपडेट दिले जातात.
सर्व महत्वाचे योजना आणि करियर मार्गदर्शन माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.latestupdate247.com या वेबसाइट ला नियमित भेट देऊ शकता. तसेच वरील माहीती तुम्ही इतर मित्रांना / मैत्रिणींना आणि इतर ग्रुप्स मध्ये सुध्दा शेअर करू शकतात. वेब डेवलपर माहिती मराठी 2024,