Mukhyamantri Vayoshri Yojana 2024, Latest Sarkari Yojana 2024

महाराष्ट्रातील 65 वर्ष वय आणि त्यापेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थिति मध्ये जगण्यासाठी वयानुसार येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यासाठी उपाययोजना करण्यासाठी गरजेची असलेली साधने आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी आणि त्याच बरोबर मनस्वास्थ केंद्र, योग उपचार केंद्र इत्यादि मार्फत त्यांचे मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राखण्यासाठी Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 राबविण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे.
latest sarkari yojana 2024 maharashtra, सरकारी योजना 2024, सरकारी योजना मराठी 2024, वयोश्री योजना pdf, government latest scheme 2024, mukhyamantri yojana marathi, sarkari yojana in marathi 2024, ladki bahin yojana 2024, lek ladki yojana 2024, सर्व सरकारी योजना अपडेट 2024, samjakalyan vibhag yojana 2024 pune, m

सदर योजनेचा वृद्ध व्यक्तींना आवश्यकतेनुसार आणि गरजेनुसार फायदा होणार आहे. ही योजनेची सविस्तर दिलेली माहिती वाचून इतर आसपासच्या सर्व लोकांना नक्की शेअर करा. जेणेकरून गरजू वृद्ध लोकांना याचा लाभ घेता येईल. तसेच आमच्या वेबसाइट ला नियमित फॉलो करा.

योजनेची प्रस्तावना :

2011 च्या जन गणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोक संख्या 1.24 कोटी एवढी आहे. सध्याच्या स्थितीत 65 वर्ष आणि त्यावरील अंदाजे एकूण 10 ते 12 टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत.

मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कुठल्या न कुठल्या अपंगत्व चा सामना करावा लागतो. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने दारिद्र्य रेषेखाली असंरया दिव्यांग ज्येष्ठ लोकांसाठी साहित्य आणि उपकरणे पुरवण्यासाठी वयोश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे.

शारीरिक दुर्बलता असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय आयुष्यात आणण्यासाठी आणि मोकळेपणाने जगता यावे म्हणून ही सुविधा पुरविण्यात येणार आहे. खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा व इतरांना सुद्धा पाठवा.

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 Information

पाययोजना करण्यासाठी गरजेची असलेली साधने आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी आणि त्याच बरोबर मनस्वास्थ केंद्र, योग उपचार केंद्र इत्यादि मार्फत त्यांचे मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राखण्यासाठी प्रशिक्षणासाठी एक रकमी 3000 /- रु लाभार्थी च्या वैयक्तिक बँक खात्यात डी बी टी म्हणजे थेट लाभ वितरण प्राणलीमार्फत केले जाणार आहे.

वयोश्री योजना 2024 स्वरूप

या योजनेसाठी पात्र असणाऱ्या वृद्ध लाभार्थी त्याच्या शारीरिक असमर्थता आणि दुर्बलपणानुसार साहित्य व उपकरणे खरेदी करता येणार आहे. खालीप्रमाणे

  1. चष्मा
  2. श्रवण यंत्र
  3. ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर
  4. फोल्डिंग वॉकर
  5. कमोड खुर्ची
  6. नि – ब्रेस
  7. लंबर बेल्ट
  8. सवाईकल कॉलर इत्यादि

केंद्र शासन च्या कार्मिक विभाग मार्फत नोंदणी केलेल तसेच राज्य शासन मार्फत नोंदणी केले योग उपचार केंद्र, मन स्वास्थ्य केंद्र, मन शक्ति केंद्र / प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी सहभागी होता येईल.

Vayoshri Yojana in Marathi 2024

  • महाराष्ट्र शासनामार्फत 100% आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
  • थेट लाभ वितरण प्रणाली मार्फत 3000 /- रुपये निधी देण्यात येईल.
  • सार्वजनिक विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उल जिल्हा रुग्णालय यांच्या मार्फत आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्यातील प्रत्येक ठिकाणी पसरलेले आहे.
    सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत या योजनेच्या लाभराठी ची तपासणी केली जाईल.

वयोश्री योजना माहिती मराठी 2024-25

वृद्ध नागरिकांना आवश्यक सहाय्य आणि विशेष अर्थ सहाय्य थेट लाभ वितरण प्रक्रियेमार्फत दिले जाणार आहे.
याची अंमलबजावणी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, आयुक्त समाजकल्याण विभाग, पुणे आणि जिल्हा स्तरावरील अंमलबजावणी समिती यांच्यामार्फत केली जाईल.

वयोश्री योजना पात्रता

या योजनेच्या लाभासाठी लाभार्थी व्यक्ति ने 65 वर्ष पूर्ण केलेली असावीत आणि त्यावरील वय असअसणाऱ्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. किंवा आधार कार्ड ची पावती असावी. आधार कार्ड नसल्यास, ओळख पटविण्यासाठी इतर कागदपत्र असेल तर मान्य असेल.

पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरण कडून प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम अंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना किंवा सरकारच्या इतर कुठल्याही पेंशन योजनाचा वृद्धापकाळ चा निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा लाभार्थी सादर करू शकतो

उत्पन्न मर्यादा : लाभार्थी चे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख च्या आत असावे. याचे स्वयं घोषणापत्र सादर करणे गरजेचे आहे.

अधिक माहिती वाचण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा

Vayoshri Yojana 2024 Document List

1आधार कार्ड / मतदान कार्ड
2राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स
32 फोटो पासपोर्ट आकारातील
4स्वयं घोषणापत्र
5शासनाने ओळख पटविण्यासाठी दिलेली इतर कागदपत्र

वृद्ध व्यक्तींसाठी शिबिर आयोजन

योजनेचा खर्च खालीलप्रमाणे :

तपशीलरक्कम – लक्ष मध्ये
थेट लाभ वितरण – 15 लाख लाभार्थी ला – 3 हजार रु प्रमाणे45000.00
नोडल एजन्सी खर्च3000.00
शिबिर खर्च00.00
एकूण 48000.00

सदर योजनेकरिता वर्षाला अंदाजे 480 कोटी एवढ्या खर्च करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र राज्याच्या www.maharashtra.gov.in या वेबसाइट वर उपलब्ध आहे.

वरील लेखात आपण मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 बद्दलची सविस्तर माहिती पाहिलेली आहे. तरीही अधिकृत योजना जाहिरात वाचावी. योजनेची पीडीएफ जाहिरात लिंक खाली दिलेली आहे तिथून डाउनलोड करा.

वयोश्री योजना पीडीएफ लिंक : येथे क्लिक करून पहा

अशाच इतर सर्व योजनांची माहिती नियमित मिळवण्यासाठी https://latestupdate247.com/ या आमच्या वेबसाइट ला नियमित भेट द्या. दिलेली योजना खूप उपयोगाची असून आपल्या मित्र बांधवांसोबत नक्की शेअर करा. तुम्हाला मिळालेली या योजनेची लिंक दुसऱ्यांना पाठवा.

योजनेची मार्गदर्शक तत्वे :

  1. नोंदणी कृत लाभार्थी चे कागदपत्र तपासणी, आधार प्रमाणीकरण, हमीपत्र, बँक लिकेज हे तपासून शिबिरासाठी नेमून दिलेल्या प्राधिकृत अधिकार्यांतर्फे प्रमाणित करून घेतले जाईल. सदर डाटा ऑनलाइन आणि ऑफलाइन स्वरूपात जतन केला जाईल.
  2. मूल्यमापन झाल्यानंतर लाभार्थी ला ई टोकन देण्यात येईल. आणि ऑफलाइन पद्धती साठी पावती देण्यात येईल.
  3. जिल्हा / महापालिका स्तराचे मूल्यमापन झाल्यावर पात्र लाभार्थी ची माहिती ऑनलाइन आणि ऑफलाइन स्वरूपाने आयुक्त समाजकल्याण पुणे / समाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांकडे PSU द्वारे सादर केले जाईल.
  4. पात्र असणाऱ्या लाभार्थी ची यादी, नाव, फोटो आणि लिंक, बँक खाते, आधार नंबर, बी पी एल कार्ड नंबर इत्यादि माहिती तपशीलवार आयुक्तालय तर्फे वेबसाइट वर उपलब्ध करून दिली जाईल.
  5. तक्रार आणि अभिप्राय इत्यादि साठी स्वतंत्र यंत्रणा तयार केली जाणार आहे.

योजना सहाय्य देण्यासाठी मार्गदर्शक तत्वे :

  1. लाभार्थी ची शहानिशा करून आणि योजनेच्या अटी आणि तत्व यांची खात्री करून अंतिम यादी करण्यात येईल.
  2. दिलेली रक्कम नेमलेल्या वापरासाठी च वापरली जाईल असे स्वयं घोषणापत्र प्राप्त करून घेतले जाईल. आणि राष्ट्रीय किंवा केंद्रीय पुरस्कृत समान योजनेचा लाभ घेतला नसल्याचे सुद्धा घोषणापत्र मध्ये नमूद करणे गरजेचे आहे.
  3. योजना अंमलबजावणी ची तपासणी ही समाजिक न्याय विभाग करेल.
  4. निधी साठी योजनेच्या अंतर्गत स्वतंत्र खाते उघडून दिले जाईल. मिळणारा निधी स्वतंत्र बँक खात्यात ठेवला जाऊ शकतो.
  5. डी बी टी मार्फत पात्र असणाऱ्या लोकांना रक्कम देण्यात येणार आहे. तसेच खर्च न झालेली रक्कम / डी बी टी च्या अडचणी , मुळे जमा न झालेली रक्कम विभागाकडे जमा केली जाईल.
  6. अधिक सविस्तर माहिती साठी वर दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचा.

https://latestupdate247.com या वेबसाइट वर सर्व सरकारी अपडेट नियमित देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व लोकांना महत्वाच्या योजना, नोकरी अपडेट आणि इतर गरजेच्या सर्व महत्वाच्या गोष्टी पोचतील आणि त्याचा त्यांना लाभ घेता.

सर्वांनी वरील माहिती एकमेकांना शेअर करून सहकार्य करावे. कोणीही या योजनेपासून वंचित राहणार नाही, हाच आमचा उद्देश आहे.

Leave a Comment